शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा कृती दल

By admin | Updated: August 29, 2016 02:14 IST

चांगलेच आहे, त्यात वाईट काहीच नाही. पण स्वागत करण्याची घाई करायचे कारण नाही. रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताच्या पदरी पडलेली निराशा हा दीर्घकालीन वारसा आहे

चांगलेच आहे, त्यात वाईट काहीच नाही. पण स्वागत करण्याची घाई करायचे कारण नाही. रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताच्या पदरी पडलेली निराशा हा दीर्घकालीन वारसा आहे. तो यापुढील किमान तीन आॅलिम्पिक स्पर्धांमध्ये तरी मोडला जावा म्हणून एक विशेष क्रीडा कृती दल स्थापन करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाहीर केला आहे. येत्या काही दिवसात या दलाची स्थापना केली जाईल आणि देशांतर्गत क्रीडा प्रकारास आवश्यक सोयी सवलती, खेळाडंूचे प्रशिक्षण, त्यांची निवड पद्धती आदिचा कृती आराखडा तयार करण्याचे काम या दलाकडे सुपूर्द केले जाईल. कल्पना चांगली आहे. सरकार विद्यमान असो की आधीची, त्यांच्याकडे चांगल्या कल्पनांना कधी तोटाच नव्हता. पण आज देशातील विविध क्रीडा संघटनांकडे नजर टाकली असता तिथे सारी बजबजपुरी राजकारण्यांचीच आहे. क्रिकेट नियामक मंडळास या बजबजपुरीपासून मुक्त करण्याचा निर्णय माजी सरन्यायाधीश राजेन्द्रमल लोढा यांच्या समितीने घेतला असला तरी मुळात तो कितपत टिकेल याचीच शंका आता येऊ लागली आहे. तरीदेखील आत्तापासूनच येऊ घातलेल्या कृती दलास नाट लावण्याचे कारण नाही. पण त्याची घोषणा करणाऱ्या मोदी सरकारच्याच काळात गेल्या वर्षी या क्रीडा क्षेत्रात काय झाले याकडे लक्ष टाकण्यास हरकत नाही. अर्थसंकल्पात क्रीडेसाठी १५४१ कोटी ठेवले गेले. ती तरतूद नंतर १३७१ कोटींवर नेली. पुढे त्यात एकदा १६४ आणि दुसऱ्यांदा १७० कोटींची कपात केली गेली. शिल्लक राहिलेल्या निधीमधून राष्ट्रीय पातळीवरील इंंडियन इन्स्टिट्यूट आॅफ स्पोर्टस सायन्स अ‍ॅन्ड रिसर्च या संस्थेला ५० लाख रुपये मंजूर केले गेले. प्रत्यक्षात हातात टिकवले अवघे दोन लाख! त्याचप्रमाणे नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ स्पोर्टस या संस्थेला मंजूर केले गेले पुन्हा ५० लाख पण हातात टिकवले सात लाख! दोन्ही मिळूनच्या या कोटीभर रुपयातील जे नऊ लाख अदा केले गेले ते सारे प्रशासकीय खर्च, भत्ते वगैरे यावरच खर्ची पडले असणार. क्रीडा क्षेत्राकडे बघण्याचा देशातील सर्व सरकारांचा दृष्टिकोनच यातून प्रतिबिंबित होतो. तूर्तास आगामी कृति दलाच्या बाबतीत असे काही होणार नाही अशी आशा जनता बाळगू शकते कारण ती केवळ तेच करु शकते.