शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

वेग

By admin | Updated: August 22, 2016 06:16 IST

मन आणि वास्तव व्यवहार हे एकमेकांना स्पष्ट करू शकत नाहीत. मन व्यवहार बनते आणि व्यवहार कालांतराने मनच होते.

मन आणि वास्तव व्यवहार हे एकमेकांना स्पष्ट करू शकत नाहीत. मन व्यवहार बनते आणि व्यवहार कालांतराने मनच होते. वास्तवातील उच्च प्रतीची कंपने तुम्हाला मनापर्यंत नेतात. अतिशय कमी कंपनातील मन वास्तव व्यवहाराचं दर्शन घडवतं. मन आणि वास्तवावर स्वामी विवेकानंद बोलताना हा भेद स्पष्ट करतात. ते मनच असते जे आपलं शरीर घडवते. शरीर असणे आणि घडविणे यात फरक आहे. म्हणून मनावर संस्कार करायचे. म्हणून विशेषत: मुलांबाबत वागताना त्यांच्या आणि आपल्या मनाचा विचार करावा लागतो. त्यात परिस्थिती महत्त्वाची, भवताल महत्त्वाचा.काळ बदलला तसा माणसांचा जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. पूर्वी मैदानी खेळ महत्त्वाचे वाटत. त्यात फक्त शरीर कमावणे एवढाच उद्देश नव्हता. मनही स्वच्छ प्रसन्न शुभ्र घडविणे महत्त्वाचे होते. सांघिक भावना महत्त्वाची होती. हे खेळ कमी झाले. आता ते आॅलिम्पिकमध्येच बघायचे आणि इतर देशांतील खेळाडूंना पदके मिळाली तर चुकचुकायचे एवढेच आपल्या हातात. एखाद्या सिंधूने मुसंडी मारली तर नाचायचे. जयजयकार करायचा. पण अशा सिंधू एवढ्या विशाल भारतात बिंदू होत आहेत हे मान्य करायला हवंय. आपल्याला अजून अंगण आहे. पण तेही हरवत चाललं आहे. मैदानं अतिक्रमित होत आहेत. बिल्डर, दलाल, माफिया यांनी देशाचं बांधकाम गिळंकृत केलं आहे. आपणही अतिक्रमणात राहू लागलो, पूररेषेत घरं बांधून नद्यांना गॅलरीतून बघू लागलो. पण कधीतरी महापूर येणारच, घरांची नासधूस होणारच. निसर्ग जसजसा आवळला जातो तसतसा तो कधीतरी उद्दाम होतोच. आपल्या जगण्याचा वेग आणि मोकळ्या हवेचा, आरोग्याचा विचार यांचं गणित जमवताना आयुष्य ओढलं जातंय हे आपल्या कधी लक्षात येणार? प्रगती झाली आणि संध्याकाळचा परवचा आणि शुभंकरोती इतिहासजमा झाले. परवा एका मित्राच्या घरी गेलो होतो. त्याची दोन मुले टीव्हीवर गेम खेळत होती. मुलगा हातातल्या रिमोटवर बटनं दाबून प्रचंड वेगाने गाडी चालवत होता. इतर गाड्यांना धडाड धडकत होता. झाडाला ढुशा मारीत होता. रेलिंग तोडत होता. आई आणि इतर टाळ्या वाजवीत होते. जेवढे जास्त अपघात तो करेल तेवढा तो पराक्रमी, शूर. मी सहज विचारले, कारे खरी गाडी अशीच चालवशील? त्याने माझ्याकडे ढुंकून न बघता अजून जोरात चालवीन असं फुशारकीने सांगितलं. गुन्हे करण्याची सवय लावणारे खेळ खेळत आपण मोठे होणार आणि ती मुले रस्त्याने कसरत करीत बाइक चालवणार.वास्तवाच्या वेगाने पछाडलेल्या आपणाला मनाचा वेग आवरा हे म्हणण्याचा काय अधिकार. बेफाम हा आयुष्याचा मंत्र होत असताना मनाला आवरा, हे बैलगाडीत बसल्यासारखेच होणार. बैल तर कधीच कत्तलखान्यात गेलेत आणि आपले ब्रेक फेल झालेत.-किशोर पाठक