शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
4
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
5
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
6
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
7
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
8
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'
9
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
10
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
11
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
12
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
13
डेस्कटॉप पुन्हा फॉर्मात! वेगवान कामगिरी आणि सोयीमुळे मागणीत वाढ
14
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
15
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या
16
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
17
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
18
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
19
...तर तुम्हा-आम्हाला स्वस्त वीज मिळेल! खासगी कंपन्यांच्या प्रवेशाने महाराष्ट्राच्या वीज बाजारात स्पर्धा वाढणार
20
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग

विशेष लेख: एनसीबी, ईडी, सीबीआयच्या नावाखाली तोतये अधिकारी धमकावतात तेव्हा...

By मनोज गडनीस | Updated: August 11, 2024 07:32 IST

दहा मिनिटांनंतर फोन आलेल्या व्यक्तीला एसएमएस यायला सुरुवात होते आणि बघता बघता त्याच्या बँक खात्यातील सर्व रक्कम तुमच्या डोळ्यादेखत रिकामी होताना दिसते.

मनोज गडनीस, विशेष प्रतिनिधी

मी ईडीचा किंवा सीबीआयचा अधिकारी आहे. तुमच्या एका प्रकरणात तुमच्याविरोधात गुन्हा नोंदवला गेला आहे. तुमच्या कागदपत्रांचा वापर करून तुमच्या नावे परदेशात हजारो कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. तुमचे बँक खाते वापरले गेले आहे. तेव्हा मला बँक खात्याचे तपशील द्या... ऑनलाइन पासवर्ड, ओटीपी सांगा, असे सांगत गेल्या काही दिवसांत अनेक लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे. ही फसवणूक कशी करतात, त्याची कार्यपद्धती देणारी ही माहिती. अनोळखी नंबरवरून फोन येतो. फोन करणारी व्यक्ती सांगते. तुमचे एक कुरियर आले आहे. त्यात अमली पदार्थ सापडले आहेत. त्यामुळे आम्ही हे प्रकरण नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्यूरोकडे (एनसीबी) सोपवत आहोत. फोन होल्ड करा. मी एनसीबीच्या अधिकाऱ्याकडे फोन वळवत आहे.

- एनसीबीचा तोतया अधिकारी : तुम्ही केलेला गुन्हा गंभीर आहे. हा फोन सुरू ठेवा आणि स्काईप कॉलवर किंवा व्हाॅट्सॲप व्हिडीओ कॉलवर या. तुमचा जबाब मला नोंदवायचा आहे. - फोन आलेली व्यक्ती : घाबरून. स्काईप किंवा व्हॉट्सॲप व्हिडीओ कॉलवर येते. पण अधिकारी असल्याची बतावणी करणारा माणूस स्वतःचा कॅमेरा सुरू करत नाही. तो केवळ तुमच्या या कॉलचे रेकॉर्डिंग करतो. त्याची ओळख पटावी म्हणून तो त्याच्या अधिकारी असलेल्या आयकार्डचा फोटो तुमच्याशी शेअर करतो.- अधिकारी : तुमच्यावर केवळ अमली पदार्थाचा गुन्हा नाही तर आमच्या संगणकीय सिस्टीममध्ये तुम्ही परदेशात काही कोटींचे व्यवहार केल्याचे दिसत आहे. त्यानंतर एका प्रथितयश राजकारण्याचा फोटो पाठवला जातो. याला तुम्ही ओळखता का?- फोन आलेली व्यक्ती : व्यक्तिशः ओळख नाही. पण ही व्यक्ती प्रसिद्ध राजकीय नेता असल्यामुळे मला माहीत आहे. - अधिकारी : याने तुमच्या कागदपत्रांचा वापर करून परदेशात शेकडो कोटी रुपये पाठवले आहेत. तुमच्या नावावर परदेशात अनेक कंपन्यादेखील उघडल्या आहेत. या राजकीय व्यक्तीची आम्ही माहिती काढतच आहोत. पण तुम्ही आता या प्रकरणातदेखील सहआरोपी झाला आहात. - फोन आलेली व्यक्ती : (घाबरून) अहो साहेब, मला हे काहीही माहिती नाही. - अधिकारी : तुमच्या बँक खात्याचा नंबर सांगा. आम्हाला तपासायचे आहे की तुम्हाला या व्यवहारातून काही कमिशन मिळाले आहे की नाही.- फोन आलेली व्यक्ती : (घाबरून) - बँक खात्याचा नंबर देते. - अधिकारी : एक ओटीपी आला असेल तुमच्या क्रमांकावर...- फोन आलेली व्यक्ती : (घाबरून) - हो.- अधिकारी : मला तो ओटीपी सांगा. - फोन आलेली व्यक्ती : (घाबरून) तो ओटीपी देते. - अधिकारी : मी तुमच्या खात्याचे तपशील तपासून परत फोन करेन. तोवर शहर सोडून कुठेही जायचे नाही. एक-दोन दिवसात आम्ही घरी येऊन तुमचा सविस्तर जबाब नोंदवून घेऊ.

एवढ्या संवादानंतर फोन कट होतो. स्काइप किंवा व्हॉट्सॲपवर शेअर केलेल्या त्या अधिकाऱ्याचे फोटो किंवा आयकार्ड दोन्ही डिलीट होते.

दहा मिनिटांनंतर फोन आलेल्या व्यक्तीला एसएमएस यायला सुरुवात होते आणि बघता बघता त्याच्या बँक खात्यातील सर्व रक्कम तुमच्या डोळ्यादेखत रिकामी होताना दिसते.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम