शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
2
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
3
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
4
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
5
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
6
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
7
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
8
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
9
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
10
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
11
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
12
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
13
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
14
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
15
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
16
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
17
"नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात..."; खळबळ उडवणाऱ्या व्हिडीओवर संजय शिरसाटांनी सोडलं मौन
18
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
19
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध
20
“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

मराठीत बोला

By admin | Updated: February 26, 2017 23:24 IST

आज २७ फेब्रुवारी. कुसुमाग्रजांचा वाढदिवस. तात्यासाहेब आपल्यातून जाऊन १६ वर्षे झालीत.

आज २७ फेब्रुवारी. कुसुमाग्रजांचा वाढदिवस. तात्यासाहेब आपल्यातून जाऊन १६ वर्षे झालीत. त्यांची स्मृती येत नाही असा दिवस नसतो आणि आज जागतिक मराठी दिनही आपण करतोय. म्हणजे काय करायचं? आपल्याच मराठीची आपण आठवण काढायची, आपली मराठी किती लाघवी आहे, प्रभावी आहे, प्रखर आहे आणि आपली आई आहे हे म्हणायचं. पण आपली सध्याची तरुण पिढी किती मानते? मध्यंतरी यूपीएससीचे निकाल लागले. एका खेडेगावातील मुलाने ठरवून ही परीक्षा दिली आणि तो पास झाला. त्याला बाहेरचे कुठलेच क्लास नव्हते. इंग्रजीचा बागुलबुवा नव्हता. महागडे कपडे घालून सजविलेला डामडौल नव्हता. तो तोंडी परीक्षेला गेला, तेही चपला घालून. त्याचं कौतुक पेपरात आलं. आपण ते वाचलं. विसरून गेलो. पुन्हा आईबाप मुलाच्या बुटांचे बंद बांधायला मोकळे झाले. आपल्याला हे कधी आणि केव्हा पटणार की आपणच वाढविलेला हा रोग आहे. इकडे इंग्रजीचं अवसान वाढतंय म्हणून मराठीचा आपण जयजयकार करायचा. प्रथम आपल्या कळकट मराठी शाळा आपण सुधारायला हव्यात. माणसांना स्वत:ला जर मराठीची जाणीव नसेल तर तो ती बोलणार नाही. अंगीकारणार नाही. पुन्हा गर्वाने आपण सांगणार पुढील दहा-वीस वर्षांत मराठी शाळा बंद पडणार ! फक्त इंग्रजीच शाळा राहतील. मुलं घरी येतील. मुलगा काळजीने होमवर्क करायला बसेल आणि आईबाबा त्याच्या पुस्तकातल्या भाज्या, फुलं, फळं कुठे मिळतील हे पाहत राहतील, कारण ती परदेशातील हवामानातली. आपल्या इथे कुठे पिकणार? जिथे पिकत नाही तिथे हे विकलं जातं. आपल्याला अंधानुकरण फार आवडतं. म्हणून तर मराठी पुस्तक वाचणं कमअस्सल वाटतं. चेतन भगत आपल्याला पटतो कारण ज्या गोष्टी शिक्षक आपल्या कानीकपाळी ओरडून मराठीत सांगतात त्या गोष्टी चेतन व्यवस्थित इव्हेंट मॅनेजमेंट करून सांगतो. आपल्याला ते पटतं. माझा पोरगा छानछोकीत वाढला पाहिजे, दिसला पाहिजे हे महत्त्वाचं! त्याला मिळणारं ज्ञान कसं मिळतं ते आपण पाहत नाही. हे बघा मरेपर्यंत आई कुणीच विसरत नाही कारण ती आपल्याला घडवते म्हणून! तशी ही मराठी जन्मापासून आपण जपली पोसली, वर्धमान केली तर केवळ एक दिवसाचे स्मरण पुरेसे नाही. श्यामची आई किती वर्ष राहिली? अजून आहे ना? राहील. आपण विश्वासाने मराठीत एक पाऊल टाकू या. त्यासाठी बुद्धिमानांनी एक काम करा विज्ञान आणि तंत्रज्ञान मराठीत कसे येईल ते बघावे. यासाठी आपणच शासनाच्या मागे लागून हे काम करायला हवे. शासन करीत नाही असे नाही. आपण पुरेसे मागे लागत नाही. सदैव होकारार्थी दृष्टिकोन, ठेवून बोलायला हवे, मग एक दिवसापुरता ‘मराठीत बोला’ म्हणण्याची गरज नाही, सदैवच लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ! या मराठी भाषेचे आपण कृतज्ञ उतराई होऊ !-किशोर पाठक