शहरं
Join us  
Trending Stories
1
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
2
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
3
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले...
4
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
5
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
6
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
7
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
8
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
9
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
10
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
11
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
12
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
13
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
14
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
15
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
16
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
17
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
18
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
19
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
20
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?

सिद्धीस न जाणारे नूतन वर्षाचे असेही काही संकल्प

By admin | Updated: December 24, 2015 23:38 IST

चालू वर्ष सरत आले आहे आणि नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरु झाली आहे. सरत्या वर्षातील हे माझे अखेरचे स्तंभलेखन.

राजदीप सरदेसाई, (ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभलेखक)चालू वर्ष सरत आले आहे आणि नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरु झाली आहे. सरत्या वर्षातील हे माझे अखेरचे स्तंभलेखन. त्यामुळे यात मी आपल्या विविध राजकीय नेत्यांच्या मनातील नवीन वर्षाच्या संकल्पांचा आढावा घेणार आहे. त्यात कुठल्याही प्रकारचा आकस नाही. केवळ एक गंमत आहे. (तसेही संपादकीय पानावरील लेख नेहमीच जड आणि गंभीर असलेच पाहिजेत असे काही आहे?)नरेंद्र मोदी: आगामी वर्षात वारंवार विदेश दौरे करण्याऐवजी आपल्याच देशामधील ज्या जिल्ह्यांच्या कृषी क्षेत्रात नैराश्य पसरले आहे, त्यांना भेटी देईन. मला याची जाणीव आहे की माझे खरे मतदार भारतातल्याच उन्हात आणि धुळीत आहेत, ‘मोदी मोदी’ असा घोष करणाऱ्या अनिवासी भारतीयांमध्ये नाही. एखाद्या दिवशी शेतकरी संमेलन भरवून तिथे मी ‘मन की बात’ करु शकेन. ती फक्त रेडियोवर नसेल तर फेसबुक, ट्विटर आणि इतर माध्यमांमधूनही असेल. (मला खात्री आहे की मार्कला, म्हणजे झुकेरबर्गलाही ग्रामीण भारताविषयी जाणून घ्यायला नक्कीच आवडेल). राहुल गांधी: नवीन वर्षात मी माझ्या पक्षातील नेत्यांना न सांगता मोठ्या सुट्टीवर जाणार नाही. मी ही बाब नक्कीच माझी आई, बहीण आणि मेव्हण्यास सांगेन, कारण गांधींसाठी परिवार नेहमीच अग्रभागी असतो. मी संसदेच्या बजेट सेशनच्या तारखा आधीच माहिती करून घेईन जेणेकरून माझ्या आत्मचिंतन रजेचा काळ आणि बजेट सत्र एकाच वेळी येणार नाहीत. आणि हो, मी माझी ओळख म्हणून दाढी ठेवायची की तुळतुळीत ठेवायची हा गोंधळ दूर करेन. सोनिया गांधी: मी दीर्घकाळ कॉंग्रेसचे अध्यक्षपद भूषवित आहे आणि आता माझ्या मुलाने हे पद सांभाळण्याची वेळ आली आहे. त्यामुळे त्याच्याकडे हे पद जावे या विषयावर येत्या वर्षात मी भर देईन. तरीही राहुल तयार झाला नाही तर माझ्या आतल्या आवाजाचे ऐकून मी पदावरून स्वत:हून बाजूला होईन. आणि हो, ते सुब्रह्मण्यम स्वामी याच प्रकारे न्यायालयाच्या माध्यमातून आम्हाला त्रास देणे सुरु ठेवतील तर मी त्यांना पुन्हा एकदा आठवण करून देईन की मी इंदिरा गांधींची स्नुषा आहे आणि कुठलाच न्यायाधीश माझा हा विशेष दर्जा काढून घेऊ शकत नाही. अरुण जेटली: नव्या वर्षात मी माझी इतर सर्व पदे सोडून देऊन देशाचे अर्थकारण सांभाळणे या माझ्या मुख्य कामावर लक्ष केंद्रीत करेन. मी ब्लॉग लिहिणार नाही, राजकीय मीमांसा करणार नाही, वादाच्या काळात पक्षाचा प्रवक्ता होणार नाही, कुठलेच कायदेशीर सल्ले देणार नाही आणि माध्यमांचे व्यवस्थापनही करणार नाही. एक अशी दक्षता जरुर घेईन की माझे क्रिकेटप्रेम फिरोजशाह कोटला मैदानाच्या पलीकडे जाणार नाही. तशीही तिथली खेळपट्टी आता विश्वसनीय राहिलेली नाही. अरविंद केजरीवाल: माझी निवड नेमकी ज्या कामासाठी केली गेली ते काम म्हणजे राष्ट्रीय राजधानीचे प्रशासन राबविण्याचे आगामी वर्षात पूर्ण करेन. पंतप्रधानांपासून नायब राज्यपालांपर्यंत आणि दिल्लीच्या पोलीस प्रमुखांपासून सीबीआय व माध्यमांपर्यंत, साऱ्यांशी संघर्ष करणे थांबवेन. लालकृष्ण अडवाणी: मी आता ज्या वयात आहे त्या वयात कुठलाच संकल्प करणे योग्य ठरत नाही. पण मी मात्र सार्वजनिक जीवनात कायम राहण्याचा संकल्प केला आहे. मला माहीत नाही की ‘मार्गदर्शक मंडळ’ म्हणजे काय असते. पण हे विसरू नका, राष्ट्रपती पदाची निवडणूक २०१७मध्ये आहे व त्याच काळात मी माझी नव्वदी साजरी करणार आहे. राष्ट्रपती भवनासारखे निवासस्थान असणे याहून मोठा उपहार काय असू शकतो? ममता बॅनर्जी: नव्या वर्षात पुन्हा बंगालच्या सत्तेत येण्याचा संकल्प मी करीत आहे. डाव्यांनी तीस वर्षे पश्चिम बंगालची वाताहत केली, मी तेवढीच वाताहत दहा वर्षात करेन. जर केजरीवालांना असे वाटते की ते आम आदमी आहेत तर मी सुद्धा आम औरत आहे. मी उगाच नाही मुख्यमंत्री असतानाही माझ्याच सरकारच्या विरोधातील रस्त्यावरच्या निदर्शनात सहभागी झाले होते. तुम्हला माहीतच असेल की आम्हा बंगाली लोकांना बंद किती आवडतो ते! जयललिता: मी सुद्धा २०१६मध्ये तामिळनाडूच्या सत्तेत पुन्हा येण्याचा संकल्प केला आहे. नाही, मी पोस गार्डन भागातून बाहेर पडून पूरबाधित लोकाना भेट देणार नाही. मी खास तयार करुन घेतलेल्या आलिशान बसमधून प्रचार करेन. अम्माची एकच लाट लोकाना पूरस्थितीच्या काळातील अपेष्टा विसरविण्यास पुरेशी आहे. उद्धव ठाकरे: येत्या वर्षात मी एकाही पाकिस्तान्याला मुंबईत येऊ देणार नाही. देशातील सर्व पारपत्र कार्यालयांमध्ये शिवसैनिकांची नेमणूक करून परदेशातून येणाऱ्या प्रत्येकाचा व्हिसा तपासण्याचे नियोजन आम्ही करीत आहोत. आमचा दादर येथे काळ्या शाईचा आणि पिचकाऱ्यांचा कारखाना आहे (आणि हो, काळी शाई फासताना तिथे टिव्ही कॅमेरे वेळेवर हजर राहतील याची काळजी आम्ही नक्कीच घेऊ ).लालूप्रसाद: राबडीदेवींना राज्यसभेत आणि मिसा भारतीला विधान परिषदेत पाठवून माझा कुटुंबाचा अल्बम पूर्ण होईल. कायद्याने मला निवडणूक लढवण्यापासून रोखले असले तरी रिमोट कंट्रोलला आळा घालणारा कायदा देशात अस्तित्वात नाही. मुलायम सिंह: अखिलेशला उत्तर प्रदेश सरकार चालवण्याची परवानगी देऊन टाकावी, असे माझ्या मनात घोळते आहे. त्याने माझ्या वाढिदवसानिमित्त किती मोठा समारंभ सैफई येथे ठेवला होता. त्याचे एके काळचे काका अमरसिंह यांना उत्तर प्रदेशच्या ग्रामीण भागात इतक्या मोठ्या प्रमाणात स्टार मंडळी आणण्याचे कौशल्य कधीचदाखवता आले नाही.मोहन भागवत: मी अशी अशा बाळगतो की नव्या वर्षात रा.स्व. संघ हिंदूराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करेल. आणि जर दांभिक धर्मनिरपेक्षतावाद्यांना ते आवडले नाही तर त्यांनी खुशाल माझ्याकडे किंवा अनुपम खेर यांच्याकडे पुरस्कार परत करावेत. ताजा कलम: नवीन वर्षासाठीचे संकल्प मोडण्यासाठीच असतात. चला भारतीय राजकारणातील आणखी एका उत्सुकतेने भरलेल्या अनपेक्षित वर्षासाठी तयार होऊ या. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.