शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत जास्मिन लांबोरियाची 'सुवर्ण' कामगिरी!
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

शिवसेनेतील साठमारी

By admin | Updated: April 27, 2016 05:22 IST

तंगड्यात तंगडे अडकविण्याच्या राजकारणात मश्गुल असणाऱ्या शिवसेनेत तंगडे तोडीची भाषा ऐकू येतेय.

तंगड्यात तंगडे अडकविण्याच्या राजकारणात मश्गुल असणाऱ्या शिवसेनेत तंगडे तोडीची भाषा ऐकू येतेय. विसर पडलेल्या राडा संस्कृतीची भाषा अलीकडे लोप पावत चालली होती; पण औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी आपल्याच पक्षाचे महानगरपालिकेतील सभागृहनेते राजेंद्र जंजाळ यांना ही धमकी देणे म्हणजे गजबच. त्यावर जंजाळही त्याच संस्कृतीचे. त्यांनी दुसऱ्या दिवशी उघड्या जीपमध्ये बसून खैरेंचे घर गाठले आणि असेल हिंमत तर तोडा तंगडी, असे आव्हान देण्याचा प्रयत्न केला. खैरे घरी नव्हते, नाही तर पुन्हा राडा झाला असता. तीन वर्षांपूर्वी याच खैरेंनी जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांना मारहाण केली होती. याची आठवण अजून ताजी आहे. त्यावेळी दानवे हे जायकवाडीच्या पाण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री बाळासाहेब थोरातांना अडवायला निघाले होते आणि ते खैरेंना मंजूर नव्हते. हा झाला इतिहास.खैरेंनी जंजाळांना धमकी द्यावी आणि जंजाळांनी त्यांना प्रति आव्हान द्यावे हा मराठवाड्यातील त्यापेक्षा औरंगाबादच्या शिवसेनेतील दोन फळ्यांमध्ये असलेला सत्तासंघर्ष हेच कारण आहे. गेले पावशतक हे सेनेचे औरंगाबादेतील सर्वेसर्वा म्हणून वावरतात. या पंचवीस वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आणि सेनेत अंतर्गत संघर्ष नव्हता, असेही म्हणता येणार नाही. शिवसेना आणून ती रुजवण्यासाठी राबणारे सुभाष पाटील १९९२मध्ये बाहेर पडले त्यावेळीही वादळ उठले होते. शिवसेनेसाठी हा धक्का होता. पुढे अशोक चोटलानींचे तिकीट कापून खैरेंनी विधानसभेची उमेदवारी मिळविली. त्यावेळी राडा होणार, अशी परिस्थिती होती. वादळ उठले होते; पण तेव्हा सेना जोमात आणि सैनिक जोशात होते. ‘गेले ते कावळे आणि राहिले ते मावळे,’ अशी सर्वांची धारणा होती. पुढे परशुराम वाखुरे, राधाकृष्ण गायकवाड, रमेश आमराव हे बिनीचे शिलेदार शिवसेनेतून बाहेर पडले. त्याचे तरंग उमटले; पण ही हाडाची कार्यकर्ते मंडळी एकापाठोपाठ का बाहेर पडली याचा गांभीर्याने विचार सेनेतील ज्येष्ठांनी केला नाही. कारण तोपर्यंत खैरेंचे मातोश्रीवर चांगले ट्युनिंग झाले होते. १९९५ ते ९९ हा सेनेचा औरंगाबादेतील सुवर्णकाळ आणि प्रथमच सत्तेवर आलेल्या युतीचाही. यानंतर नव्या शतकात सेनेत नव्या फळीचा उदय झाला. आता ही नवी फळी तरुण झाली; पण त्यांना कर्तृत्व दाखविण्यासाठी अवकाशच नाही. येथे घुसमटीला प्रारंभ झाला आणि सत्तेसाठी शह-काटशहाचे राजकारणही जोरावर आले. विशेष म्हणजे या पाव शतकात सेनेत मराठा नेतृत्व पणपले नाही. नामदेव पवार, अण्णासाहेब माने, संदीपान भुमरे पुढे आले; पण तालुक्यापुरतेच ठरले. यापैकी कोणी सेनेचा चेहरा बनू शकले नाही आणि सर्व सूत्रे मछलीखडकातूनच हलत राहिली. गेल्या वर्षभरापासून ही अंतर्गत धुसफूस जाहीर व्हायला लागली. धाक संपला. पालकमंत्री रामदास कदमांनी खैरेंविरुद्ध उघड भूमिका घेत त्यांची महानगरपालिकेत कोंडी केली आणि तरुण फळी सक्रिय झाली. त्याचीही कारणे आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीत सेनेने मार खाल्ला. त्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांचे संख्याबळ घटले. ही तर सेनेची एका अर्थाने नामुष्कीच होती आणि परवा झालेल्या सातारा-देवळाईच्या निवडणुकीत सेनेला एकही जागा मिळाली नाही. राजकारण आणि अर्थकारणातील हितसंबंधांना अडसर निर्माण झाला की, संघर्ष अटळ असतो आणि औरंगाबादच्या शिवसेनेत नेमके हेच घडत आहे. औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ‘समांतर’ कंपनीच्या कामात अडथळे आणण्याचे धोरण खैरे विरोधकांनी ठरविले. कारण खैरेंचा प्राण ‘समांतर’मध्येच आहे. त्याद्वारे त्यांच्या शक्तिस्थानावर विरोधक हल्ले करताना दिसतात. गेल्या अनेक वर्षांचा असंतोष आणि धुसफुशीचे रूपांतर आता उघडपणे सत्तेच्या साठमारीत झालेले दिसते. सेनेत राडा होणार नाही; पण कदमांनी बळ दिल्याने साध्या प्याद्यांनासुद्धा हत्तीचे बळ आले आहे. रंगात आलेला खेळ पूर्ण होतो की ‘मातोश्री’वरून पट उधळला जातो, हेच पाहायचे.- सुधीर महाजन