शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
2
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
3
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
4
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
5
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
7
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
10
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
11
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
12
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
13
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
14
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
15
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
16
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
17
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
18
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
19
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

ऋत आणि सत्य

By admin | Updated: March 2, 2017 00:03 IST

जीवन ही सत्यदर्शनाची आणि सत्यशोधनाची एक महान प्रयोगशाळा आहे.

जीवन ही सत्यदर्शनाची आणि सत्यशोधनाची एक महान प्रयोगशाळा आहे. विचारतत्त्वाने सांगितलेले सत्यदर्शन हे प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरविण्यासाठी ही जीवनाची प्रयोगशाळा प्राचीन कालापासून ऋषीमुनी, तत्त्ववेत्ते, समाजचिंतक, साधुसंत आणि विचारवंतांनी अखंड कार्यरत ठेवली आहे. सत्य आणि असत्य यांचेसारखे वाग्युद्ध जुंपलेले असते. भगवद्गीतेत भगवंताला ‘सत्य’ या शब्दावरून नेमके काय सांगायचे आहे? श्रीकृष्णाची सत्य वचनाची प्रतिज्ञा ही ‘ऋ त’ या कल्पनेवर आधारलेली आहे. साधारणपणे ऋत म्हणजेच सत्य असे संबोधले जाते. पण ऋत आणि सत्य या दोन संकल्पना आहेत. ऋत शब्दाचा अर्थ आहे विश्वव्यापक नियम.विश्वातली व्यवस्था, प्रतिष्ठा, नियमन यांना कारणीभूत असलेले आणि सकल सृष्टीच्या आधी उत्पन्न झालेले तत्त्व म्हणजे ‘ऋत’ होय. आकाशातल्या असंख्य तारका, प्रात:काली उगवणारा सूर्य, एका मागून एक येणारे दिवस-रात्र, ऋतूंचे कालचक्र, सृष्टीतील सुसंबद्धता, सुसूत्रता या सर्व घटनांच्या मागे नित्य-सत्य दडलेले आहे. म्हणजे या घटना घडणारच आहेत आणि त्या नित्य आहेत. हे त्रिवार सत्य आहे. सत्याची ही संकल्पना म्हणजे ‘ऋत’ होय. उपनिषदांमध्ये ऋताच्या सर्व कल्पना या सत्याच्या परिभाषेत मांडल्या आहेत. प्राचीन ऋषींनी उपनिषदकाळात अंतिम सत्य आणि त्याची प्राप्ती करून घेण्यासाठी ‘ऋत’ या तत्त्वाचाच आधार घेतला आहे.‘‘ऋतं सत्यं परं ब्रह्म’’ या उपनिषदातील वचनाप्रमाणे ऋत हे सत्य आणि ब्रह्म म्हणजे अविनाशी म्हणजेच न बदलणारे असे आहे. शाश्वत धर्म आणि विश्वनियामकत्व हे ‘ऋत’ या संकल्पनेचे मूळ आहे. जीवनात ऋताचे पालन करणे म्हणजे सत्य होय. संत एकनाथांनी भागवतात ‘ऋत’ ही संकल्पना अधिक स्पष्ट केली आहे. ‘‘ऋत म्हणजे ते ऐसे येथ। सत्य वाचा जे श्रोत्यांचे हित। तेही दु:खसंबंधरहित। ऋत निश्चित या नाव।।’’ (नाथ भागवत १९/४६४)दु:खसंबंधरहित म्हणजे कोणताही पूर्वीचा स्वार्थ, आपलेपणा किंवा इतरही गोष्टींपासून पूर्णपणे त्रयस्थ अशी हित करणारी जी सत्यवाणी तिलाच ‘ऋत’ असे म्हणतात. ऋत हा शब्द आता प्रचारात राहिलेला नाही पण ‘अनृत’ हा शब्द कधी कधी वापरात येतो. भगवद्गीतेतील भगवान श्रीकृष्णाचा धर्म हा ऋताधिष्ठित आहे. खरे की खोटे यापेक्षा परिणामकारक सत्य काय आहे हे सांगणारे - ‘ऋताधिष्ठित सत्य’ पालनासाठी भगवान श्रीकृष्ण उभा ठाकला आहे. मनुष्याच्या अंत:करणातील नैतिक सत्य आणि विश्वशक्तीच्या अस्तित्वाला आणि व्यापाराला प्रेरक असणारे सत्य एकच असून तेच ‘ऋत’ होय. तेच विश्वात ब्रह्मरूपाने वावरते आहे. ते सर्वव्यापी आहे हे समजणे म्हणजे सत्यशोधन होय.-डॉ. रामचंद्र देखणे