शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

सत्यशोधक समाज संघटनेला नवसंजीवनी हवी

By admin | Updated: February 15, 2017 23:47 IST

महात्मा जोतिबा फुले सामाजिक, आर्थिक समतेचे रणशिंग फुंकणारे आद्य समाज सुधारक होते. चोहोबाजूंनी परिस्थिती प्रतिकूल असताना

महात्मा जोतिबा फुले सामाजिक, आर्थिक समतेचे रणशिंग फुंकणारे आद्य समाज सुधारक होते. चोहोबाजूंनी परिस्थिती प्रतिकूल असताना महात्मा फुले यांनी सामाजिक विषमतेविरूद्ध, धर्मांध सत्तेविरुद्ध, धार्मिक दहशतवादाविरुद्ध ज्या धैर्याने लढा दिला त्याला इतिहासात तोड नाही. सनातनी शक्तींनी, पुरोहितशाहीने लादलेल्या धार्मिक गुलामगिरीच्या जोखडातून शूद्र व अतिशूद्रांची त्यांनी मुक्तता केली. स्त्री शिक्षणाचेच नव्हे तर स्त्रीमुक्तीचेही ते जनक आहेत. स्वातंत्र्य, बंधुत्व, समता, न्याय, मानवता ही मूलतत्त्वे असलेल्या सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी २४ सप्टेंबर १८६३ रोजी केली. परंपरेने लादलेला धर्म खरा धर्म नसून सत्य, समता व मानवतेवर आधारित तो खरा धर्म होय. मूर्तिपूजा, कर्मकांड, पुनर्जन्म, मोक्ष इत्यादि मानवनिर्मित संकल्पना सामाजिक, आर्थिक विषमता जोपासणाऱ्या असल्याने त्याज्य आहेत. जातिव्यवस्था समाजविघातक असल्याने नष्ट व्हावयास हवी. दैववाद झुगारून विज्ञाननिष्ठ बुद्धी, प्रामाण्यवादी, सुधारणावादी समाजरचनेची निर्मिती, दलित, आदिवासी आदि तळागाळातील वंचित घटकांच्या उत्थानाप्रती कृतिशील राहणे इत्यादि स्थूलमानाने सत्यशोधक समाजाची धारणा आहे. सत्यशोधक समाजाच्या स्थापनादिनाचे औचित्य साधून प्राचार्य डॉ. वामन जगताप यांनी ‘लोकमत’मध्ये (२४ सप्टेंबर २0१६) सत्यशोधक समाजाच्या वाताहतीबाबत समर्पक कारणमीमांसा केली आहे. त्यांनी नमूद केलेल्या कारणाव्यतिरिक्त इतरही कारणे आहेत. दिवंगत आमदार रायभान जाधव यांनी औरंगाबाद येथे १९८९ मध्ये संघटनेची अखिल भारतीय सत्यशोधक समाज नावाने चॅरिटी कमिशनरकडून नोंदणी करून घेतली. त्यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारिणीस तसेच बनविण्यात आलेल्या घटनेस चॅरिटी कमिशनरची मंजुरीही मिळाली. रायभान जाधव यांच्यानंतर आजपर्यंत सत्यशोधक समाजाचे पाच अध्यक्ष झाले परंतु त्यांनी चॅरिटी कमिशनकडून चेंज रिपोर्ट मंजूर करून घेतले नाहीत. त्यामुळे गेल्या १५-२0 वर्षांत सदस्य नोंदणी झाली नाही. सदस्य नोंदणीच नसल्यावर संघटना कशी वाढणार? संघटनेत कॅडर नाही. संघटनेसाठी वेळ देणारे १0-१५ कार्यकर्तेही नाहीत. चेंज रिपोर्ट मंजुरी नसल्यामुळे पदाधिकाऱ्यांना निधी, देणग्या गोळा करता येत नाही. परिणामी संघटनेच्या खात्यात निधी नाही. संघटनेकडे स्थावर मालमत्ता नाही. १, २ ठिकाणचे अपवाद वगळता कोठेही कार्यालय नाही. युवकांचा, महिलांचा संघटनेत सहभाग नाही. त्यांना आकर्षित करण्यासाठी कोणतेही उपक्रम चालविले जात नाहीत. हैदराबाद विद्यापीठात आत्महत्त्या केलेला रोहित वेमुल्ला खरे तर तत्त्वचिंतक होता. आत्महत्त्यापूर्व चिठ्ठीत त्याने असे म्हटले की, दलित समाजात त्याचा जन्म एक अपघात आहे. त्याचे हे विधान वैश्विक सत्य आहे. प्रत्येकाचा जन्म एक जैविक योगायोग आहे, म्हणजे एक प्रकारे अपघातच आहे. कोण्या जातीत जन्म घेणे कोणाच्याही हाती नाही. उच्च, संपन्न जातीत जन्म झालेल्यांनी कनिष्ठ, विपन्न जातीतील घटकांना विषम, हीन वागणूक देणे केव्हाही निषेधार्ह आहे. दुसरे असे की, कोण्या जातीत जन्म घेणे आपल्या हाती नसले तरी जात तोडणे आपल्या हाती आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांनी सुचविलेल्या आंतरजातीय विवाहाद्वारे आपण जात तोडू शकतो. आपल्या आईवडिलांनी आपला विवाह सजातीय लावला असेल तर आपल्या मुला-मुलींचे आंतरजातीय विवाह आपण लावू शकतो. तसे करण्यास त्यांना उद्युक्त केले पाहिजे. निदान सत्यशोधकाकडून असे करणे अपेक्षित आहे. पण चित्र असे दिसते की, सार्वजनिक किंवा संघटनेच्या विचारमंचावर सत्यशोधक म्हणून मिरविणारे बहुसंख्य सत्यशोधक जातीची चौकट सोडण्यास तयार नाहीत हे प्रकर्षाने जाणवते. त्यांच्याकडून होणाऱ्या बेटीव्यवहारात जातीच्या अभिनिवेशात वाढणारे सत्यशोधक महामानवांना अभिप्र्रेत जातिअंताचे उद्दिष्ट कसे पूर्ण करणार? २-३ वर्षाला सत्यशोधक समाजाची अधिवेशने होत असतात. या अधिवेशनात शेती व शेतकऱ्यांची दुरवस्था, खासगीकरण, सत्यशोधकीय जलसे इत्यादि साचेबंद विषय वरचेवर हाताळले जातात. घाम गाळणारे मजूर, अल्पभूधारकांच्या व्यथा, जातिअंत, दलित अल्पसंख्याकांवर होत असलेले अन्याय, अत्याचार, राज्यकर्त्यांकडून, शिक्षणसम्राटांकडून होत असलेला भ्रष्टाचार असे महत्त्वाचे विषय चर्चिले जात नाहीत.अधिवेशनात फुले, शाहू, आंबेडकर आदि महामानवांच्या विचारावर वक्ते पांडित्यपूर्ण सैद्धांतिक मांडणी करतात. पण त्या अनुषंगाने सत्यशोधकांचे आचरण व कृती नसते. घटनेतील मूल्ये व उद्दिष्टाप्रती सत्यशोधकांची अढळ निष्ठा असावी. दांभिक वर्तन नसावे. संघटनेच्या विचारमंचावरून महात्मा फुले यांच्यावर प्रवचन झोडणारे प्राध्यापक आपल्या मुला-मुलींचा विवाह सत्यशोधक पद्धतीने न लावता ब्राह्मणी पद्धतीने लावल्याची उदाहरणे आहेत. सत्यशोधक म्हणून मिरविणारे ब्राह्मणाची कास धरतात असा आरोप प्रा. जगताप करत असतील तर त्यांचे कुठे चुकले? सत्यशोधक समाजाच्या घटनेत सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक परिवर्तनाबाबत भरीव लेखनकार्य करणाऱ्या व्यक्तींना महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे प्र्रत्येकी २५००० रुपयांची पारितोषिके दरवर्षी दिली जावीत असा उल्लेख आहे, पण अशी पारितोषिके आजवर कोणालाही दिली गेली नाहीत. संघटना जातिनिरपेक्ष, धर्मनिरपेक्ष, सर्वसमावेशक असावी पण सत्यशोधक समाजाच्या संघटनेत या बाबींचा अभाव दिसतो. त्यामुळे दलित, बौद्ध, मागासवर्गीयांच्या संघटना सत्यशोधक समाजापासून अंतर ठेवून आहेत. सत्यशोधक समाजाच्या उत्थानासाठी बैठकीत परखड मते व्यक्त करणाऱ्यांना दूर सारले जाते. या प्रवृत्तीमुळे प्रा. गजमल माळी, शरद पाटील, मा. म. देशमुख, नागेश चौधरी यांच्यासारखे खरे सत्यशोधक संघटनेपासून अलिप्त झाले. संघटनेच्या वृद्धीसाठी ज्यांनी आर्थिक किंवा अन्य स्वरूपात साहाय्य केले त्यांची अवहेलना प्रसंगी अवमान केल्याच्या घटनांमुळे आश्रयदातेही संघटनेकडे फिरकेनासे झाले. या बाबीसुद्धा सत्यशोधक संघटनेच्या अधोगतीस कारणीभूत आहेत.जातिनिहाय मोर्चे निघणे म्हणजे महामानवांच्या विचारांचा, कार्याचा पराभव आहे. हे मोर्चे थोपविण्याच्या दृष्टीने सत्यशोधक संघटनेचे कसलेही प्रयत्न नाहीत. उलट नुकतेच ८ डिसेंबरला लातूर येथे झालेल्या अधिवेशनाच्या प्रास्ताविकेत नमूद केले गेले की, हे मोर्चे जातिअंताच्या दिशेने आहेत. संघटनेची ही भूमिका धक्कादायक आहे. वस्तुत: जातिनिहाय मोर्चामुळे जातिपाती घट्ट होत आहेत. अशा विसंवादी भूमिकेमुळे संघटनेस हानी पोहोचत आहे. सध्या देशभर सनातनी प्रवृत्तींचे प्राबल्य वाढले आहे. सामाजिक विषमतेवर आधारित जुनी वैदिक संस्कृती लादण्याचे प्रयत्न होत आहेत. याविरुद्ध लढा देण्यासाठी सत्यशोधक समाजासारख्या संघटनांची नितांत गरज आहे. सत्यशोधकांनी प्रस्तुत विवेचनात दर्शविलेल्या उणिवा दूूर करून संघटनेला कृतिशील, गतिशील व सामर्थ्यशाली बनवावे अन्यथा प्रा. वामन जगताप यांनी म्हटल्याप्र्रमाणे संघटनेची अवस्था रुग्णशय्येवर खिळलेल्या रुग्णाप्रमाणेच राहील.-अ‍ॅड. डी. आर. शेळके (ज्येष्ठ विधिज्ञ)