शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

सगुण-प्रासादिक भावदर्शन

By admin | Updated: August 25, 2016 06:32 IST

उपासनामार्गात सगुणोपासना ही सहज समजणारी आणि परमात्म्याशी सहजपणे अनुसंधान साधणारी आहे

उपासनामार्गात सगुणोपासना ही सहज समजणारी आणि परमात्म्याशी सहजपणे अनुसंधान साधणारी आहे. भक्तीचे प्रयोजन एकच की, परमात्म्याशी एकरुप होणे. निर्गुण हे ज्ञानमय आहे तर सगुण हे प्रेममय. सगुण हे भावनामय आहे. सगुणामध्ये ओलावा आहे. संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकोबाराय आपल्या अभंगात म्हणतात...आवडे हे रुप गोजिरे सगुण।पाहता लोचन सुखावले।।आता दृष्टीपुढे ऐसाचि तू राहे।तो मी तुज पाहे वेळोवेळा।।देवा तुझे गोजिरे सगुणरुप मला फार आवडते. ते पाहाताना माझे डोळे सुखावतात. हे पांडुरंगा आता माझ्या डोळ्यासमोर तू असाच राहा, म्हणजे मी तुला वेळोवेळी पाहीन. तुझ्या रुपाला पाहाण्यासाठी माझे मन लांचावले आहे. हे तुकोबारायांच्या अंतर्मनाचे प्रासादिक भावदर्शन आहे. सगुण परमात्म्य विषयीचा उत्कट भाव त्यातून प्रगट होत आहे. पुढे दुसऱ्या एका अभंगात तुकोबाराय म्हणतात...अद्वैती तो नाही माझे समाधान।गोड हे चरण तुझी सेवा।अद्वैत स्थितीमध्ये माझे समाधान होत नाही. तुझी चरणसेवा करणेच मला गोड वाटते. मला या स्थितीतून वेगळा कर आणि देवभक्तातील सुखाचा सोहळा दाखव. तुझ्या सगुणरुपाचे वर्णन करणाऱ्या तुझ्या नामसंकिर्तनाचेच उचित दान मला दे. सगुणोपासना म्हणजे षङ्गुणऐश्वर्यसंपन्न भगवंताची त्याच्या विशिष्ट रुपाला धरून केलेली पूजा, उपासना किंवा संकीर्तन होय. संकीर्तन हे निर्गुण तत्वाचेही करता येते. ते गुणसंकीर्तन होते तर सगुणाचे कीर्तन हे लीला संकीर्तन होय. सगुण रुपात प्रत्येक इंद्रिय भगवंताची सेवा करून शुद्ध होता येते.घेई घेई माझे वाचे।गोड नाम विठोबाचे।डोळ्यांनी हरिरुप पाहावे. कानांनी हरिकथा ऐकावी. मुखाने नाम उच्चारावे. पायाने तीर्थयात्रा करावी, हाताने टाळी वाजवावी आणि संकीर्तनाची गुढी उभारावी. फुले ही देवाला वाहायची असतात. फुलांच्या माळा स्वत:च्या गळ्यात घालायच्या नसतात. इंद्रिये ही फुले आहेत. ती परमात्म्यालाच वाहायची आहेत. इंद्रियाचा उपयोग ईश्वराच्या आणि मानव्याच्या सेवेत करायचा आहे. प्रत्येक इंद्रिय हे परमात्म्याकडे धावणे ही केवढी मोठी उपासना. म्हणून सगुण उपासकाला इंद्रिये हे साधनरुप आहेत. संतश्रेष्ठ तुकोबाराय एका ठिकाणी म्हणतात, ‘मला ब्रह्मज्ञान नको, आत्मविश्वास नको, मी भक्तच राहू दे आणि तू देवच. म्हणजे मला सेवेच्या रुपाने तुझी प्रेमभक्ती करता येईल आणि माझे जीवनच या प्रेमभक्तीने आणि सेवेने निर्मळ गंगा होऊन जाईल’. अर्थात सगुणाचे सामर्थ्य काही वेगळेच.-डॉ. रामचंद्र देखणे