शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पत्रमहर्षी अनंत भालेरावांचे स्मरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 01:59 IST

मराठवाड्याच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक नि विशेषत: पत्रकारितेच्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठळक ठसा उमटविणाऱ्या पत्रमहर्षी अनंत भालेरावांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे.

- बी.व्ही. जोंधळेआंबेडकरी चळवळीचे अभ्यासकमराठवाड्याच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक नि विशेषत: पत्रकारितेच्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठळक ठसा उमटविणाऱ्या पत्रमहर्षी अनंत भालेरावांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. वारकरी कुटुंबात जन्माला आलेल्या अनंतरावांवर भागवत धर्माचे संस्कार झाले होते हे खरे; पण त्यांची खरी वैचारिक जडणघडण झाली ती हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या लढ्यातच. स्वामी रामानंद तीर्थ हे अनंत भालेरावांचे श्रद्धास्थान असल्यामुळे त्यांच्या बोलण्या-लिहिण्यातून स्वामी रामानंद तीर्थांविषयीचा आदरभाव पदोपदी व्यक्त झालेला दिसतो. पत्रकारितेबरोबरच एक शिक्षक, एक फर्डा, पल्लेदार वक्ता, एक उत्तम राजकीय कार्यकर्ता, अशा विविधांगी भूमिकाही त्यांनी समर्थपणे पेलल्या.नेहमी हसतमुख असणारे अनंतराव अतिशय स्पष्टवक्ते होते. जे पटेल ते समोरच्याची भीडभाड न ठेवता ते बोलून मोकळे होत असत. त्यांचा जनसंपर्क अफाट असल्यामुळे त्यांचा संपादकीय दरबार सदोदित सर्वांसाठी मोकळा असायचा. अनंतराव अष्टपैलू खरे; पण त्यांनी ‘मराठवाड्या’चे संपादक म्हणून जी लढाऊ पत्रकारिता केली ती दीर्घकाळ स्मरणात राहील, अशीच आहे. हैदराबाद मुक्तिसंग्रामातील सेनानी आ.कृ. वाघमारे यांनी १० फेब्रुवारी १९३८ ला‘मराठवाडा’ साप्ताहिकाची मुहूर्तमेढ रोवली होती; पण निजाम सरकारने ‘मराठवाडा’वर बंदी आणल्यामुळे वाघमारे यांनी मग निरनिराळी ११ नावे धारण करून ‘मराठवाडा’ सुरू ठेवला. निजामविरोधी लिखाणामुळे आ.कृ. वाघमारे यांच्यावर राजद्रोहाचा खटला होऊन त्यांना दीड वर्षाची शिक्षाही झाली. अशा या लढाऊ ‘मराठवाडा’ साप्ताहिकाचे अनंतराव १९५३ साली संपादक झाले. आ.कृ. वाघमारे यांचा लढाऊबाणा त्यांनी साप्ताहिक ‘मराठवाडा’, अर्धसाप्ताहिक ‘मराठवाडा’ व पुढे दैनिक ‘मराठवाडा’तून कायम जोपासला. संपादक म्हणून भालेरावांच्या आयुष्यात अनेक वादळे निर्माण झाली; पण या वादळांना न डगमगता त्यांनी ती धीरोदात्तपणे सहन केली. ‘मराठवाडा’ अर्धसाप्ताहिकातून भालेराव यांनी पन्नालाल सुराणा यांचा साखर कारखान्यासंदर्भात एक लेख छापला होता. लेखात असा आरोप करण्यात आला होता की, साखर कारखान्यात पोत्यामागे २ रुपये कापून घेतात. या आरोपाचा रोख तत्कालीन पुरवठामंत्री होमी तल्यारखान यांच्या दिशेने होता. त्यांनी भालेराव-सुराणांवर अब्रूनुकसानीचा खटला दाखल केला. खटल्याच्या कामकाजाच्या बातम्या वृत्तपत्रातून प्रसिद्ध होऊ नयेत म्हणून होमी तल्यारखान यांच्या मागणीनुसार हा खटला इनकॅमेरा चालविण्यात आला. भालेराव-सुराणांना ३ महिने तुरुंगवासाची शिक्षा झाली. भालेराव-सुराणांनी माफी मागितली तर त्यांची शिक्षा माफ करण्यात येईल, असा देकारही सरकारने दिला होता; पण तो नाकारून भालेराव-सुराणांनी आम्ही केलेले आरोप सिद्ध करू शकलो नाही, अशी भूमिका घेऊन तुरुंगवास पत्करला. शिक्षा भोगून जेव्हा भालेराव-सुराणा बाहेर आले तेव्हा लोकांनी त्यांचे उत्स्फूर्त जंगी स्वागत केले. ठिकठिकाणी सत्कार झाले; पण या स्वागताने हुरळून न जाता ‘ठेवितो हा पायी जीव थोडा’ या मथळ्याचा अग्रलेख लिहिताना भालेरावांनी ‘या तुरुंगवासाने नव्या भ्रमात अडकण्याचा प्रमाद आम्ही करणार नाही’ असे म्हटले. तात्पर्य, जमिनीवर पाय असणारा हा लढाऊ संपादक होता. १९७५ साली आणीबाणीविरुद्ध सत्याग्रह करून त्यांनी १५ महिन्यांचा तुरुंगवास भोगला. लढाऊपणा हा अनंतरावांच्या पत्रकारितेचा बाणा असल्यामुळे ‘मराठवाडा’ म्हणजे भालेराव, असे समीकरणच महाराष्टÑात रूढ झाले होते.अनंत भालेरावांनी प्रारंभी ‘मराठवाडा’ पत्रातून दलितांच्या प्रश्नांना भरीव स्थान दिले होते. दलित साहित्याची चर्चा करणारा पहिला दिवाळी अंकही त्यांनी प्रसिद्ध केला होता; पण नामांतराचा प्रश्न जेव्हा आला तेव्हा त्यांनी मराठवाड्याच्या अस्मितेच्या नावाखाली नामांतरास विरोध केला. लोकशाहीनुसार लोकप्रतिनिधींनी विधिमंडळात एकमताने संमत केलेला नामांतराचा ठराव नाकारला. मराठवाड्याच्या अस्मितेने खेडोपाडी दलितांवर मन हेलावणारे अत्याचार केले; पण याचा खेद कोणाही नामांतरविरोधकाने कधीही व्यक्त केला नाही. मराठवाड्यातील दलितांना मराठवाड्याची अस्मिता नव्हती वा नाही, असे नाही; पण नामांतरवाद्यांची अस्मिता बंधुत्वाच्या नात्याने समजून घेण्यात अनंतराव कमी पडले. हैदराबाद मुक्तिसंग्रामात दलितांनी भाग घेतला; पण मुक्तिसंग्रामाचा इतिहास लिहिताना अनंतरावांनी दलित स्वातंत्र्यसैनिकांची साधी नोंदही घेतली नाही. पत्रकार आणि इतिहासकार म्हणून भालेरावांनी दलित समाजास न्याय दिलाच नाही, ही खंत आंबेडकरानुयायांच्या मनात कायम घर करून राहिली; पण याची जाणीव पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्यावरही अनंतरावांच्या समर्थकांना अजूनही होत नाही. अनंतरावांच्या नामांतरविषयक भूमिकेचा विपर्यास करण्यात आला, असे ते अजूनही म्हणतात. ही बाब खेदजनकच म्हटली पाहिजे. बाकी अनंतराव पत्रकार म्हणून मोठेच होते. त्यांचे मराठवाडा प्रेम वादातीत होते, याविषयी शंकाच नाही.

टॅग्स :Journalistपत्रकार