शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

आर्थिक मुद्द्यांची लोकप्रिय मांडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 05:01 IST

रोजगाराच्या संधी हा संपूर्ण निवडणूक काळात एक महत्त्वाचा मुद्दा होता. एकीकडे नोकऱ्यांमध्ये मोठी घट झाली आहे, असे मोदी यांचे विरोधक सांगत होते, तर दुसरीकडे नोकऱ्यांत वाढ झाल्याचे मोदी भाषणातून सांगत होते.

लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआला मिळालेल्या अभूतपूर्व विजयात आर्थिक मुद्द्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या निवडणुकीचे निकाल निश्चित करण्यात आर्थिक कारणे विशेष प्रभावी राहिली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपूर्ण लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराकडे दृष्टिक्षेप टाकला, तर असे लक्षात येते की, त्यात रोजगारवाढ, अर्थव्यवस्था गतिमान करणे, कृषी, ग्रामीण विकास, पायाभूत सुविधांचा विकास, व्यापारीहित आणि महागाईवर नियंत्रण, हे मुद्दे वारंवार समोर आलेले दिसतात.

निश्चितपणे देशाच्या स्वातंत्र्यानंतर १६व्या लोकसभा निवडणुकीपर्यंत कुठे ना कुठे आर्थिक ऐरणीवर येत राहिले होते. परंतु १७व्या लोकसभा निवडणुकीत आर्थिक मुद्दे आणि ‘सबका विकास’ यासारखे नारे गेल्या काही लोकसभा निवडणुकीच्या मानाने अधिक प्रभावी राहिले आहेत. मागच्या अनेक निवडणुकांवर प्रामुख्याने जमीनदारी प्रथा नष्ट करणे, बँकांचे राष्टÑीयीकरण, गरिबी हटाव, रोजगार हमी, भूमी अधिग्रहण, शेतकरीहित, भ्रष्टाचार हटाव यासारख्या मुद्द्यांनी निवडणूक निकाल प्रभावित केले आहेत. अशा स्थितीत जगातील सर्वात जास्त विकास दर आणि वाढती गंगाजळी, विक्रमी निर्यात, जगातील गुंतवणूकदारांचा भारतातील वाढता आर्थिक विश्वास, यासारख्या मुद्द्यांनी १७व्या लोकसभा निवडणुकीत मोठा प्रभाव टाकला आहे.नरेंद्र मोदी यांची उचललेली आर्थिक पावले देशासाठी चांगली आहेत आणि त्यामुळे भारत एक बळकट देश म्हणून जगात आपला नावलौकिक करू शकतो, असे कोट्यवधी मतदार सांगत असल्याचे यावेळी पाहायला मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लागू केलेली नोटाबंदी आणि जीएसटीमुळे सुरुवातीला त्रास झाला असला, तरी त्याचे फायदे नंतर दिसू लागले आहेत आणि पाकिस्तानसह जगातील अनेक देशांमध्ये महागाई वाढली, तरी भारतात ती आटोक्यात आहे, हे मतदारांच्या मनावर बिंबविण्यात सत्तारूढ पक्षाला यश आले. याबाबत मोदी यांनी सातत्याने केलेल्या वक्तव्यांचाही कोट्यवधी मतदारांवर प्रभाव पडला.

देशातील रोजगाराच्या संधी हा संपूर्ण निवडणूक काळात एक महत्त्वाचा मुद्दा बनून राहिलेला होता, यात कसलेही दुमत नाही. एकीकडे देशातील नोकºयांमध्ये मोठी घट झाली आहे, असे मोदी यांचे विरोधक सांगत होते, तर दुसरीकडे देशात रोजगाराच्या संधी आणि नोकºयांत वाढ झाल्याचे मोदी आपल्या भाषणातून आवर्जून सांगत होते. १७ कोटी लोकांना मुद्रा लोन योजनेंतर्गत सुलभ कर्ज देऊन स्वयंरोजगार आणि उद्योगांना चालना देण्यात आली आहे. सोबतच कर्मचारी भविष्य निधी योजनेंतर्गत संघटित क्षेत्रातील लोकांना रोजगार मिळाल्याची आकडेवारीही प्रभावीपणे मतदारांसमोर मांडण्यात मोदींना यश आले आहे.

नव्या पिढीला आकर्षित करण्यासाठी मोदी सरकारने रोजगार निर्मितीच्या अनेक घोषणाही याच काळात केल्या. शेतकरी आणि गरिबांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा करण्याची योजनाही मोदी यांच्या लोकप्रियतेत वाढ करणारी ठरली.डॉ. जयंतीलाल भंडारी(अर्थतज्ज्ञ)