शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Earthquake : ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
2
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
3
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
4
Sonam Raghuvanshi : बेवफा सोनमवर चित्रपट येणार, 'हे' नाव असणार; दिग्दर्शकाने घेतली राजा रघुवंशीच्या भावाची भेट
5
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Sensex १९० अंकांपेक्षा जास्त वधारला, 'या' शेअर्समध्ये तेजी
6
शेजारी राहणाऱ्या महिलेवर केले वार, गुप्तांगावरही ओरबाडलं अन् जंगलात फेकून दिलं! तरुण का झाला हैवान?
7
राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले, उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर कधी जाणार? ‘ते’ मुहूर्त तर हुकले, आता...
8
पोस्टाची 'ही' स्कीम हलक्यात घेऊ नका; थोडी थोडी गुंतवणूक करून जमवू शकता १७ लाखांचा फंड
9
खळबळजनक! HIV पॉझिटिव्ह अन् कर्जबाजारी होता भाऊ; रक्षाबंधनाच्या आधी बहीण झाली निष्ठूर
10
विवाहित पुरुषापासून दूर रहा...! कोर्टाचा महिलेला अजब आदेश, स्वत: विवाहित होती, तरी तिला...
11
नेपाळमध्ये ISI उभं करतंय नेटवर्क, 'बांगलादेशी मॉडेल'चा वापर; 'असा' रचला जातोय भारताविरोधी कट
12
अरे देवा! मुलगा वर्गात झोपला अन् शाळेला कुलूप लावून शिक्षक गेले घरी, जाग आल्यावर घाबरून...
13
९ महिन्यापूर्वी लव्ह मॅरेज अन् आज फेसबुकवर शेवटचा मेसेज लिहून जोडप्यानं संपवलं आयुष्य
14
शिवानी सोनारने घरी आणली Tata कंपनीची नवी कोरी कार, गाडीची किंमत माहितीये?
15
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
16
दागिन्यांनी मढवलेल्या पत्नीला बुलेटच्या टाकीवर बसवून फिरवलं, पोलिसांनी थेट १६००० हजारांचं चलान कापलं!
17
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
18
नात्यांना काळीमा फासणारी घटना; रेशन कार्ड बनवण्याच्या बहाण्याने घेऊन गेला अन् बायको पोरांना विकून आला!
19
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
20
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी

वेध - झंडा उँचा रहे हमारा...!

By admin | Updated: May 4, 2017 00:11 IST

कोल्हापूरच्या माणसाच्या गुणवैशिष्ट्यांचे सर्वांत उत्तम वर्णन ज्येष्ठ नेते शरद पवार नेहमीच करीत असतात. ते म्हणायचे की, कोल्हापूरचा

 कोल्हापूरकर जनतेच्या वतीने  राज्याचे महसूलमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या उंचीचा तिरंगा ध्वज उभारण्यात आला आणि एका नव्या ऐतिहासिक क्षणाची नोंद झाली. कोल्हापूरच्या माणसाच्या गुणवैशिष्ट्यांचे सर्वांत उत्तम वर्णन ज्येष्ठ नेते शरद पवार नेहमीच करीत असतात. ते म्हणायचे की, कोल्हापूरचा माणूस हा कोल्हापुरी गुळाप्रमाणे गोड आहे. तो एकदा कौतुक करू लागला की, डोक्यावर घेऊन नाचू लागेल. जर का, कोणी त्याच्याबरोबर पंगा घेतला, तर त्याला केव्हा फेकून देतील हेदेखील कळणार नाही. हे अनेक अर्थाने खरे आहे. प्रचंड हौशी, अमाप उत्साही आणि उत्सवप्रिय माणूस म्हणजे कोल्हापूरकर. कोणतीही गोष्ट करायची, तर ती मन लावून करायची, त्याच्यावर जिवापाड प्रेम करायचे. प्रत्येक गोष्ट करताना ती नंबर एकच असली पाहिजे आणि त्याचा कोल्हापूरकर म्हणून सतत सार्थ अभिमानही बाळगण्यात तो हयगय करीत नाही. हा सर्व कोल्हापूरकर असल्याचा गुणधर्म सांगण्याचे कारण की, चार दिवसांपूर्वी साजरा झालेल्या महाराष्ट्र दिना दिवशी कोल्हापुरात हजारो लोकांच्या साक्षीने एक ऐतिहासिक क्षण उजाडला. कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती असलेल्या पोलीस मुख्यालयासमोर देशातील सर्वात उंचीचा, द्वितीय क्रमांकाचा ध्वज उभा करण्यात आला आहे. हा ध्वज तीनशे तीन फुटांवर १ मे रोजी ५ वाजून ५८व्या मिनिटाला सूर्योदयासमयी फडकविण्यात आला. त्याचे औपचारिक उद्घाटन दुपारी झालेल्या भव्य-दिव्य कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.कोल्हापूरला अनेक ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या आहेत. ते कलेचे माहेरघर आहे. मराठी चित्रपटसृष्टीची नगरी आहे. कुस्तीची पंढरी आहे. उद्योगाची जननी आहे. निसर्गाने नटलेल्या सह्याद्रीच्या कुशीतील उत्तम हवामान आहे. सर्वात महत्त्वाचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य निर्मितीच्या इतिहासाची पाशर््वभूमी लाभली आहे. महाराणी ताराबाई यांच्या पराक्रमाची भूमी आहे. महाराष्ट्राला सामाजिक क्रांतीची प्रेरणा देणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांची नगरी आहे. ही सर्व परंपरा आणि या सर्व कला दैनंदिन जगण्यामध्ये मनापासून अभिमान म्हणून जपण्याचा प्रयत्न कोल्हापूरकर माणूस करतो. हेच त्याचे वैशिष्ट्य आहे. कर्तबगारी करणाऱ्यांवर मनापासून प्रेम करणारा आणि दगाबाज भेटला, तर त्याला फेकून देणारा कोल्हापूरकर आहे. याच परंपरेत कोल्हापूरकर जनतेच्या वतीने राज्याचे महसूलमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या उंचीचा तिरंगा ध्वज उभारण्यात आला आहे. यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पुढाकार घेतला आणि एका नव्या ऐतिहासिक क्षणाची नोंद झाली.यापूर्वी भारत-पाकिस्तान सीमेवर वाघा बॉर्डरवर देशातील सर्वात उंच तिरंगा ध्वज फडकतो आहे. त्यानंतरचा हा द्वितीय क्रमांकाचा ध्वज राहणार आहे. ही संकल्पना काही महिन्यांपूर्वीच मांडण्यात आली आणि तातडीने त्याची अंमलबजावणी करण्यात आली. कोल्हापूरला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. वाढते शहर आहे. पर्यटनासाठी उत्तम ठिकाण आहे. त्यामुळे या शहरामध्ये अनेक जुन्या आठवणी आणि आकर्षणाबरोबरच नवीन काही तरी उभे करावे, जेणेकरून देशभरात कोल्हापूरचे नाव अभिमानाने घेतले जाईल यासाठी हा प्रयत्न करण्यात आला. कोल्हापूरच्या परंपरेला साजेसा असाच हा निर्णय होता. चित्रनगरीची उभारणी ही वेगाने चालू आहे. कोल्हापूर हे कोकणला रेल्वेने जोडले जाणार आहे. त्याचे कामही लवकरच सुरू होत आहे. विमानसेवा सप्टेंबरमध्ये सुरू होणार आहे. एका दृष्टीने कोल्हापूरचा झेंडा अधिक उंच उंच फडकावा यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्यावर कोल्हापूरच्या जनतेचेसुद्धा मनापासून प्रेम आहे.- वसंत भोसले