शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
2
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
3
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
4
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
5
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
6
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
7
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
8
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
9
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
10
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
11
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
12
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
13
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
14
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
15
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
16
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
17
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
18
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
19
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
20
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 

हे दुखणे केवळ शेतकरीवर्गाचे नव्हे!

By admin | Updated: March 21, 2017 00:14 IST

रविवारी राज्यात अन्नत्याग आंदोलन राबविण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील साहेबराव करपे या सधन शेतकऱ्याने

रविवारी राज्यात अन्नत्याग आंदोलन राबविण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील साहेबराव करपे या सधन शेतकऱ्याने १९ मार्च १९८६ रोजी कुटुंबातील सर्व सदस्यांसह आत्महत्त्या केली होती. त्या कुटुंबाच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे आंदोलन करण्यात आले.करपे कुटुंबाची सामुदायिक आत्महत्त्या हे शेतकरी आत्महत्त्येचे राज्यातील पहिले प्रकरण मानल्या जाते. शेतकरी संघटनेचे संस्थापक स्व. शरद जोशी यांनी तेव्हा चिलगव्हाणला भेट दिली होती आणि सरकारला इशारा दिला होता, की तातडीने पावले न उचलल्यास, देशात शेतकरी आत्महत्त्यांचे पीक येईल. त्यांचे ते शब्द खरे ठरल्याचे आपण गत दोन दशकांपेक्षा अधिक काळापासून बघत आहोत. अन्नत्याग आंदोलनासारख्या आंदोलनांनी शेतकरी आत्महत्त्यांना पायबंद बसणार नाही हे खरे असले तरी, असंतोषाच्या निखाऱ्यांवर राख जमू न देण्यासाठी अशा आंदोलनांची गरज असते, हेदेखील तेवढेच सत्य आहे. शेतकऱ्याच्या दैन्यावस्थेसाठी स्वत: शेतकरी नव्हे तर अन्य घटक जबाबदार आहेत आणि त्याविरुद्ध आवाज बुलंद करीत राहणे गरजेचे आहे, याची शेतकऱ्याला जाणीव करून देण्यासाठी अशी आंदोलने आवश्यकच असतात. शेती कशी करावी, हे या देशातील शेतकऱ्याला कुणी शिकविण्याची आवश्यकता नाही. पिढ्यान्पिढ्यांपासून तो ती यशस्वीरीत्या करीत आला आहे. उलट शेती कशी करावी, हे शेतकऱ्याला शिकविण्याचे प्रयोग जेव्हापासून सुरू झाले, तेव्हापासूनच शेतकऱ्याची अवस्था बिकट होत गेली. देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवायचे आव्हान शेतकऱ्याने यशस्वीरीत्या पेलून दाखविले; मात्र उत्पादन वाढवून त्याचे आर्थिक उत्पन्न काही वाढले नाही ! उलट ते घटतंच गेले अन् त्याचाच परिपाक म्हणजे शेतकरी आत्महत्त्यांचे पीक !शेतकरी आत्महत्त्या थांबवायच्या असतील तर शेतकऱ्याचे आर्थिक उत्पन्न वाढविणे याशिवाय दुसरा उपाय नाही. ते नेमके कसे साध्य करायचे, याचा मार्ग मात्र अद्यापही एकाही तज्ज्ञाला गवसलेला नाही. एव्हाना या देशाने उजवे, डावे, उजवीकडे झुकलेले मधले, डावीकडे झुकलेले मधले, अशा झाडून साऱ्या विचारसरणीची सरकारे बघितली आहेत; पण त्यापैकी एकाही विचारसरणीला शेतकऱ्याचे भले करता आलेले नाही. आम्हालाच कसा गरिबांचा, शेतकऱ्यांचा पुळका आहे, हे प्रत्येक राजकीय पक्ष घशाला शोष पडेपर्यंत ओरडून सांगत असतो. शेतकऱ्यासाठी काही ठोस पावले उचलण्याची वेळ येते, तेव्हा मात्र सारेच गारठतात!कृषिमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाल्याशिवाय शेतकऱ्याचे भले होऊ शकत नाही, अशी मांडणी राजकारणातले झाडून सारे स्वयंभू अर्थतज्ज्ञ, कृषितज्ज्ञ करतात; पण जेव्हा ते सत्तेत असतात, तेव्हा त्यांना कोण रोखते, हे एक गौडबंगालच आहे. नरेंद्र मोदी सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते, उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा, अशा रितीने किमान आधारभूत किमती वाढविण्याचे आश्वासन दिले होते. काय झाले त्या आश्वासनांचे?वस्तुस्थिती ही आहे, की भल्याभल्यांनाही अद्याप या प्रश्नाचे आकलनच झालेले नाही. त्यामध्ये अर्थतज्ज्ञ, राजकारणी, कृषी पंडित, पत्रपंडित सारेच आले. आजारच कळला नाही, तर इलाज कसा करणार? समाजाच्या सर्वच वर्गात आत्महत्त्या होतात; मात्र एकाच वर्गात हजारोंच्या संख्येने आत्महत्त्या होण्याचे दुसरे उदाहरण नाही. त्यामुळे हे केवळ शेतकरी वर्गाचे दुखणे आहे, असे मानून समाजातील इतर घटकांनी त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही; अन्यथा एक दिवस हे दुखणे संपूर्ण समाजाचाच घास घेतल्याशिवाय राहणार नाही!- रवि टाले