शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

शेजारी राष्ट्रातल्या घटना... काही शुभसूचक तर काही चिंताजनक...!

By admin | Updated: November 1, 2015 01:02 IST

हिंदू राष्ट्राचे सेक्युलर देशात रूपांतर करणारी राज्यघटना अलीकडेच नेपाळने स्वीकारली. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत, नेपाळच्या राष्ट्रपतिपदी प्रथमच विद्यादेवी भंडारी या महिला नेत्याची निवड झाली.

- सुरेश भटेवरा (राजपथावरून)हिंदू राष्ट्राचे सेक्युलर देशात रूपांतर करणारी राज्यघटना अलीकडेच नेपाळने स्वीकारली. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत, नेपाळच्या राष्ट्रपतिपदी प्रथमच विद्यादेवी भंडारी या महिला नेत्याची निवड झाली. नेपाळच्या राजकीय सामाजिक परिवर्तनाचा संकेत देणारी ही घटना आहे. नेपाळमधे गेली ३0 वर्षे डाव्या चळवळीत व स्त्री मुक्ती आंदोलनात विद्यादेवी कार्यरत आहेत. नेपाळ एक असा देश आहे की, जिथे अधिकांश महिला घरकाम अथवा अन्य लहान-मोठी कामे करून कुटुंबाची उपजीविका चालवतात. त्यांचे शोषण थांबवण्याबरोबर तरुण मुलींची तस्करी रोखण्याचे आव्हानही नव्या राष्ट्रपतींपुढे आहे. विविध संकटांनाही सध्या नेपाळ सामोरा जातो आहे.मधेशी आंदोलनाच्या नाकाबंदीमुळे, नेपाळमध्ये एका गॅस सिलिंडरची किंमत सध्या १0 हजार नेपाळी रुपये, तर पेट्रोल-डिझेलचे भाव ३ हजार प्रति लीटर असून, ते सहज उपलब्ध नाही. व्यथित नेपाळी जनता त्यामुळे सध्या पायीच हिंडत आहे. खाद्यपदार्थांच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत. भारत-नेपाळ संबंधात सध्या तणाव आहे. मधेशी आंदोलनाला भारताचा पाठिंबा असल्याचा आरोप नेपाळने केला आहे. इंधनासाठी भारतावर अवलंबून राहणे सोडून, त्याने थेट चीनशी करार केला. शेजारी राष्ट्रातल्या या ताज्या घटना भारतासाठी नक्कीच चिंताजनक आहेत. पाकिस्तान आणि नेपाळ भारताची दोन शेजारील राष्ट्रे. नुकत्याच तिथे ज्या घटना घडल्या त्यातल्या काही शुभसूचक तर काही चिंता वाढवणाऱ्या आहेत. भारताच्या परराष्ट्र धोरणावर या आंतरराष्ट्रीय घटनांचे पडसाद अवश्य उमटणारच आहेत. भारतकन्या गीता १५ वर्षांपूर्वी चुकून पाकिस्तानात पोहोचली, तेव्हा तिचे वय होते अवघ्या ८ वर्षांचे. समझोता एक्स्प्रेसमध्ये एकटीच बसलेली मूक-बधिर गीता, पाकिस्तान रेंजर्सना लाहोर रेल्वे स्थानकावर सापडली. स्वत:ची नीट ओळखही तेव्हा तिला सांगता येत नव्हती. पाकिस्तानी स्वयंसेवी संस्था एदी फाउंडेशनच्या बिल्कीस एदींनी तिला दत्तक घेतले. कराचीत आपल्या कन्येसमान तिचे उत्तम संगोपन केले. २३ वर्षांची गीता २६ आॅक्टोबरला भारतात परतली, तेव्हा पाकिस्तान आणि भारतातल्या तमाम संवेदनशील लोकांचे मन या प्रसंगाने हेलावून गेले. मायदेशी परतलेल्या गीताचे एखाद्या राजकारण्याच्या थाटात दिल्ली विमानतळावर स्वागत झाले. राष्ट्रपती मुखर्जी, पंतप्रधान मोदी, सुषमा स्वराज, मुख्यमंत्री केजरीवाल सर्वांनी या भारतकन्येची विचारपूस करण्यासाठी आवर्जून वेळ काढला. अभिनेता सलमान खानचा ‘बजरंगी भाईजान’ चित्रपट रूपेरी पडद्यावर झळकल्यानंतर या गीताच्या कहाणीवर प्रकाशझोत पडला. चित्रपटाचा नायक एका लहान मुलीला तिच्या कुटुंबापर्यंत पोहोचवतो, असे या चित्रपटाचे कथानक आहे. गीता भारतात परतली, तेव्हा सलमान खानने टिष्ट्वट केले, ‘गीताला भारतात पाठवण्यासाठी दोन देश एकत्र आले आणि समंजस सहकार्याचा आदर्श वस्तुपाठ त्यांनी निर्माण केला.’ दोन शेजारी राष्ट्रांच्या अलौकिक सामंजस्याचे असे दर्शन एकीकडे घडत असताना, त्याच चार दिवसांत जम्मू-काश्मीरच्या सीमेवर भारत-पाकिस्तान संघर्ष विरामाचा पुरता बाजा वाजला होता. पाकिस्तानच्या अंदाधुंद गोळीबारामुळे नियंत्रण रेषा व आंतरराष्ट्रीय सीमा शुक्रवारपासून धगधगत होती. जम्मूतल्या कठुआ जिल्ह्यात सुमारे दोन डझन भारतीय, या गोळीबारात गंभीर जखमी झाले, तर सोमवारी एक भारतीय त्यात मृत्युमुखी पडला. रशियाच्या उफा शहरात नरेंद्र मोदी आणि नवाज शरीफ या दोन पंतप्रधानांच्या भेटीत जे ठरले, त्यानुसार सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी, उभय देशांच्या सीमा सुरक्षा दलाचे प्रमुख देवेंद्रकुमार आणि उमर फारूक गेल्या महिन्यातच परस्परांना भेटले. संघर्ष विरामाचे उल्लंघन न करण्याचे अभिवचन दोघांनी एकमेकांना दिले. मग अचानक पाकिस्तानकडून ही आगळीक का घडावी? एकाच सप्ताहात घडलेल्या या दोन परस्पर विरोधी घटना, त्याचा नेमका अन्वयार्थ काय? काश्मीर प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याची रणनीती पाकिस्तानने वर्षभरापासून आखली आहे. राष्ट्राध्यक्ष ओबामांच्या निमंत्रणानुसार पंतप्रधान नवाज शरीफ नुकतेच अमेरिकेला जाऊन आले. भारत-पाक चर्चा प्रक्रियेतला अडथळा दूर करण्यासाठी तिसऱ्या पक्षाची मध्यस्थी आवश्यक आहे, अमेरिकाच ती भूमिका योग्य प्रकारे वठवू शकते. भारताने मध्यस्थी नाकारली, तर चर्चेची कोंडी फुटणारच नाही, हा पाकिस्तानचा दृष्टिकोन शरीफ यांनी सर्वप्रथम अमेरिकन सिनेटच्या परराष्ट्रविषयक समितीचे अध्यक्ष सिनेटर बॉब कोरकर व अन्य सदस्यांना ऐकवला. ओबामा आणि परराष्ट्रमंत्री जॉन कॅरींना हीच बाब समजावून सांगण्यासाठी शरीफ अमेरिकेला गेले होते. प्रत्यक्षात पाकिस्तानचा कोणताही आग्रह अमेरिकेने मान्य केला नाही. उलटपक्षी पाकिस्तानने काय करावे, काय करू नये, याविषयी चार खडेबोल जॉन कॅरींनी शरीफ यांना या दौऱ्यात सुनावले. पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांना सर्वप्रथम आवरा, कोणतीही कारणे सांगू नका. मुंबईतल्या २६/११ हल्ल्याला जबाबदार लष्कर-ए-तोयबा व अन्य दहशतवाद्यांवर, तसेच हक्कानी समूहावर कायदेशीर कारवाई करा, ही बाब स्पष्टपणे शरीफ यांना ऐकवली गेली. त्यांनी ती मान्य केली, असा खुलासा व्हाइट हाउसचे प्रेस उपसचिव एरिक शुल्ज यांनी वार्तालापात केला. भारताप्रमाणेच पाकिस्तानशीही अमेरिकेने १२३ असैन्य अणुकरार करावा, ही पाकिस्तानची दुसरी आग्रही मागणी. अमेरिकन प्रवक्त्याने मात्र वार्तालापात स्पष्ट केले की, पाकिस्तानशी या कराराविषयी कोणतीही चर्चा झालेली नाही. या संबंधात प्रसारमाध्यमांनी प्रस्तुत केलेले वृत्त साफ चुकीचे आहे. या दौऱ्यात बलुचिस्तानचा विषयही अधोरेखित करण्याचे शरीफ यांनी ठरवले होते. बलुचिस्तानात अतिरेकी व फुटीर कारवायांना भारतातर्फे कसे प्रोत्साहन व मदत मिळते, याचे ३ डोसियर पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अजीज यांनी परराष्ट्रमंत्री जॉन कॅरींच्या हाती सोपवले. याचा भरपूर प्रचार पाकिस्तानात घडवण्यात आला. प्रत्यक्षात पाकिस्तानच्या तथाकथित डोसियरची साधी दखलही ओबामा प्रशाननाने घेतली नाही. परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात खुलासा केला की, पाकिस्तानचा कोणताही डोसियर अमेरिकन सरकारने स्वीकारल्याची परराष्ट्र विभागाला कल्पना नाही. भारत-पाकिस्तानने आपसातल्या समस्यांचे निराकरण द्विपक्षीय चर्चेतूनच करावे, हीच अमेरिकन सरकारची भूमिका आहे. त्यात कोणताही बदल नाही, याचाच पुनरुच्चार या दौऱ्यात होत राहिला. या दौऱ्यात शरीफ यांच्या हाती काहीच लागले नाही. उलट दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानवर दबाव वाढला. मध्यस्थाच्या भूमिकेत काश्मीरप्रश्नी हस्तक्षेप करण्यास अमेरिकेने नकार दिला. इतकेच नव्हे, तर यूएस इन्स्टिट्यूटमध्ये भाषण करताना, ‘तुम लादेन के दोस्त हो’, ‘फ्री बलुचिस्तान फ्रॉम पाकिस्तान’ अशा घोषणांचाही शरीफ यांना सामना करावा लागला. पाकिस्तानी वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांनी या दौऱ्याची ज्या प्रकारे हजेरी घेतली, त्याचा आशय असा की, पंतप्रधान शरीफ जणू अमेरिकेत पाकिस्तानची अब्रू घालवून आले. थोडक्यात, पाकिस्तानच्या दृष्टीने हा दौरा अपेक्षाभंग करणारा ठरला. शरीफ मायदेशी परतल्यावर लगेच पाकिस्तानातून गीता हिची घरवापसी झाली आणि सीमेवर अंदाधुंद गोळीबारही सुरू झाला. पहिली घटना सकारात्मक तर दुसरी नकारात्मक. यातला पाकिस्तानचा खरा चेहरा कोणता?