शहरं
Join us  
Trending Stories
1
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
2
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
3
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
4
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
5
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
6
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
7
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
8
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
9
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
10
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
11
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
12
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
13
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
14
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
15
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
16
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
17
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
18
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
19
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
20
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा

गरज कृतिशील इच्छाशक्तीची

By admin | Updated: March 18, 2015 23:13 IST

पुण्याच्या विस्तार-विकासाच्या वाटेवर राजकीय शक्तीचे कृतिशील इच्छाशक्तीत रूपांतर व्हायला हवे.

पुण्याच्या विस्तार-विकासाच्या वाटेवर राजकीय शक्तीचे कृतिशील इच्छाशक्तीत रूपांतर व्हायला हवे. विधानसभेच्या अधिवेशनामध्ये एकत्रितपणे इतकी मोठी राजकीय शक्ती एका शहराला अथवा जिल्ह्याला प्रथमच आमदार रूपाने बहुदा मिळत असावी. पुणे शहर, पिंपरी चिंचवड व जिल्हा मिळून ४ मंत्री, ७ खासदार व २५ आमदार सज्ज आहेत. त्यांना पुण्याच्या प्रश्नांची नेमकी जाणही आहे. पुण्याच्या विस्तार-विकासाच्या वाटेवर या राजकीय शक्तीचे कृतिशील इच्छाशक्तीत रूपांतर मात्र व्हायला हवे. अन्यथा केवळ प्रश्नांची औपचारिकता राहिली आणि शहराचे व जिल्ह्याचे महत्त्वाचे प्रश्न तसेच रेंगाळत राहिले तर मात्र कुणाकडे अपेक्षेने पहावे अशी गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल. पुण्यामधील अत्यंत महत्त्वाचा आणि प्रलंबित प्रश्न म्हणजे मेट्रोचा. मेट्रोला निधीचे इंधन मिळाले असले तरी अद्याप मान्यतेचा सिग्नल नाहीच. राज्य शासनाने अर्थसंकल्पात १७६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याशिवाय केंद्रीय अर्थसंकल्पातील १२५ कोटी आणि महापालिकेने शिलकी ठेवलेला २५ कोटी रुपयांचा निधी या प्रकल्पासाठी आहे. मात्र, केंद्रीय सार्वजनिक गुंतवणूक मंडळाची मान्यता आणि त्यावर केंद्रीय मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब आवश्यक आहे. यासाठी आमदारांसोबतच खासदार आणि पुण्याच्या वरिष्ठ नेत्यांनी एकत्र येऊन केंद्रामध्ये दबावगट निर्माण करण्याची गरज आहे.पुणे महानगर विकास प्राधिकरण, समाविष्ट ३९ गावे, हडपसर भागात स्वतंत्र महापालिका, अनधिकृत बांधकामे नियमित करण्याबाबतचा निर्णय असे अनेक प्रश्न महत्त्वाचे आहेत. पुणे शहरातील चित्र पाहता भारतीय जनता पक्षाचे सर्वच्या सर्व आठ आमदार निवडून आलेले आहेत. त्यामुळे पुणेकरांच्या अपेक्षा उंचावलेल्या असल्यास त्यात गैर काहीच नाही. आठ आमदारांचा पुण्याच्या प्रश्नावर एक बुलंद आवाज विधानसभेत घुमावा ही पुणेकरांची अपेक्षा योग्यच आहे. पुण्यातील आमदारांनी प्रश्न मांडले खरे, परंतु पुण्यातील प्रलंबित आणि महत्त्वाच्या अशा एकाही प्रश्नाबाबत ते ठोस निर्णय पदरात पाडून घेऊ शकलेले नाहीत. प्रश्न सोडवण्यामागची तळमळ व त्या दिशेने ते करत असलेली धडपड याविषयी शंका घेण्याचे काहीच कारण नाही; परंतु त्या दिशेने प्रबळ कृतिशील इच्छाशक्तीच उपयुक्त ठरणार आहे.फड सांभाळा, निवडणूक ज्वर हो आला...येत्या काही महिन्यांत पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका होत आहेत. पुणे जिल्ह्यातील माळेगाव आणि सोमेश्वर कारखान्यापासून त्याची सुरुवात होत आहे. या दोन्ही ठिकाणी प्रथमच अजित पवार यांच्यासमोर पारंपरिक विरोधकांचे कडवे आव्हान उभे राहिले आहे. सोमेश्वरमध्ये संपूर्ण काकडे गट पवारविरोधात एकत्र आला आहे. आजपर्यंत सोबत असलेलेच दुसऱ्या बाजूला गेल्याचे पाहून अजित पवारांची जीभ पुन्हा घसरली. ‘बघूनच घेतो’ अशी भाषा माजी उपमुख्यमंत्र्यांना वापरावी लागतेय, यावरून ही निवडणूक किती चुरशीची झालीय याची कल्पना येते. माळेगावमध्येही चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांनी पवार यांना आव्हान दिले आहे. राज्यातील बदलत्या सत्तासमीकरणात येथील निवडणुकीला महत्त्व निर्माण झाले आहे. निवडणुकीची ही रणधुमाळी सुरू असताना सामान्य शेतकरी मात्र त्यापासून दूर जाऊ लागल्याचे चिन्ह आहे. गेल्या दोन वर्षांपासून शासनाने ठरवून दिलेला दरही कारखान्यांनी दिलेला नाही. २१०० ते २३०० रुपये दर मिळणे अपेक्षित असताना १८०० रुपयांवर ऊसउत्पादकांची बोळवण करण्यात आली. गेल्या वर्षीचा अंतिम दरही कोणत्याही कारखान्याने दिलेला नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साखर आयुक्तालयात घुसून आंदोलन केले. परंतु, नंतर हा विषय बाजूला पडला. एका बाजूला साखर कारखाने आर्थिक अडचणीत सापडले आहेत. केंद्राकडून येणी असलेली रक्कमही मिळण्यास अडचणी येत आहेत. मात्र, आताचा प्रचार पाहिला तर त्यावर बोलायला कोणी तयार नाही. त्यामुळे शेतकरी पुढच्या काळात उसाचे उत्पादन घ्यायचे का, असा विचार करू लागले आहेत. उसाच्या फडांच्या या भागात ‘फड सांभाळा, निवडणूक ज्वर हो आला..’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. - विजय बाविस्कर