शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
4
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
5
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
6
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
7
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
8
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
9
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
10
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
11
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
12
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
13
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
14
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
15
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
16
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
17
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
18
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
19
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
20
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी

पीडितांमध्ये स्त्रियाच जास्त

By admin | Updated: January 3, 2015 22:51 IST

नुकतीच नाशिक जिल्ह्यात घडलेली घटना ही ऊठसूठ पुरोगामित्वाच्या गप्पा मारणाऱ्या व सामाजिक न्यायाचा टेंभा मिरवणाऱ्या महाराष्ट्राला एक खणखणीत चपराक आहे.

नुकतीच नाशिक जिल्ह्यात घडलेली घटना ही ऊठसूठ पुरोगामित्वाच्या गप्पा मारणाऱ्या व सामाजिक न्यायाचा टेंभा मिरवणाऱ्या महाराष्ट्राला एक खणखणीत चपराक आहे. ही एक प्रतिनिधिक घटना म्हणता येईल. या एका वर्षात असे किमान १५ बळी अंधश्रद्धेतून गेल्याची माहिती अंनिसला मिळाली आहे. बहुतांश बळी हे स्त्रियांचे आहेत. हे प्रकार वेदनादायी व अस्वस्थ करणारे आहेत. एखादी व्यक्ती करणी, भानामती, जादूटोणा करते; डाकीण आहे असे समजून आजारपणावरील उपचार, सुखशांती किंवा गुप्तधनासाठी नरबळी घेतले गेले. महिलांना भूत उतरविण्याच्या बहाण्याने अमानुष मारहाण करण्याच्या तेवढ्याच घटना समोर आल्या आहेत. याशिवाय वेगळ््या २५ गुन्ह्यांत डाकीण, करणीच्या संशयावरून अमानुष मारहाण, बलात्कार अथवा अघोरी उपाय करण्यात आले. यातील जवळपास सर्वच महिला आहेत. इतकेच नव्हे तर आजपर्यंत दाखल झालेल्या ११0 पेक्षा जास्त गुन्ह्यांत पुरुषांपेक्षा शोषित स्त्रियांचे प्रमाण जास्त आहे. डझनभर गुन्ह्यांत स्त्रियांचे शारीरिक शोषण झाले आहे. या निमित्ताने काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. डॉ़ नरेंद्र दाभोलकर व अंधश्रद्धा निर्मूलन समितीने गेली १८ वर्षे संघर्ष करून यासाठीच जादूटोणाविरोधी कायद्याची लढाई मोठ्या चिकाटीने लढली. राज्यात असे प्रकार होतात, म्हणूनच जादूटोणाविरोधी कायद्याची गरज अधोरेखित होते. मात्र अशा घटना होऊ नयेत, यासाठी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची गरज आहे. परंतु सध्या याबाबत सरकारचे प्रयत्न फारसे आश्वासक वाटत नाहीत. अंनिसच्या वतीने विविध मोहिमांतून कायद्याच्या प्रचार व प्रसार करण्यासाठी क्षमतेनुसार प्रयत्न चालू आहेत. परंतु हा कायदा सरकारचा आहे याचीच सरकारला आठवण नसावी, अशी स्थिती आहे. कायद्याच्या मसुद्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात दक्षता अधिकारी नेमण्यात येणे आवश्यक होते, मात्र अपवाद वगळता तशा नेमणुका झाल्या नाहीत. पोलिसांना अजून कायदा समजलेला नाही; त्यांचेच प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. (लेखक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, नाशिकचे कार्याध्यक्ष आहेत.)ग्रामीण आदिवासी भागात कायद्याबद्दल माहितीच नसणे, हे सरकारच्या अंमलबजावणीच्या धोरणाचे अपयश आहे. शाळा-महाविद्यालयापासून यात्रा कायद्याची माहितीसाठी सरकारच्या पुढाकाराची गरज आहे. यंत्रणा असल्याने सरकारला ते शक्य आहे. -कृष्णा चांदगुडे