शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

सौम्य चवीचे चायनिज

By admin | Updated: June 26, 2016 03:54 IST

गेली कित्येक वर्षे चायनिज हा खाद्यप्रकार अनेकांच्या आवडीचा आहे. किंबहुना एक काळ चायनिजनेच गाजवलेला आहे. पण आपण खातो ते इंडियन चायनिज. मात्र चायनिजची चव कितीतरी

- भक्ती सोमणगेली कित्येक वर्षे चायनिज हा खाद्यप्रकार अनेकांच्या आवडीचा आहे. किंबहुना एक काळ चायनिजनेच गाजवलेला आहे. पण आपण खातो ते इंडियन चायनिज. मात्र चायनिजची चव कितीतरी वेगळी आणि सौम्य असते.आजकाल हॉटेलमध्ये जेवायला जायचे तर अनेक जण पिझ्झा, पास्ता आणि मेक्सीकन पदार्थांनाच जास्त पसंती देतात. आम्ही मैत्रिणींनीही खूप दिवसांत पंजाबी जेवण काय चायनिजही खाल्लं नव्हतं. हॉटेलमध्ये जेवायला जायचा प्लॅन करताना या वेळी चायनिज खायचं असं ठरलं. त्यासाठी आॅथेटिंक म्हणजेच अस्सल चायनिज खाण्याला पसंती दिली. मग नवी मुंबईच्या हेन डायनेस्टी रेस्टॉरंटमध्ये अस्सल चायनिजचा मस्त आस्वाद घेतला. मांचाऊ सूप म्हणजे तिखट सूप हेच समीकरण होऊन गेलं आहे. पण हे सूप पिताना त्यात पाण्याबरोबर भाज्या, हिरव्या मिरच्या, मीठ, सोया सॉस घातला होता. नेहमी पितो त्या तिखट सूपपेक्षा हे सूप अत्यंत सौम्य चवीचं होतं. तर चॉय चाऊ फन (फ्राईड राईस)मध्ये फक्त गाजर आणि फरसबी एवढ्याच भाज्या होत्या. खाताना जाणवलं की, आपण नेहमी जे चायनिज खाल्लंय ते तिखटच असतं. मग हे अस्सल चायनिज नेमकं कसं असतं? त्यामुळे हे जाणण्याची उत्सुकता वाढली. चायनिज जेवण म्हणजे टेस्टसाठी अजिनोमोटो वापरायचंच असा एक समज आहे. पण अस्सल चायनिजमध्ये अजिनोमोटो अजिबातच वापरत नाहीत. एवढंच काय ग्रेव्ही घट्ट करण्यासाठी कॉर्नफ्लॉवरचा वापरही होत नाही. तर त्याऐवजी बटाटा आणि राईस स्टार्चचा वापर केला जातो, असे या हॉटेलच्या शेफ दुर्गे खडकांनी सांगितले. बरेचदा हॉटेलमध्ये गेल्यावर अनेक जण जेवणाआधी सूप पितात. पण चिनी जेवणाची परंपरा ही जेवणानंतर बाऊलभर सूप पिण्याची आहे. आपण जो शेजवान राईस नेहमी खात आलोय त्यात लाल रंग आणि रेड चिली पेस्टचा वापर सढळहस्ते होत असतो. पण अस्सल चायनिज शेजवान राईस एकदम कमी तिखट असतो. त्यात भाज्यांबरोबर अगदी नावालाच रेड चिली पेस्ट घातलेली असते. त्याचा थोडासा उतरलेला तिखटपणा हेच त्याचे गमक आहे. थोडक्यात चायनिजमध्ये तिखट पदार्थ करताना तिखट भरमसाठ न घालता अगदी कमी घातले जाते. या पदार्थांना फ्लेवरसाठी थोडे जाडसर दिसणारे चायनिज लसूण वापरले जाते. जे आपल्या नेहमीच्या लसणीप्रमाणे जास्त तिखट वा उग्र नसते. याशिवाय फ्लेवरसाठी सॅलरी, स्टारफूल, ड्राय रेड चिली (सुकवलेली लाल मिरची) यांचा वापर केला जातो. तर सोया सॉस, चिली सॉस यांचा अगदी थोडा वापर चवीसाठी केला जातो. चायनिज पदार्थ ज्या भांड्यात करायचा आहे त्या भांड्यात पदार्थ चिकटू नये म्हणून ते पूर्ण गरम करणं अत्यंत आवश्यक असतं. त्यानंतर त्या भांड्यात थोड्याशा तेलात लसूण, भाज्या, सॉसेस शिजवलेला भात वा न्यूडल्स घातले जाते. तिखट खाणाऱ्या लोकांना हे सौम्य चवीचे चायनिज कदाचित मिळमिळीत लागू शकतं. किंबहुना सौम्य (ब्लंट) चवीचं चायनिज हीच तर चायनिजची खरी ओळख आहे. अशी अस्सल चव देणारी मुंबई, नवी मुंबई परिरसरात चायना बाऊल, चायना बिस्त्रो, रॉयल चायना, मॅनलेंड चायना, हेन डायनेस्टी अशी बरीच रेस्टॉरंट आहेत. ग्लोबल चव आवडणाऱ्या आजच्या तरुणाईला आता या अस्सल चवीने भुरळ पाडली आहे. थोडक्यात काय, तर जे अस्सल असते तेच टिकते. त्यामुळे आता या चवीच्या सौम्य चायनिजचा आस्वाद मात्र घ्यायलाच हवा. या चायनिज पदार्थांत आणखीही गमती आहेत, त्याविषयी पुढच्या भागात.मधाचा मुबलक वापर : चायनिज जेवणात मधाचा वापर सलाड्स, स्टार्टसमध्ये आवर्जून केला जातो. त्यासाठी मध - मिरचीचा वापर असलेल्या हनी चिली सॉसचा वापर केला जातो. त्यासाठी थोडेसे आले, सॅलरी स्टिक्स, भरडलेली लाल मिरची, थोडीशी रेड चिली पेस्ट, मीठ हे सर्व मधात टाकून मिक्स केले जाते. असा हा सॉस क्रिस्पी बटाटा, कॉर्नमध्ये छान लागतो. आंबट, गोड आणि थोडीशी तिखट चव असलेला क्रिस्पी पोटॅटो तयार करताना बटाट्याचे चिप्ससारखे तुकडे करायचे. ते पोटॅटो स्टार्चमध्ये टाकून मिक्स करायचे आणि डीप फ्राय करून घ्यायचे. फ्राय झाल्यावर तेलात लसूण परतून घेऊन त्यात हनी चिली सॉस, सोया सॉस घालायचा आणि त्यात बटाटे मिक्स करायचे. बटाटा आणि मधाचे कॉम्बिनेशन असलेला हा प्रकार खाताना अफलातून लागतो.