शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

मनाचिये गुंथी - सहजीवनाचा अर्थ

By admin | Updated: July 7, 2017 00:48 IST

माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. तो समूह करून राहतो. मॅन इज अ सोशल अ‍ॅनिमल, हे इंग्रजीतील वचन प्रसिद्ध आहे. प्राणी कळपाने

- प्रल्हाद जाधवमाणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. तो समूह करून राहतो. मॅन इज अ सोशल अ‍ॅनिमल, हे इंग्रजीतील वचन प्रसिद्ध आहे. प्राणी कळपाने राहतात. पक्षीही थव्याने राहतात. असे का, तर ती निसर्गाचीच योजना आहे. सर्वांनी मिळून मिसळून रहावे आणि जगण्याचा आनंद लुटावा, हे त्यामागील कारण स्पष्ट आहे. वेदांमधील प्रार्थनेतही एकत्रितपणे जगण्याचा, एकत्रितपणे पराक्रम करण्याचा महिमा वर्णन करण्यात आला आहे. ‘ओम सहनाभवतू सह नौ भुनक्तू’ ही प्रार्थना हजारो वर्षांपासून घरोघरी म्हटली जाते. दुसऱ्याचा द्वेष न करता किंवा त्याच्या स्वातंत्र्यावर आक्र मण न करता सर्वांनी आनंदाने आणि गुण्यागोविंदाने जगावे, असेही त्या प्रार्थनेत पुढे म्हटले आहे. निसर्गाची ही जी योजना आहे तिचे पालन करण्याची माणसाची जबाबदारी आहे. ती जबाबदारी तो नीट पार पाडत आहे का, याचाही विचार करायला हवा. सर्वांनी सुखी रहावे याचा अर्थ फक्त माणसालाच सुख मिळावे असा नसून त्यात पशु-पक्षी, वृक्ष-वेली, कीटक-पतंग या साऱ्यांचा समावेश आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.सहजीवनाचे उद्गान केवळ अध्यात्मानेच केलेले नाही तर विज्ञानानेही ती पताका उचलून धरलेली आहे. प्राणी परस्परांचे अंग चाटून स्वच्छ करतात. एक पक्षी दुसऱ्या पक्षाच्या डोक्यावरील पिसे साफ करतो. माकडे नेहमी एकमेकांचे अंग साफ ठेवत असतात. गाईच्या पाठीवरील बगळा तिच्या अंगावरचे कीटक फस्त करून तिला मदतच करत असतो. कासव आपल्या पिल्लांवरील प्रेम केवळ आपल्या नजरेने व्यक्त करीत असते. त्या प्रेमळ नजरेच्या आधारानेच कासवाची पिल्ले मोठी होत असतात. भूचर, जलचर, वनचर आणि वनस्पती जीवनातील साहचर्याची अशी कितीतरी उदाहरणे दाखवून देता येतील. वेलीला वर जायचे असेल तर वृक्षाचा आधार आवश्यक असतो. आई मुलीचे किंवा मुलगी आईचे केस विंचरत आहे, हे किती सुंदर दृश्य आहे! सहजीवनाच्या संकल्पनेचा जणू काही लोगोच आहे तो. माणसाला स्वत:ची पाठ थोपटून घेता येत नाही, त्यासाठी त्याला कुणीतरी सोबती असावा लागतो. प्रसंगी कुणाच्या खांद्यावर मान ठेवून त्याला आपल्या दु:खाला वाट मोकळी करून द्यायची असेल तर? त्यासाठीच निसर्गाची ही सहजीवनाची व्यवस्था व्यापक अर्थाने विश्वबंधुत्वाच्या पातळीवर पोहचणारी आणि जगाला विनाशाच्या खाईत ढकलू पाहणाऱ्या युद्धखोरांचे डोळे उघडू पाहणारी!