शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मनाचिये गुंथी - संपूर्ण व्यक्तिमत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2017 00:08 IST

मानवाचे व्यक्तिमत्त्व त्याच्या अस्तित्वाची आधारशीला असते. मानवाच्या संपूर्ण जीवनाची प्रगती तसेच अधोगती त्याच्या

मानवाचे व्यक्तिमत्त्व त्याच्या अस्तित्वाची आधारशीला असते. मानवाच्या संपूर्ण जीवनाची प्रगती तसेच अधोगती त्याच्या व्यक्तिमत्त्वावरच अवलंबून असते. यामुळेच ‘व्यक्त्तिमत्त्व विकास’ एक अत्यंत महत्त्वपूर्ण शास्त्र म्हणून विकसित झाले आहे.व्यक्तिमत्त्वाची व्याख्या लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे केलेली आहे. आधुनिक मनोविज्ञानाने व्यक्तिमत्त्व म्हणजे विचार, वाणी आणि कर्म यांचा संपूर्ण जमाखर्च आहे असे म्हटलेले आहे. भारतीय तत्त्वज्ञानात तसेच योग शास्त्रामध्ये व्यक्तिमत्त्वाची स्पष्ट व्याख्या दिलेली आहे. उपनिषदामध्ये पंचकोशांचे वर्णन केलेले आहे. हे पाच कोश म्हणजेच - अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय व आनंदमय. अन्नमय कोश म्हणजेच आपले शरीर. ते अन्नापासून तयार झाले आहे. या कोशापेक्षा सूक्ष्म कोश प्राणमय कोश. प्राणमय कोश म्हणजे आपली ऊर्जा होय, जी आपल्याला पूर्णपणे संचलित करते. प्राणमय कोशापेक्षाही सूक्ष्म कोश मनोमय कोश आहे. मनोमय कोश आपल्या अनंत मनाचा विस्तार आहे. त्यापेक्षाही सूक्ष्म कोश म्हणजे विज्ञानमय कोश. जे आपल्या चेतनेशी संबंधित आहे. या चारही कोशापेक्षा सर्वांत सूक्ष्म कोश आहे आनंदमय कोश. हे आनंदमय कोश म्हणजेच मानवाचा मूळ स्वभाव होय आणि त्याला प्राप्त करण्यासाठी माणूस अनेक प्रकारचे कर्म करतो. हे पाच कोशच आपले व्यक्तिमत्त्व तयार करते. आपले शरीर या व्यक्तिमत्त्वाचा पहिला भाग आहे. अर्थात त्यामुळेच त्याला स्वच्छ व स्वस्थ ठेवण्याबाबत बोलले जाते. आयुर्वेदामध्ये शरीराचे स्वास्थ्य कसे सुरक्षित ठेवले पाहिजे याबाबत उपाय सांगितलेले आहेत. योगशास्त्रात अन्नमय कोशाला व्यवस्थित ठेवण्यासाठी आसनाचे तर प्राणायम कोशाला व्यवस्थित ठेवण्यासाठी प्राणायम करण्याबाबत सांगितले आहे. मनाच्या वृत्तीला नियंत्रित करण्यासाठी योगाचा पर्याय सुचविला आहे. त्याशिवाय काही वेगळ्या योगाची चर्चा आहे जे आपल्या मनावर नियंत्रण ठेवू शकतात. या पाच कोशाचे वर्णन भारतीय वैचारिक तथा दार्शनिक चिंतनाचा एक उत्कृष्ट नमुना आहे. हे पाच कोश एकमेकांपासून वेगळे न होता परस्पर अनन्य रूपात जोडलेले असतात. एक कोश दुसऱ्या कोशाला प्रभावित करतो. ज्याप्रमाणे समुद्रात उसळलेली लाट एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाते, त्याचप्रमाणे एका कोशामार्फत होणारी क्रिया दुसऱ्या कोशापर्यंत पोहोचते. पूर्ण व्यक्तिमत्त्व त्यालाच प्राप्त होते, ज्याचे सर्व कोश विकसित व संतुलित आहेत. यासाठी भारतीय परंपरेत अनेक मार्ग सांगितलेले आहेत. या मार्गांना आपण ज्ञानयोग, भक्तियोग आणि कर्मयोगाच्या श्रेणीत ठेवूशकतो.डॉ. भूषणकुमार उपाध्याय