शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

मनाचिये गुंथी - निवड

By admin | Updated: February 20, 2017 00:18 IST

तुमची आवड काहीही असो तुमची निवड महत्त्वाची. आणि आवड असली तर सवड मिळतेच. सवड मिळाली तर चांगली निवडही

तुमची आवड काहीही असो तुमची निवड महत्त्वाची. आणि आवड असली तर सवड मिळतेच. सवड मिळाली तर चांगली निवडही करता येते. निवडणुका नुसता शब्द उच्चारला तरी गडबड, गोंधळ आणि थरार दिसू लागतो. त्यातून महापालिकेच्या निवडणुका तर अधिकच रंगतदार. बघा ना वॉर्ड, प्रभाग त्यात किती उमेदवार? मुख्य पक्षांचे, उपपक्षांचे आणि अपक्षांचे, बंडखोरांचे, फितुरांचे, अपमानितांचे आणि नुकतेच परगृही गेलेले. नुस्ता कल्ला ना! बरं! हेही ठरवून चालू. म्हणजे एका ठिकाणी एक पाय आणि दुसरीकडे दुसरा हा ठिकरीचा खेळ चालूच. त्यातून निष्ठा, द्रोह, मिलीजुली हे वेगळेच. माणसे पद्धतशीरपणे आपले पाय भिंगरीसारखे गरागरा फिरवीत राहतात आणि मतदार चक्रावतो. चुकीचे मतदान करतो. मतदान हा आपला हक्क! तो बजावायलाच हवा. स्वतंत्र भारताचे आपण स्वतंत्र नागरिक आहोत. हे सारे माणसांना माहीत असते. आपण बोटांना शाई लावून घेण्यापुरतेच हेही वाटत राहते. कुणी म्हणतात डोकं वापरा आणि ठरवा. कुणी म्हणतं डोकं बाजूला ठेवा, दादा, ताई, भाऊ, माई, दीदी, साहेब काय म्हणतात ते लक्षात ठेवा. गृहोपयोगी वस्तू जेव्हा चिन्हं होतात तेव्हा समजावे भांड्याला भांडं लागलं, आता उघडउघड रस्सीखेच, एकमेकांची उणीदुणी आणि इतके दिवस गुण्यागोविंदाने (?) एकत्र राहिलेले क्षणात एकमेकांचे कट्टर शत्रू होतात. सामान्य माणसाला बरे वाटते. अरेच्चा फक्त माझ्याच घरात भांडणं नाहीत, सर्वत्र हेच आहे. भाऊ- बहिणीला विचारत नाही, आई बापाला पोर विचारीत नाही. इतकंच काय नवरा बायकोला विचारीत नाही. आता संसार कसा चालायचा? पण चालतो. बरं यांच्या घोषणा तर ऐकाव्या, आश्वासनं ऐकावी, वाटतं सर्व उमेदवारांनी दिलेली आश्वासनं एकत्र करावी ती अलिबाबाला द्यावी. त्याने दिवा घासावा. राक्षस प्रकटावा आणि त्याला म्हणावं हे जे जे म्हणतात ते पूर्ण कर. आपला वॉर्ड, प्रभाग, गाव, शहर आणि देश एकदमच नंदनवन! सुखच सुख! एकही गरीब नाही, नळ गळत नाहीत, वीज जात नाही, इंधन फुकट की! सर्वांना सुबक घरे, प्रत्येकाला काम, भिकारी नाही, संघटना नाही, मोर्चे नाहीत, चोऱ्या नाहीत, दरोडे नाहीत, शस्त्र नाहीत, खून, बलात्कार नाहीत, पोलीसच नाहीत, कारण प्रत्येक जण सुरक्षित, वाहतुकीचे नियम पाळणारे, सर्व नाती सुरक्षित, वृद्धाश्रम बंद, कारागृह ओसाड, जेलची मंदिरं वाचनालयं झालेली, कॉलेजात फीच नाही, शिक्षण मोफत, सगळे एकमेकांचे, म्हणजे जात नाही, मग धर्म नाही, पंथ नाही, सगळी माणसं एकमेकांशी घट्ट बांधलेली. एकदम सुखाचा स्वर्गच... स्वप्नवत... उठा उठा! जागे व्हा! अरे हा एवढा गोंधळ कसला? हो हो! देतो ना सगळ्यांनाच मत देतो. अरेच्चा अलिबाबा गेला वाटतं! हं तेच म्हटलं, इतकं शांत का वाटत होतं? आता सवड संपली, आवड आठवा. निवड करा. आकाशाच्या प्रचंड पोकळीत गोेल गोल फिरण्यापेक्षा एकच ग्रह पकडून ठेवा. त्याची निवड आपल्या हातात. त्या ग्रहाचं नाव माणूस !- किशोर पाठक