शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

जोवर आहे स्मरण....

By admin | Updated: January 8, 2017 01:27 IST

माणूस गेल्यानंतर त्याचं काय होतं? तो कुठे जातो, हा प्रश्न अनादी काळापासून माणसाला छळतो आहे, पण त्याचं उत्तर त्याला मिळालेला नाही. हा शोध न संपणारा आहे.

- रविप्रकाश कुलकर्णी

माणूस गेल्यानंतर त्याचं काय होतं? तो कुठे जातो, हा प्रश्न अनादी काळापासून माणसाला छळतो आहे, पण त्याचं उत्तर त्याला मिळालेला नाही. हा शोध न संपणारा आहे.पण त्यातूनच समाधान वाटावे, असे त्याला एक उत्तर मिळाले. अशी माणसं तुमच्या मनात जाऊन राहातात. त्याचं स्मरण असेपर्यंत ती राहातात, नाहीतर विस्मरणात जातात. त्यामुळेच म्हटलं जातं, जोवरी आहे स्मरण, त्याला काय करील मरण?मनाच्या कल्पनेनं कल्पित, इष्ट आराध्य व्यक्तीच म्हणा, शक्तीच म्हणा, त्याची पूजा तुम्ही इच्छिता, त्याप्रमाणे करायची, म्हणूनच मानसपूजेला सर्वश्रेष्ठ मानला गेलं आहे, पण सर्वसामान्य माणसाचं मन चंचल असतं. त्याला हा मनाचा खेळ झेपण्यासारखा नसतो. त्याला सर्व गोष्टी समोर दिसेनाशा वाटतात. त्याच्याप्रमाणे, तो कोडकौतुक करतो-करून घेतो. भक्तांच्या प्रमाणेच त्याचे देव असतात, असं जे म्हटलं, ते या अर्थात. जे देवांच्याबाबत तेच मग हाडामांसाच्या माणसाबाबत होऊ पाहातं. राहतो फरक तो कमी-जास्त करण्याबाबत. श्रद्धेने केलेले स्मरण हा मुळातला मानसपूजेचाच प्रकार, पण हे सगळ्यालाच कसं सोसणार आणि झेपणार? त्यातून पिंड, तर्पण ही कल्पना सुरू झाली. पुढे मूर्ती, फोटो प्रकार प्रगत अवस्थेप्रमाणे वाढत गेला.सिनेमा, चलत चित्रीकरण याचे स्मरण ही गोष्ट इथे येऊन ठेपला आहे.आपल्या आजूबाजूला असणारे पुतळे, स्मारके, स्थान संस्थान अशा पुढच्या गोष्टी येतात. त्याची अवस्था काय आहे, हेदेखील पाहायचे कष्ट किती घेतात? त्याचा परिणाम वगैरे गोष्टी फार पुढच्या....त्यात पुन्हा काही पुतळ्यांचे उद्घाटन होत आहे, तर दुसरीकडे नवे पुतळे उभारण्याची लाटच सुरू झाली आहे. याची संगती लावायची कशी?हे सगळं कलाबाह्यतेकडे झुकत आहे. कलेऐवजी अ-कलाकडे चालत आहे, असे वाटायला लागतं. अलीकडे पुन्हा-पुन्हा हा विचार मनात येतो. त्याच कारणही तसेच आजूबाजूला घडतं-बिघडतं आहे म्हणून. गायक महंमद रफी यांचं स्मारक ते जाऊन छत्तीस वर्षे झाल्यानंतर, वान्द्रे येथील लकी हॉटेलसमोरील चौकात उभारलं आहे, तसेच वान्द्रे येथील सोळाव्या रस्त्याला ‘महंमद रफी मार्ग’ नाव दिलं गेलं आहे. चतुरस्त्र अशा महंमद रफीच्या स्मरणासाठी केलेल्या या उपक्रमाला विरोध करण्याचं काहीच कारण नाही, पण दगड-विटाच्या या स्मारकाबरोबरच रफीचं खरं स्मारक सूर स्मारक असायला हवं असं वाटतं. महंमद रफीबाबत सर्व काही, ज्यात काही वादग्रस्त गोष्टी असू शकतात. हे सर्व एकत्रित मिळण्याची व्यवस्था करता येऊ शकते का? कुणीतरी त्याची सुरुवात करायला हवी. सी. रामचंद्र यांची जन्मशताब्दी सुरू झाली आहे. शिवाजी पार्कच्या एका कोपऱ्यावर त्यांचं स्मारक आहे. म्हणजे काय ते जाऊन पाहा, म्हणजे कळेल... राहता राहिले ते तुम्ही-आम्ही. तुमच्या-आमच्या भावविश्वाचा हा अविभाज्य भाग झालेला असतो, पण स्मारक वगैरे आपल्या कल्पनेतच राहतं. तेव्हा मग म्हणायचं , जोवरी आहे स्मरण, त्याला कसले आहे मरण? स्वत:चंच समाधान असंच करून घ्यायचं का?घडलं ते...आपल्या आजूबाजूला असणारे पुतळे, स्मारके, स्थान संस्थान अशा पुढच्या गोष्टी येतात. त्याची अवस्था काय आहे, हेदेखील पाहायचे कष्ट किती घेतात? गायक महंमद रफी स्मारक ते जाऊन छत्तीस वर्षे झाल्यानंतर, वान्द्रे येथील लकी हॉटेलसमोरील चौकात स्मृतिशिल्प रूपातउभारलं आहे,दगड-विटाच्या या स्मारकाबरोबरच रफीचं खरं स्मारक सूर स्मारक असायला हवं असं वाटतं. लिहिता-लिहिता आठवलं, आता सी. रामचंद्र यांची जन्मशताब्दी सुरू झाली आहे. शिवाजी पार्कच्या एका कोपऱ्यावर त्यांचं स्मारक आहे. म्हणजे काय ते जाऊन पाहा, म्हणजे कळेल...!तर दुसऱ्या कोपऱ्यात वसंत देसाई यांचं स्मारक आहे. तेथे जी वीणा आहे, त्याच्या तारा गायब होतात, असे नेहमीच होत म्हणे. याला काय म्हणावे?