शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
2
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
3
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
4
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
5
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
6
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
7
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
8
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
9
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
10
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
11
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
12
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
13
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
14
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
15
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
16
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
17
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
18
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत
19
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
20
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा

भारताची तरुण पिढी पोर्नोग्राफीच्या मगरमिठीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2017 00:09 IST

३,००० पोर्नोग्राफिक साइट्सवर भारत सरकारने बंदी घातल्याचे वृत्त आहे.

ज्यावर लहान मुलांशी संबंधित अश्लील चित्रण दाखविले जाते अशा ३,००० पोर्नोग्राफिक साइट्सवर भारत सरकारने बंदी घातल्याचे वृत्त आहे. सरकारने उचललेले पाऊल स्तुत्य आहे. पण खरा प्रश्न असा की, संगणकाचे एक बटण दाबताच इंटरनेटवर २६ कोटींहून अधिक साइट पाहण्याचे पर्याय उपलब्ध असताना त्यापैकी फक्त तीन हजार साइट््सवर बंदी घालून काय उपयोग होणार? या साइट बंद झाल्या तर लोक दुसऱ्या तशाच साइटचा पर्याय निवडतील. भारतात पोर्नोग्राफिक साइटचा बाजार किती फोफावलेला आहे याचा अंदाज येण्यासाठी प्र्नथम आपण जागतिक पातळीवरील आकडेवारीवर नजर टाकू या.काही काळापूर्वी जगभरातील पोर्नोग्राफिक साइट््ससंबंधी एक सर्वेक्षण केले होते. सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या एका साइटने ही सर्वेक्षणाची माहिती जारी केली. त्यावरून असे दिसते की, प्रत्येक क्षणी जगभरात सुमारे ३० कोटी लोक कुठे ना कुठे पोर्नोग्राफिक साइट पाहत असतात. म्हणजेच तुम्ही हा लेख वाचत असाल तेव्हा जगातील इतर ३० कोटी लोक पोर्नोग्राफी पाहण्यात मश्गुल असतील. यात भारतीयांची संख्याही बरीच मोठी आहे. पोर्नोग्राफिक साइट पाहण्यात अमेरिका व ग्रेट ब्रिटन यांच्यानंतर भारताचा तिसरा क्रमांक लागतो. फिलिपीन्सचा पहिला क्रमांक लागतो. तेथील नागरिक रोज सरासरी १२ मिनिटे ४५ सेकंद अशा साइट््स पाहत असतात. यात ९ मिनिटे ५१ सेकंदासह अमेरिका दुसऱ्या, तर ९ मिनिटे ३६ सेकंदांसह आॅस्ट्रेलिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. आपण भारतीय सरासरी ९ मिनिटे ३० सेकंद पोर्नोग्राफिक साइट्स पाहतो व या बाबतीत आपला क्रमांक चौथा लागतो. जे भारतीय पोर्नोग्राफिक साइट पाहतात त्यापैकी ४७.५ टक्के लोक त्यासाठी डेस्कटॉप संगणकाचा, तर ४९.९ टक्के मोबाइलचा वापर करतात. बाकीचे २.६ टक्के भारतीय टॅबलेट वापरतात. यावरून यासाठी मोबाइलचा उपयोग सर्वात जास्त होतो हे स्पष्ट होते. भारतातही राज्यवार विचार केला तर दिल्ली, पंजाब, जम्मू, राजस्थान आणि ईशान्येकडील राज्यांमधून पोर्नोग्राफिक साइट््सवर सर्वाधिक ‘ट्रॅफिक’ असते. आकडेवारीवरून असेही दिसते की, भारतीय लोक एका सेशनमध्ये पोर्न साइटची सरासरी ७.३२ पाने पाहतात. जागतिक पातळीवरील ही सरासरी ७.६ पाने अशी आहे. म्हणजे जगाच्या तुलनेत आपण थोडेसेच मागे आहोत. आश्चर्य म्हणजे पोर्नोग्राफी पाहणाऱ्या भारतीयांमध्ये महिलांचे प्रमाण एक चतुर्थांश आहे. महिला लेस्बियन वर्गातील पोर्नोग्राफी सर्च करतात. यासंदर्भात दोनच महिन्यांपूर्वी माध्यमांमधून समोर आलेले एक उदाहरण ताजे आहे. पुण्यातील एक महिला चार अल्पवयीन मुलींना आपल्याकडे बोलावून घेऊन त्यांना मोबाइलवर पोर्नोग्राफिक चित्रपट दाखवत असे. यापैकी एका मुलीने हा सर्व प्रकार तिच्या आईला सांगितला आणि या महिलेचे बिंग फुटले. पोलिसांनी या महिलेविरुद्ध गुन्हाही नोंदविला. पण आपल्याकडे पोर्नोग्राफीशी संबंधी कायदा एवढा तकलादू आहे की फारशा कडक शिक्षेची अपेक्षा ठेवता येणार नाही. हे सर्व पाहिल्यावर पोर्नोग्राफिक साइट््सची समस्या भारतात गंभीर आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. खासकरून आपली तरुण पिढी अशा साइट््सच्या मगरमिठीत घट्ट आवळली जात आहे. मला याविषयी कित्येक वर्षे चिंता वाटत आली आहे व राज्यसभेत १८ वर्षे असताना तेथे मी पोर्नोग्राफीच्या विरुद्ध कडक कायदा करण्याची मागणी अनेक वेळा केली आहे. एप्रिल २०१५ मध्ये तर मी जैनाचार्य श्री विजयरत्नसुंदर सुरीजी महाराज यांच्या स्वाक्षरीसह एक याचिकाही राज्यसभेत सादर केली. त्या याचिकेत त्यावेळी मी म्हटले होते की, सन १९९८ मध्ये जगभरात एक कोटी ४० लाख पोर्न साइट्स होत्या, त्या वाढून आता २६ कोटींवर पोहोचल्या आहेत. या पोर्नोग्राफिक साइट््सवर कठोर प्रतिबंध आणता यावे यासाठी ‘एनआयए’च्या धर्तीवर एक विशेष पोलीस यंत्रणा उभारण्याची मागणीही मी त्यात केली होती. मी यासंबंधी ज्या कोणाशी बोललो त्या प्रत्येकाने अशा साइट््सवर संपूर्ण बंदी घालण्याचे समर्थन केले. पण आश्चर्य म्हणजे संपूर्ण प्रतिबंध तर सोडाच, पण कडक कायदा करण्याच्या दृष्टीनेही काही हालचाल झाल्याचे दिसत नाही. उत्तर कोरिया व इराण या देशांमध्ये पोर्नोग्राफी पाहणे किंवा त्याचे चित्रीकरण करणे यासाठी मृत्युदंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. मी एरवीही मृत्युदंडाच्या बाजूने नाही. पण जेवढी शक्य होईल तेवढ्या कडक शिक्षेची तरतूद तर नक्कीच केली जाऊ शकते. आणखी एक गोष्ट म्हणजे अशा साइट््सवर जे पोर्नोग्राफिक व्हिडीओ भारतातून अपलोड केले जातात त्यांच्यावरही काही कारवाई केली जात नाही. असे व्हिडीओ बनविण्यासाठी अनेक परकीय नियमितपणे भारतात येत असतात. ते गुन्हेगारी विश्वाची मदत घेऊन असे व्हिडीओ भारतात तयार करतात.चीन आणि तैवान या देशांनी पोर्न साइट आणि सेक्स टॉईज यांच्या बाबतीत अत्यंत कडक धोरण स्वीकारले आहे. भारतात मात्र असे काही होताना दिसत नाही. या गंभीर समस्येकडे गांभीर्याने पाहून तातडीने पावले उचलली नाहीत तर या पोर्नोग्राफीने आपली संपूर्ण संस्कृती उद््ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही, हे नक्की. एरवीही मानवता आणि भावनेच्या नावाखाली ‘गे’ आणि ‘लेस्बियन’ संस्कृतीचे उघड समर्थन करणारा एक वर्ग भारतात तयार होतोच आहे. मोठ्या शहरांमध्ये तर अशा लोकांच्या संघटना स्थापन होत आहेत व त्यांची संख्याही वेगाने वाढत आहे. आपल्या देशात एक पूर्वाश्रमीचे राजे आहेत जे आपण ‘गे’ असल्याचे अभिमानाने सांगतात व ते जेथे कुठे जातात त्यांचे एका वर्गाकडून उत्साहाने स्वागतही केले जाते. माध्यमांमध्येही त्यांना भरपूर जागा दिली जाते. मानवता व भावनेच्या नावाने आपण आपली संस्कृती पार लयाला जाऊ देणार का, हा माझा सवाल आहे. या पोर्नोग्राफिक साइट््समुळे भारतात लहान मुलींवरील लैंगिक अत्याचाराचे गुन्हे वाढत आहेत याविषयी जराही शंका नाही.हे लिखाण संपविण्यापूर्वी...जम्मू व श्रीनगरदरम्यानचा देशातील सर्वाधिक लांबीचा व सर्वात अत्याधुनिक असा चनेनी-नाशरी हा ९.२ किमी लांबीचा बोगदा ज्यांनी अवघ्या साडेचार वर्षांत साकार केला त्या सर्व अधिकाऱ्यांना, अभियंत्यांना आणि कामगारांना माझा सलाम. हा आशिया खंडातीलही सर्वात लांब असा रस्त्यावरील बोगदा आहे. डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना या बोगद्याचे काम सुरू झाले होते. तेथील भौगोलिक आणि नैसर्गिक रचना पाहता हे काम सोपे नव्हते. शिवाय दहशतवादाचे सावटही होते. परंतु जिगरबाज अभियंते आणि कामगारांनी जिद्दीने हा बोगदा पूर्ण केला. या बोगद्यामुळे जम्मू व श्रीनगर यामधील अंतर ३१ किमीने कमी झाले आहे. एरवी बर्फवृष्टीमुळे काश्मीरच्या या दोन मोठ्या शहरांच्या दरम्यानची वाहतूक ठप्प व्हायची. या बोगद्यामुळे ती बारमास सुरू राहू शकेल. खरोखरच हे काम देशाला भूषणावह आहे.-विजय दर्डा(लोकमत पत्र समूहाचे चेअरमन)