शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

भाजप आणि शिवसेना यांच्यातील ‘हेट स्टोरी’ दिवसेंदिवस होतेय गडद, दानवेंची जुळवा-जुळव आणि हातघाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:05 IST

लोकसभेसाठी जमवाजमव सुरू झाली आहे. विद्यमान, माजी, नवखे असे सगळेच हालचाल करायला लागले. चर्चाही झडायला लागल्या. डिसेंबर १८ की मे १९ असे वादाचे फड रंग भरायला सुरुवात झाली तशी राजकीय नेत्यांची भाषा बदलत चालली.

- सुधीर महाजनलोकसभेसाठी जमवाजमव सुरू झाली आहे. विद्यमान, माजी, नवखे असे सगळेच हालचाल करायला लागले. चर्चाही झडायला लागल्या. डिसेंबर १८ की मे १९ असे वादाचे फड रंग भरायला सुरुवात झाली तशी राजकीय नेत्यांची भाषा बदलत चालली. विरोधकांची सालटी काढणारी भाषा आता अधिक तीक्ष्ण होणार यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आघाडीवर. त्यांची गावराण बोली हमखास सभा जिंकून घेणारी. त्यांच्या जालना मतदारसंघातही असेच बांधबंदिस्तीचे वातावरण आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यातील ‘हेट स्टोरी’ गडद होत असतानाच दानवेंनी शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांना शिंगावर घेतले. खोतकर हे शिवसैनिक आणि त्यातही राज्यमंत्री. मतदारसंघातील सभांमध्ये हाच विषय सध्या दिसतो. दानवेंना ते लोकसभेसाठी प्रतिस्पर्धी वाटतात.गेल्या काही दिवसांपासून जालन्यातील राजकीय वातावरण बदलताना दिसते. दानवे आणि बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांचा एक गट, तर खोतकर, राजेश टोपे यांचे ध्रुवीकरण आणि त्यांच्या परिघात भाजपचे मंत्री बबनराव लोणीकर आणि जालन्याचे माजी आमदार आणि काँग्रेसचे नेते कैलास गोरंट्याल हळूहळू सरकताना दिसतात. तिकडे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार तर उघडपणे खोतकरांची तरफदारी करतात. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड-सोयगाव मतदारसंघ लोकसभेसाठी जालना मतदारसंघाचा भाग असल्याने हे दोन तालुके महत्त्वाचे ठरतात. पूर्वी सत्तार-दानवे मधुर संबंध होते; पण गेल्या सात-आठ महिन्यांपासून ते बिघडलेले दिसतात. सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघासाठी भाजपची संघटनात्मक जबाबदारी रावसाहेबांचे चिरंजीव आमदार संतोष दानवेंकडे अलीकडेच सोपविली. त्या पार्श्वभूमीवरच काही दिवसांपूर्वी सत्तार-खोतकर यांचा जंगी कार्यक्रम घडवून आणला गेला. सेनेतर्फे खोतकरांच्या नावाची चर्चा नसली तरी दानवे त्यांच्यावर टीका करण्याची संधी सोडत नाही आणि त्यांचाच राग कुचे आळवताना दिसतात. जिल्ह्यात दानवेंच्या गटात बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांच्याशिवाय कोणी दिसत नाही. भोकरदनमध्ये त्यांचे पुत्र संतोष हेच आमदार असले तरी राष्टÑवादी काँग्रेसचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांचा विरोध असणारच.सध्या अंबड-वडीगोद्री या ४७ कि.मी. रस्त्यावरून खा.दानवे आणि आ.राजेश टोपे यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसतात. या रस्त्याची अवस्था इतकी वाईट आहे की, त्यामुळे अपघातात आतापर्यंत २५८ बळी गेले. कामाच्या मुद्यावरूनही पक्षातील व पक्षाबाहेरील मंडळी दानवेंवर नाराज आहेत. मतदारसंघात त्यांनी कोट्यवधी रुपये आणले, पण ती कामे जावई आणि पुतण्यालाच दिली, त्याची ही नाराजी.औरंगाबाद हा परंपरागत सेनेचा मतदारसंघ. मोदी लाटेच्या कृपेने चंद्रकांत खैरे निवडून आले असे बोलले जात होते; पण आता या मुद्याची राजकीय चर्चा सुरू झाली. त्यांच्या विरोधात काँग्रेसकडे तुल्यबळ उमेदवार नाही आणि भाजपकडे नाव घेण्यासारखी व्यक्ती नाही म्हणून आडून-आडून विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकरांचे नाव चर्चेत येते. त्याचा भापकरांनी इन्कारही केलेला नाही. म्हणजे भाजपची येथे म्हैस पाण्यातच आहे. तसे बोहल्यावर चढण्याची अनेकांची तयारी असली तरी बाशिंग कोणाचे बांधणार, हा प्रश्न आहे. इकडे खैरेसुद्धा विरोधकांशी जुळवून घेण्याच्या मूडमध्ये दिसतात.

टॅग्स :Raosaheb Danweiरावसाहेब दानवे