शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

...शेवटी चिमटा बसणार तो सामान्यांच्याच खिशाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2022 10:29 IST

ब्रॅण्डनेम ऐवजी ‘प्रीपॅक्ड अँड लेबल्ड’ असा शब्दप्रयोग करून अन्नधान्यासह अनेक जीवनावश्यक वस्तू जीएसटीच्या कर कक्षेत आणल्या गेल्या आहेत.

- राजेंद्र बांठिया, अध्यक्ष, दि पूना मर्चंट्स चेंबर, पुणे

केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेचा आणि व्यापारी वर्गाचा कोणताही सारासार विचार न करता जीवनावश्यक वस्तूंवर म्हणजे गव्हाचा आटा, तांदूळ, पोहे, मुरमुरे, मखाना, राई, बार्ली, ओट्स, कॉर्न, ज्वारी, बाजरी, रागी, तृण-कडधान्याचे पीठ, गूळ, नैसर्गिक मध, दही, लस्सी, ताक, पनीर, गहू, गोठविलेले मांस-मच्छी, सेंद्रिय खते जर प्रीपॅक्ड अँड लेबल्ड असतील तर त्याला पाच टक्के जीएसटी लावण्याचा कायदा दि. १३ जुलै २०२२ ला करून त्याची पाच दिवसांत अंमलबजावणी करणे, हे अयोग्य असून सामान्य जनता आणि व्यापाऱ्यांवर अन्यायकारक आहे.

सुरुवातीला २०१७ मध्ये  केंद्राने   जीएसटी  प्रणाली अमलात  आणली. त्यावेळी व्यापाऱ्यांचा  विरोध   असताना रजिस्टर  ब्रँडच्या खाद्यान्न वस्तूंवर पाच टक्के जीएसटी  लावण्यात आला. रजिस्टर ब्रँडच्या वस्तूंवर ५  टक्के  जीएसटी  असल्याने  ग्राहकांनी   अन-रजिस्टर ब्रँडच्या  वस्तूंना  प्राधान्य  दिले. रजिस्टर   आणि  अन-रजिस्टर ब्रँडच्या किमतीतील फरकामुळे अनेक  व्यापाऱ्यांनी  किमतीतील स्पर्धेला  तोंड  देण्यासाठी  रजिस्टर्ड ब्रँड रद्द केले. त्यासाठी सरकारने कायद्यात  नवीन  बदल  करून  ब्रॅण्डनेम ऐवजी प्रीपॅक्ड अँड लेबल्ड असा  शब्दप्रयोग करून छोट्या पॅकिंगपासून २५ किलोपर्यंतच्या अन्नधान्यासह अनेक जीवनावश्यक वस्तू जीएसटीच्या करकक्षेत  आणल्या आहेत. 

जीएसटी पाच  टक्के  असला तरी  ग्राहकांपर्यत  माल   पोहोचेपर्यंत तो ८ टक्के  होणार  आहे.  या कायद्यामध्ये  प्री - प्रीपॅक्ड लेबल्ड तसेच लीगल मेट्रोलॉजी कायद्यानुसार २५ किलोपर्यंत असा शब्दप्रयोग केल्यामुळे हा कायदा  क्लिष्ट झाला आहे. आताच्या नव्या नियमानुसार एक ते २५ किलोपर्यंतच्या खाद्यान्न वस्तूंवर कर लागणार आहे. त्यामुळे घाऊक व्यापाऱ्यांनी २५ किलोच्या पॅकमध्ये विकल्यास त्याला कायद्यानुसार जीएसटी भरावा लागणार आहे. छोट्या व्यापाऱ्याला हा माल सुटा करून विकायचा असला तरी प्लास्टिकच्या १/२ किंवा १ किलो बॅगमध्ये भरावा लागणार आहे. त्यावर कायद्यानुसार पॅकिंग दिनांक, बेस्ट बिफोर, वजन, आदी गोष्टींचा उल्लेख करणे बंधनकारक आहे. व्यापाऱ्यांनी तसे केल्यास तो माल आपोआप लेबल्ड वर्गात समाविष्ट होऊन त्याला जीएसटी लागेल. याचा अर्थ सर्व खाद्यान्न वस्तूंना जीएसटी लागणार आणि त्याचा भुर्दंड सर्वसामान्यांना बसणार.

डाळी, तांदूळ, रवा, मैदा, पोहे-मुरमुरे, बेसन, मका, कड़धान्य, गहू, गूळ, आदी जीवनावश्यक  वस्तू  सुट्या  करून ठेवता येत नाहीत. कारण त्या खराब होतात. पोहे-मुरमुरे या वस्तूंची सुटी विक्री केल्यास त्या ओलसर (सादळणे) होतात तसेच आटा, मैदा, रवा, बेसन यांना १५ दिवसांत कीड लागते. जीएसटीमध्ये वारंवार होणाऱ्या बदलांमुळे ही करप्रणाली आधीच गुंतागुंतीची आहे. त्यात नवीन शब्दप्रयोगाद्वारे अनेक नवीन वस्तूंना करकक्षेत आणले जात आहे. त्या वेगाने संगणकप्रणालीत बदल करणे तसेच आवश्यक मनुष्यबळ मिळवणे कठीण होत आहे. 

सुरुवातीस ब्रँडेड अन्नधान्ये, डाळी, कडधान्ये, आदी वस्तू समाजातील सधन वर्गच वापरतो, असे सांगून त्यावर करआकारणी केली गेली. आता त्यात बदल करून अन्नधान्यासह गूळ, आटा, रवा, मैदा, पोहा मुरमुरे, डाळी, कडधान्येही करपात्र केली गेली आहेत. व्यापारी, गाहकवर्ग, नागरिक या सर्वच स्तरांतून या कर-आकारणीला प्रचंड विरोध होत आहे. अनेक राज्ये याबाबत वेगवेगळी भूमिका घेत आहेत. अशा परिस्थितीमध्ये या बदलांना स्थगिती देणे संयुक्तिक होईल. जीएसटीची आकारणी सोपी होण्यासाठी विविध नियमांमध्ये सुसूत्रता आणावी, ही आमची आग्रहाची विनंती आहे.

टॅग्स :InflationमहागाईGSTजीएसटी