शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

देव आणि दैत्य

By admin | Updated: January 17, 2017 00:30 IST

वैदिक आणि पौराणिक ग्रंथात असे वर्णन आले आहे की, दिती आणि आदिती या कश्यप ऋषींंच्या दोन पत्नी होत्या.

वैदिक आणि पौराणिक ग्रंथात असे वर्णन आले आहे की, दिती आणि आदिती या कश्यप ऋषींंच्या दोन पत्नी होत्या. दितीपासून दैत्याचा व आदितीपासून देवाचा जन्म झाला. दिती व आदिती या दोघी प्रजापती दक्ष यांच्या कन्या होत्या.वरील वास्तवाचा विचार करता दोन महत्त्वपूर्ण गोष्टी लक्षात येतात. पहिली गोष्ट म्हणजे देव व दैत्य या दोहोंचा जनक एकच आहे; परंतु माता वेगवेगळ्या आहेत. तसेच देव आणि दैत्य यांची माता आदिती आणि दिती ह्या एकाच पिता प्रजापती दक्ष यांच्यापासून जन्मल्या आहेत. यावरून स्पष्ट होते की, देव व दैत्य या दोघांचेही उत्पत्तीस्थान एकच आहे. परंतु त्यांचे गुण व कार्ये वेगवेगळी आहेत. देव सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक असून, ब्रह्मांडाच्या सुलभ संचलनात त्यांचे योगदान मानले गेले आहे. जसे पृथ्वी, जल, अग्नी, वायू व आकाश ही पंच महाभूते ब्रह्मांडाच्या निर्मितीच्या कारक आहेत आणि या पंचमहाभुतांमुळेच ब्रह्मांडाचे संचलनसुद्धा होते. अशा प्रकारे अनेक देवता आहेत आणि त्यांची कार्ये वेगवेगळी विभागली गेली आहेत. याउलट दैत्य नकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहेत. दैत्य व राक्षसी शक्ती अडथळे निर्माण करतात व विनाशाचे कारण ठरतात.वरील दोन्ही प्रकारच्या शक्ती सोबतच निर्माण झाल्या असून, ब्रह्मांडामध्ये सोबतच कार्य करीत असतात. ब्रह्मांडाचे सकारात्मक व नकारात्मक संतुलन या दोन शक्तींमुळेच कायम राहते.सकारात्मक व नकारात्मक शक्ती प्रत्येक मनुष्याच्या मनात स्वभावाच्या रूपात आढळून येतात. या स्वभावगुणांच्या प्रभावामुळे मानवाच्या व्यक्तित्त्वाची निर्मिती होते. जेथे सकारात्मक ऊर्जेला प्राधान्य असते, तेथे दैवी ऊर्जा तर जेथे नकारात्मक ऊर्जेला प्राधान्य असते, तेथे राक्षसी शक्ती प्रबळ ठरतात.ज्या शक्तीचा उपयोग लोककल्याणासाठी होतो, ती सकारात्मक ऊर्जा तर जिचा उपयोग दुसऱ्यांच्या विनाशासाठी होतो, ती नकारात्मक ऊर्जा असते. पौराणिक ग्रंथात मोठमोठे पराक्रमी व शक्तिशाली दैत्य व राक्षस राजांचे वर्णन पाहावयास मिळते. परंतु शेवटी सगळ्यांचा विनाश झालेला आहे. कारण त्यांनी त्यांच्या शक्तीचा दुरूपयोग केला आहे. शक्ती मुळातच तटस्थ असतात, त्यांची अभिव्यक्ती त्यांना चांगले किंवा वाईट बनवते. कश्यप ऋषी या मूळ व तटस्थ शक्तीचे प्रतीक असून, ती सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही प्रकारे व्यक्त झाली आहे. प्रत्येक मनुष्यामध्ये ह्या दोन्ही प्रकारच्या ऊर्जा समाविष्ट असतात. जर आपण या ऊर्जेचा उपयोग लोककल्याणार्थ केला, तर आपण देव, या उलट जर लोकविध्वंसासाठी केला तर राक्षस म्हणून ओळखले जाऊ.-डॉ. भूषणकुमार उपाध्याय