शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

महिलाशक्तीची अग्रदूत

By admin | Updated: March 9, 2017 03:55 IST

संयुक्त राष्ट्रसंघाने ८ मार्च हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ म्हणून घोषित केला. भारतामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षणाचा यज्ञ एकोणिसाव्या शतकातच प्रज्वलित केला होता.

- विजय बाविस्करसंयुक्त राष्ट्रसंघाने ८ मार्च हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ म्हणून घोषित केला. भारतामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षणाचा यज्ञ एकोणिसाव्या शतकातच प्रज्वलित केला होता.‘शिक्षणामुळे समाजातील तीव्र विषमतेचे प्रखर भान येऊन आपले जीवन समृद्ध होते’ या विचाराचा पुरस्कार करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई जोतीराव फुले यांची १२०वी पुण्यतिथी ही जागतिक महिला दिनाला जोडूनच येत आहे. तळागाळातील जनतेमध्ये शैक्षणिक परिवर्तन घडवून सामाजिक पातळीवर उद्धार करण्यासाठी सावित्रीबार्इंनी आपले आयुष्य खर्ची घातले. महात्मा फुले यांचे आयुष्य हा समाजाच्या सर्व प्रकारच्या निरपेक्ष सेवेकरिता केलेला आत्मयज्ञच होता. त्या यज्ञात स्वत:ला सर्वार्थाने समर्पित करू इच्छिणारी पत्नी सावित्रीबार्इंच्या रूपाने त्यांना लाभली. त्या काळात मुलींच्या शिक्षणाला फारशी किंंमत नव्हती; किंबहुना हेटाळणी होती. तत्कालीन उच्च समजल्या जाणाऱ्या वर्गातही स्त्रीशिक्षणाविषयी अनास्थाच होती. फुले पती-पत्नींनी मुलींच्या शाळा चालविण्याचे व्रत घेतले. पुरोगामी भूमिकेसाठी त्यांचा अनन्वित छळ झाला; पण कोणत्याही अडचणींनी या दाम्पत्याला त्यांच्या ध्येयापासून विचलित केले नाही. जोतिबांच्या शिक्षणकार्यात सहकार्य देण्यासाठी सावित्रीबाई स्वत: शिकल्या. अध्यापन, शाळांचे व्यवस्थापन व पडेल ती कामे आनंदाने करून स्त्रीशिक्षणाचे हे तारू धिराने व धिटाईने पुढे नेले. नंतर ते सर्वांना पटले व स्त्रियांना सर्व प्रकारच्या शिक्षणासाठी दरवाजे खुले होत गेले. सावित्रीबार्इंचे या क्षेत्रातले हे कार्य असाधारण, अनमोल आहे. त्यांच्या ‘काव्यफुले’ या कवितासंग्रहातील लेखनही दर्जेदार होते. स्त्रीशिक्षणाच्या कट्टर पुरस्कर्त्या सावित्रीबाई एकोणिसाव्या शतकातील एक तेजस्वी स्त्रीरत्न होत्या. आज स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. परिणामी, पुरुषांची मक्तेदारी समजल्या जाणाऱ्या अनेक क्षेत्रांत स्त्रियांनी यशस्वीपणाने केवळ पदार्पणच नाही तर आपला स्वतंत्र ठसाही उमटवला आहे. कला, साहित्य, शिक्षण, संशोधन इतकेच नाही तर अंतराळातही स्त्रिया संशोधन करीत आहेत. राजकारणातही त्यांची चमकदार अशी कामगिरी आहे. इंग्लंडमधील मेरी वूल्स्टन क्राफ्टने १७९२ मध्ये स्त्रीहक्कांच्या समर्थनाचा जाहीरनामा लिहून स्त्री-पुरुष समानतेच्या आधुनिक युगाला सुरुवात केली. स्त्री पुरुषाप्रमाणेच बुद्धिमान असते, हे सिद्ध करण्यासाठी जिवाचे रान करावे लागले. अमेरिकेच्या सोजोर्नर ट्रूथनेही मेरीचेच विचार मांडले. भारतात ताराबाई शिंंदे यांनी ‘स्त्री-पुरुष तुलना’ हा ग्रंथ लिहून पुरुषी वर्चस्वावर सडेतोड टीका केली. १९४९च्या सुमारास सिमॉन द बोवा यांनी स्त्रीहक्कांचे विचार मांडले. यामुळे स्त्रियांच्या हक्कांची दखल संयुक्त राष्ट्र संघटनेला घ्यावी लागली. १९७५ मध्ये ८ मार्च हा ‘जागतिक महिला दिन’ म्हणून साजरा करण्याचे ठरविण्यात आले. भारतात मुंबई येथे पहिला महिला दिन १९४३मध्ये साजरा झाला. १९७१ मध्ये पुण्यात महिलांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी एक मोठा मोर्चा काढला होता. युनोने १९७५ हे वर्ष जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केल्यापासून संयुक्त राष्ट्रसंघाने ८ मार्च हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ म्हणून घोषित केला. भारतात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी हे कार्य एकोणिसाव्या शतकातच भारतात केले. स्त्रियांना समाजातील एक जबाबदार घटक म्हणून समान मानवी हक्क मिळाला पाहिजे, ही काळाची गरज आहे. पण, ‘घरकाम बाईचं आणि घराबाहेरचं पैसे मिळविण्याचं काम पुरुषाचं ही वाटणी ईश्वरनिर्मित नव्हे आणि योग्यही नव्हे,’ असा खणखणीत इशारा गोपाळ गणेश आगरकरांनी मध्यमवर्गीय समाजाला शंभर वर्षांपूर्वीच दिला होता ! काळाच्या ओघात आताशा बाईचे मिळवतेपण हा समाजाने मान्य केलेला पैलू आहे; पण त्याचबरोबरीने तिला सर्व क्षेत्रांत समान अधिकार प्राप्त होण्यासाठी व जो कायद्याने ५० टक्के आरक्षण रूपात मिळाला आहे, समाजाचा निकोप दृष्टिकोन तयार होणे गरजेचे आहे व म्हणूनच जागतिक महिला दिनापाठोपाठच येणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अलौकिक योगदानाचे आणि पुण्यस्मरणाचे महत्त्व अधिक अधोरेखित करणे हा कृतज्ञतेचा नमस्कार आहे.