शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

मनोरंजनासह रोजगार निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 04:18 IST

डान्सबारबंदीचा ठेका घेऊन नाचणाऱ्या सरकार आणि टीकाकारांनी मुळात या व्यवसायातील बारबालांचा प्रश्न समजून घेण्याची गरज आहे.

- वर्षा काळेडान्सबारबंदीचा ठेका घेऊन नाचणाऱ्या सरकार आणि टीकाकारांनी मुळात या व्यवसायातील बारबालांचा प्रश्न समजून घेण्याची गरज आहे. बारबाला या ज्या समाजातून आणि जातीतून आलेल्या आहेत, तेथे प्रौढ मनोरंजनासाठी पुरुषांसमोर शृंगारिक नृत्य पूर्वापार सुरू आहे. नट, कंजार, बेरिया या जातींमधील महिला विशेषत: मद्यपी पुरुषांच्या मनोरंजनाचे काम परंपरेने करत आहेत. कला म्हणून काम करणारे आणि व्यवसाय म्हणून काम करणाºया कलाकारांमधील हा वाद आहे. प्रत्येक व्यवसायात गैरप्रकार असतातच, म्हणून सरसकट संबंधित व्यवसावर ब्लँकेट बंदी लादणे चुकीचे आहे. हेच उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांत स्पष्ट झाले आहे.म्हणूनच प्रत्येक बारबालेकडे वेश्या म्हणून पाहता येणार नाही. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान अशा विविध राज्यांमध्ये आजही या जातींमधील महिला प्रौढ पुरुषांसमोर शृंगारिक नृत्य करून मनोरंजनाचे काम करत आहेत. सरसकट डान्सबारसाठी वाटलेल्या परवान्यांमुळे या व्यवसायात स्पर्धा वाढली. ज्यामधून व्यवसायातील गैरप्रकारांना सुरुवात झाली. मात्र त्यासाठी फक्त बारबालांना दोषी ठरवणे योग्य नाही. यामध्ये भ्रष्टाचारात बरबटलेले बारमालक आणि सरकारी यंत्रणांमधील अधिकारी व कर्मचारीही तितकेच दोषी आहेत. परिणामी, डान्सबारला कायद्याच्या चौकटीत बसवण्याची गरज आहे.बंदी हा शाश्वत उपाय असूच शकत नाही. कारण १९८३ मध्ये सोफिया महल या पहिल्या डान्सबारपासून सुरू झालेल्या डान्सबारच्या शृंखलेत २००५ पर्यंत १२५० डान्सबारची वाढ झाली होती. या प्रत्येक बारमध्ये किमान ५० ते ७० बारबाला काम करत होत्या. याउलट त्याहून अधिक वेटर आणि इतर कर्मचारी काम करत होते. डान्सबारबंदीचा फटका या सर्वच घटकांना बसला.महत्त्वाची बाब म्हणजे बंदीने मनात नसतानाही बारबालांना वेश्याव्यवसाकडे ढकलले. गावाकडे जमीन नाही, शिक्षणाचा अभाव अशा नानाविध कारणांमुळे या नृत्यांगना डान्सबारकडे वळल्या होत्या. असे नाही की, त्या पहिल्यांदाच बारमध्ये नाचत होत्या.ब्रिटिशकाळापासून या महिला कोठा आणि सांस्कृतिक केंद्रांच्या माध्यमातून मुंबईसह विविध भागांत नृत्याचे प्रयोग सादर करत होत्या. त्यात डान्सबार सुरू झाल्यानंतर बाहेरून आलेल्या महिलांची वाढ झाली. मुळात ही केंद्र स्तरावरील मोठी समस्या आहे. या ३६ प्रकारच्या जातींमधील महिलांचे पुनर्वसन केल्याशिवाय हा प्रश्न सुटणारच नाही. त्याच्या जटिलतेकडे दुर्लक्ष करून नव्या समस्या निर्माण होत आहेत. हेच सरकारने जाणून घेण्याची गरज आहे. बारबालांची जबाबदारी झटकून या समस्या कधीच सुटणार नाही. उलट त्या वेगळ्या रूपात समोर उभ्या राहतील.परंपरेने सुरू असलेल्या या नृत्याच्या प्रकाराला आधुनिक काळात मनोरंजनाची जोड देण्याची गरज आहे. मुळात सरकारने परवान्यात परवानगी दिलेल्या रेन डान्स आणि आम्रपाली नृत्यप्रकारात अधिक अश्लीलतेचे दर्शन होते. नृत्यांच्या त्या प्रकारांकडे दुर्लक्ष करत घागरा-चोली परिधान करणाºया बारबालांनी अश्लीलतेला फाटाच दिला होता. अन्यथा अंगावर झाडांच्या पाल्याप्रमाणे तोडके कपडे परिधान करून किंवा रेन डान्समध्ये चिंब भिजून अधिक शृंगारिकरीत्या नृत्य सादर करण्याची कायदेशीर परवानगी सरकारने परवान्याच्या माध्यमातून दिलीच होती. मात्र ती नाकारत पारंपरिक पद्धतीने शृंगारिक नृत्य सादर करणाºया बारबालांना टीकेचे धनी करण्यात आले.याऐवजी काटेकोर नियमांमध्ये मेट्रो सिटीजमधील उच्चभ्रू वर्गासह मध्यमवर्गीय गटाची मनोरंजनाची गरज ओळखून सरकारने डान्सबारला परवानगी देण्याची गरज आहे. अमेरिकेसारख्या पाश्चात्त्य देशांस गल्फ देशांमधील डिस्को थेकआणि कॅब्रेइतक्या नाही, मात्रकिमान परंपरेने राजा आणि जमीनदारांसमोर सादर होणाºया प्रौढ पुरुषांसमोरील मनोरंजन करणाºया नृत्याला परवानगी देण्यासहरकत नसावी. त्याला काटेकोर नियमांची जोड दिल्यास नक्कीचएक मनोरंजनासह रोजगारनिर्मितीचे साधन आपण उपलब्ध करूशकतो.(लेखिका सामाजिक कार्यकर्त्या आहेत.)(शब्दांकन - चेतन ननावरे)