शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

असमानतेची दरी रुंदावली...

By किरण अग्रवाल | Updated: January 28, 2021 07:04 IST

कोरोनाच्या प्रारंभिक काळात देशात लॉकडाऊन करावे लागल्याने सर्व उद्योग-व्यवसाय ठप्प झाले होते. यात सुमारे ८४ टक्के जनतेला उत्पन्न गमावण्याची वेळ आल्याचे आकडे सांगतात.

किरण अग्रवालदेशाच्या विकास मार्गातील अडथळ्यांची जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा तेव्हा सामाजिक, आर्थिक असमानतेचा मुद्दा चर्चेला येऊन जातो खरा; पण ही असमानता दूर होण्याची चिन्हे काही दिसत नाहीत. अलीकडे हा मुद्दा राजकीय निवडणुकांमध्येही पुढे आणला जातो. मात्र दरी कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस त्यात वाढच होत आहे. केवळ आपल्या देशावरच नव्हे तर संपूर्ण जगावर गेल्या वर्षभरापासून घोंगावलेल्या कोरोना महामारीच्या संकटामुळे तर या संबंधाची दरी अधिक रुंदावून गेली आहे. विशेषतः अकुशल व असंघटित क्षेत्रातील लोकांच्या कामधंद्यांवर, नोकरीवर गंडांतर येऊन त्यांच्या रोटीचा म्हणजे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असताना व मोठ्या प्रमाणात स्थलांतर घडून आल्याने त्यांच्या आर्थिक विवंचनेत भर पडली असताना दुसरीकडे देशातील अब्जाधीशांच्या प्रगतीत मात्र भर पडली आहे. ऑक्सफाॅमच्या असमानतेविषयक ताज्या अहवालातूनही हीच बाब अधोरेखित झाली आहे.स्वित्झर्लंडच्या दावोस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेत ‘ऑक्सफाॅम’ने ‘द इनइक्व्यालिटी व्हायरस’ नामक अहवाल सादर केला असून, त्याद्वारे वाढत्या आर्थिक असमानतेकडे लक्ष वेधले गेले आहे. गेल्या मार्च २०२०पासून कोरोनाच्या महामारीने सर्वांचीच आर्थिक गणिते बिघडवली असताना व त्यामुळे सुमारे २० ते ५० कोटी नागरिक गरिबीच्या खाईत लोटले गेले असताना नेमक्या याच, म्हणजे मार्च ते डिसेंबर २०२० या काळात जगभरातील श्रीमंतांच्या संपत्तीत मात्र ३.९ लाख कोटी डॉलरची वाढ झाली आहे. भारताच्या संदर्भाने विचार करता आपल्याकडील टॉप १०० श्रीमंतांची कमाई या काळात तब्बल ३५ टक्क्यांनी म्हणजे १३ लाख कोटी रुपयांनी वाढल्याचे हा अहवाल सांगतो. श्रीमंतांच्या श्रीमंतीत तर गरिबांच्या गरिबीत वाढ झाल्याचे यातून निदर्शनास यावे. श्रीमंतीत झालेल्या वाढीची रक्कम देशातील १३.८ कोटी गरिबांमध्ये वाटली तर प्रत्येकाच्या वाट्याला ९४ हजार रुपये येतील, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. भारतातील पहिल्या अकरा श्रीमंतांच्या या कमाईतून आरोग्य मंत्रालयाचा तब्बल दहा वर्षांचा खर्च भागू शकतो. ही आकडेवारी विस्मयकारक तर आहेच; पण कोरोनाच्या व्हायरसने जगाला अडचणीत आणून ठेवले असताना असमानतेचा व्हायरस कसा वाढला आहे हेदेखील यातून लक्षात यावे.कोरोनाच्या प्रारंभिक काळात देशात लॉकडाऊन करावे लागल्याने सर्व उद्योग-व्यवसाय ठप्प झाले होते. यात सुमारे ८४ टक्के जनतेला उत्पन्न गमावण्याची वेळ आल्याचे आकडे सांगतात. मार्च ते डिसेंबर २०२० या काळात जगामध्ये अब्जाधीशांची संपत्ती २८४ लाख कोटी रुपयांनी वाढत असताना गरिबांची संख्या पन्नास कोटींनी वाढली. इतिहासात यापूर्वी कधी झाले नाही इतक्या मोठ्या प्रमाणात सर्वत्र स्थलांतर घडून आले. यातून अन्न, वस्र व निवारा यांसारख्या मूलभूत गरजांवरच परिणाम झालेला दिसून आला. भारतात तर सुमारे नऊ कोटी लोकांचा रोजगार गेला असून, एप्रिल २०मध्ये दर तासाला सुमारे १.७० लाख लोक नोकरी गमावून बसल्याचे हा अहवाल सांगतो. नोकरीवर गंडांतर आल्याचा हा वेग भयकारक असून, तो आर्थिक व सामाजिक असमानतेत मोठी भर घालणारा ठरला आहे. अनेक बाबतीत बहुविविधता असलेल्या भारतात ही समानता आणणे दिवसेंदिवस जटिल बनत चालले आहे, कारण केवळ आर्थिक पातळीवरच नव्हे तर सामाजिक बाबतीतही यात येणारे अपयश हे लपून राहिलेले नाही. पगारपाणी, आरोग्य, शिक्षण व संधी अशा सर्वच पातळीवर या असमानतेचा पाझर घडून येत असतो ज्यातून असमानता रुंदावत जाते.श्रीमंतांच्या संपत्तीत अगर कमाईत होणाऱ्या वाढीकडे असूयेने बघण्याचेही कारण नाही. काळाच्या बरोबरीने पावले टाकत व परिश्रमपूर्वक उद्योग-व्यवसाय केल्यानेच हे यश त्यांना लाभले हे नाकारता येऊ नये; पण सामान्यांच्या जीवनातील खाच-खळगे कमी करण्याच्या दृष्टीने व्यवस्थेला म्हणून ज्या उपाययोजना करायला हव्यात त्या का करता येत नाहीत, हा यातील खरा प्रश्न ठरावा. समानतेसाठीची संधी उपलब्ध करून देणाऱ्या व्यवस्थेने डोळसपणे याकडे लक्ष पुरवणे गरजेचे आहे. हातावर पोट घेऊन जगणाऱ्यांच्या उत्पन्नावरील करात कपात अगर बदल केले गेले तर त्याचा परिणाम नक्कीच होऊ शकेल; पण अर्थसंकल्प तोंडावर असताना यासंबंधाच्या चर्चा होत असल्या तरी प्रत्यक्षात तसे दिलासादायक फारसे घडून येत नाही. हा दिलासा ना आर्थिक संबंधाने मिळतो, ना सामाजिक संबंधाने. परिणामी गरीब व श्रीमंतांमधील दरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.‘‘सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठाय हो?, सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठाय हो?’’असा प्रश्न विचारण्याची वेळ प्रख्यात कवी, लोकशाहीर वामनदादा कर्डक यांच्यावर आली ती त्याचमुळे. अर्थात या प्रश्नाचे उत्तर आजही मिळू शकलेले नाही व मिळण्याची लक्षणेही नाहीत हेच ऑक्सफाॅमच्या ताज्या अहवालाने निदर्शनास आणून दिले म्हणायचे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEconomyअर्थव्यवस्था