शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

देवत्व जागवणारा नाशिक पॅटर्न

By admin | Updated: September 17, 2016 04:41 IST

श्रद्धा मनात असावी लागते. तशी ती असली की तिचे प्रदर्शन मांडण्याची अगर तिच्याशी संबंधित उपचारात अडकण्याची गरजच भासत नाही

श्रद्धा मनात असावी लागते. तशी ती असली की तिचे प्रदर्शन मांडण्याची अगर तिच्याशी संबंधित उपचारात अडकण्याची गरजच भासत नाही. मूर्तीत पाहिले जाणारे देवपण मनुष्यात उतरण्याची आवश्यकता म्हणूनच प्रतिपादिली जाते आणि आजच्या काळात अनेकविध समस्यांवर तेच लाभदायी ठरू शकणारे आहे. जलप्रदूषण रोखण्यासाठी गणेशमूर्तींचे नदीत विसर्जन न करता त्या मूर्ती महापालिका वा सामाजिक संस्थांकडे दान करण्याच्या नाशिककरांनी जपलेल्या व जोपासलेल्या चळवळीला यंदाही जो भरघोस प्रतिसाद लाभला, तो असाच माणसां-माणसांतील देवत्वाची प्रचिती देणारा तसेच पर्यावरणविषयक समस्येवर उपाय सुचविणारा ठरला आहे. अनंत चतुर्दशीला नदीत विसर्जित केलेल्या मूर्ती काही अंतरापर्यंत वाहात जाऊन नदीकाठी विद्रुपावस्थेत विखरून पडलेल्या आढळून येतात. दहा दिवस ज्या बाप्पाचे मनोभावे पूजन केले त्या बाप्पांच्या विसर्जित मूर्तीची ही विदारक अवस्था प्रत्येक सश्रद्ध मनासाठी वेदनादायीच ठरत असते. प्रत्येकच ठिकाणी हे असे होते. पण नाशकात त्याचे गांभीर्य अधिकत्वाने यासाठी जाणवते की, येथे शहराच्या मध्यवस्तीतून गोदावरी वाहाते. त्यामुळे गणरायाचे विसर्जन झाल्यानंतर नदी किनारी जागोजागी आढळणाऱ्या भग्न मूर्तींचे वास्तव जसे समोर येते तसेच जलप्रदूषण व एकूणच पर्यावरणाच्या हानीचा प्रश्नही उपस्थित होतो. याच पार्श्वभूमीवर १९९८ पासून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने मूर्तिदानाची संकल्पना पुढे आली. नदीपात्रात टाकून दिले जाणारे निर्माल्य गोळा करता करता विसर्जित मूर्तीही दान म्हणून मिळविण्याचा प्रयत्न या अंतर्गत केला गेला. त्यास प्रारंभी काहीसा विरोध झाला हे खरे, परंतु या संकल्पनेमागील भूमिका लक्षात आल्यावर गेल्या काही वर्षांपासून मूर्तिदानास प्रचंड प्रतिसादही मिळू लागला. यंदाही अशा लाखो मूर्ती दान केल्या गेल्या. महापालिकेसह सामाजिक संस्था-संघटनाही याकरिता पुढे आल्याने व ‘देव द्या, देवपण घ्या’ अशा विचारप्रवृत्त करणाऱ्या आवाहनामुळे आता विसर्जित गणेशमूर्ती दानाचा ‘नाशिक पॅटर्न’ प्रस्थापित व्हावा, असे यश या चळवळीला लाभलेले दिसून येते.महत्त्वाचे म्हणजे, प्लॅस्टिकच्या पिशवीतून निर्माल्य नदीपात्रात फेकून देणे पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक असल्याबद्दल जनजागृती करीत यंदा अनेक सामाजिक संघटनांनी पाण्यात विलय होणाऱ्या पर्यावरणपूरक निर्माल्य पिशव्या मोठ्या प्रमाणात घरोघरी पोहोचविल्या. त्याखेरीज यंदा प्रथमच पुण्यापाठोपाठ नाशकातही ‘पीओपी’ मूर्तींचे विघटन करू शकणाऱ्या अमोनिअम बाय कार्बोनेट पावडरचे महापालिकेतर्फे मोफत वितरण करण्यात आले. शहराच्या सहा विभागात चार टनपेक्षा अधिक पावडर वितरित केली गेली. नदीकाठी होणारी गर्दी, नदीतील विसर्जनामुळे होणारे जलप्रदूषण यासारख्या बाबींना फाटा देण्यासाठी घरच्या घरी बाप्पांच्या विसर्जनाची मानसिकताही जोर धरू पावत असल्याचेच यातून स्पष्ट व्हावे. गणेशोत्सव साजरा करताना काही सार्वजनिक मंडळांनी डेकोरेशन व अन्य खर्च न करता जमलेल्या वर्गणीतून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पुरविल्याचेही दिसून आले. सारे काही संपल्याचा निराशावादी उसासा टाकणाऱ्यांनी हरखून जावे, असेच हे चित्र आहे.एकीकडे बाप्पांच्या संदर्भाने या साऱ्या आश्वासक व विवेकवादी उपक्रमांना लोकमान्यता लाभत असताना, या सकारात्मकतेत भर घालणारी आणखी एक बाब जिल्ह्यातील अंदरसूलसारख्या छोट्या गावी घडून आली आहे. शासन अवयवदानाची मोहीम चालवित असताना जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजप्रणीत श्री संप्रदायाच्या पुढाकारातून अंदरसूलच्या पंचक्रोशीतील सुमारे ७०० गावकऱ्यांनी देहदानाचा संकल्प केला आहे. बुवा-बाबांबद्दलच्या कुणाच्या धारणा काहीही असोत, परंतु श्रद्धेचा मार्ग रचनात्मक कार्यासाठी कसा प्रशस्त करता येतो, हेच यातून स्पष्ट व्हावे. बाप्पा गणरायाच्या निमित्ताने जागलेले हे समाजभान महत्त्वाचे आहे.- किरण अग्रवाल