शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
2
राजीनामा-शासन भिकारी, माणिकराव कोकाटेंच्या विधानावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले...
3
Video : चाकू काढला आणि ३२ हजारांचा लेहेंगा फाडला, दुकानदाराला म्हणाला, 'तुलाही असाच फाडेन'; कल्याणमधील व्हिडीओ व्हायरल
4
IND vs ENG: शुभमन गिल की सचिन तेंडुलकर? ३५ कसोटीनंतर कोण वरचढ? पाहा आकडे!
5
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
6
स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न पाहताय? 'सेल्फ-कन्स्ट्रक्शन होम लोन' कसं मिळवायचं, व्याजासह प्रक्रिया जाणून घ्या
7
Deep Amavasya 2025: आषाढ अमावास्येला दिव्यांची आवस म्हणतात, गटारी नाही; धर्मशास्त्र सांगते...
8
ट्रेन सुटली तरीही वाया जात नाही तुमचं तिकीट...! रेल्वेचा हा नियम तुम्हाला कदाचितच माहित असेल
9
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मुक्ताईनगर बंद
10
Viral Video: महाकाय अजगराला जांभई देताना कधी पाहिलंय का? दृश्य पाहून तुम्हालाही भरेल धडकी...
11
जावेसोबतच्या भांडणाचा राग अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचं षडयंत्र; पिठात विष मिसळलं, पण...
12
भारतीय कुटुंबांची 'बचत' सवय मोडली? ५० वर्षांतील सर्वात कमी बचत दर, गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले असं असेल तर..
13
बिहारमधील नेत्यासाठी जगदीप धनखड यांचा राजीनामा, काँग्रेस नेत्याचा नवा दावा
14
IPO मध्ये १ लाख गुंतवले, आता त्याचे राहिले फक्त ₹३,२००; कसं मोठ्या आयपीओंनी बनवलं गुंतवणुकदारांना कंगाल
15
"पंडित नेहरुंनी मांडीवर बसवलं, गुलाबाचं फूल दिलं", सचिन पिळगावकरांचा हा किस्सा माहितीये का?
16
Rajasthan Accident: देवदर्शनाहून परतताना भीषण अपघात; पाच ठार, चार जण जखमी!
17
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
18
“यालाही हनी ट्रॅप म्हणायचे का?”; फोटोला फोटोने उत्तर, ठाकरे गटाच्या आरोपावर भाजपाचा पलटवार
19
सोने, चांदी, बिटकॉइन स्वस्त होणार? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा दावा; वॉरेन बफेही 'त्या' क्षणाची वाट पाहतायेत?
20
एअर इंडियाच्या बोईंग जेटच्या फ्युएल कंट्रोल स्विचची तपासणी पूर्ण; समोर आली महत्त्वाची माहिती

ही मागणी पुस्तकी पंडितपणाची!

By admin | Updated: May 1, 2017 01:12 IST

तूरडाळीच्या वादात महाराष्ट्रातील शेतकरी भरडून निघत असतानाच राज्यातील काही भागाला गारपिटीचा तडाखा बसला आहे.

तूरडाळीच्या वादात महाराष्ट्रातील शेतकरी भरडून निघत असतानाच राज्यातील काही भागाला गारपिटीचा तडाखा बसला आहे. निसर्ग आणि माणूस यांच्या कचाट्यात नुसत्या महाराष्ट्रातीलच नव्हे, तर संपूर्ण देशातील शेती कशी सापडत आली आहे, त्याची ही दोन ताजी उदाहरणे. अशा परिस्थितीत शेतमालाच्या उत्पन्नावर प्राप्तिकर लावावा, अशी सूचना ‘नीती आयोगा’चे सल्लागार विवेक देबरॉय यांनी केल्याने गदारोळ उडाला आहे. देबरॉय यांच्या या सूचनेवर अर्थमंत्री अरुण जेटली यांना रशियाच्या दौऱ्यावर असताना मॉस्को येथून तातडीने खुलासा करणे भाग पडल्याने हा मुद्दा राजकारण्यांसाठी किती संवेदनशील आहे, ते उघड होते. मात्र जेटली यांच्या इतक्या स्पष्ट खुलाशानंतरही केंद्र सरकारचे आर्थिक सल्लागार डॉ. अरविंद सुब्रमण्यम यांनी पुन्हा एकदा या विषयाला तोंड फोडले आहे. ‘श्रीमंत शेतकऱ्यांवर तरी प्राप्तिकर लावायलाच हवा’, असे डॉ. सुब्रमण्यम यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे. योगायोगाने ही मुलाखत प्रसिद्ध झाली, त्याच दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना आवाहन केले आहे की, ‘मागेल त्या शेतकऱ्याला कर्ज द्या’. भारताच्या शेतीधोरणात जी काही धरसोड अगदी महात्मा फुले यांनी ‘शेतकऱ्यांचा आसूड’ लिहिला तेव्हापासून आजतागायत कशी सुरू आहे, ते दर्शविणारी ही उदाहरणे आहेत. देशातील १३० कोटी लोकसंख्येतील केवळ साडेतीन कोटी लोक आपल्या उत्पन्नावर प्राप्तिकर भरतात. उघडच आहे की, हे प्रमाण अत्यल्प आहे आणि ते वाढवणे जरुरीचे आहे. कराचे प्रमाण वाढविल्यास तो चुकविण्याकडे कल असतो. त्यामुळे कर जर माफक प्रमाणात असेल, तर तो भरण्यास नागरिक तयार असतात, असे मानले जात आले आहे. त्यामुळे कराचे प्रमाणही वाढवता येत नाही. या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त नागरिकांना कर आकारणीच्या कक्षेत आणणे अतिशय महत्त्वाचे असते. ‘शेतीच्या उत्पन्नावर प्राप्तिकर’ या मुद्द्याकडे या एका पद्धतीने बघता येते. विवेक देबरॉय वा अरविंद सुब्रमण्यम अथवा इतर अनेक अर्थतज्ज्ञ या पद्धतीने हा मुद्दा उठवत असतात. त्यासाठी पाश्चिमात्य विकसित देशांतीलही उदाहरणे दिली जात असतात. पण या अर्थतज्ज्ञांची ही पद्धत अपुरी आहे. फार दूर जायचीही गरज नाही. सध्याच्या तूरडाळीच्या वादाचेच उदाहरण घेता येईल. भारतात एकूण डाळींचे उत्पादन मागणीपेक्षा कमी आहे. त्यामुळे डाळी आयात कराव्या लागत आल्या आहेत. त्याकरिता पुढील वर्षात देशातील डाळीच्या उत्पादनाचा अंदाज घेऊन आयात किती करायची हे ठरवून कंत्राट केले जाते. हे गेली अनेक वर्षे होत आले आहे. पण २०१४ साली मोदी सरकार सत्तेवर आले. विजयाच्या ओघात अशी आयात कंत्राटे करण्याकडे पुरेसे लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे मागणी व पुरवठा यात मोठी तफावत पडली. डाळीचे भाव २०० रुपये किलोपर्यंत भडकले. ओरडा सुरू झाला. ‘अच्छे दिन’चे काय झाले, असा प्रश्न विचारला जाऊ लागला. तेव्हा तूर लावायची मोहीम हाती घेण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांना केले. त्यावेळी तुरीचा भाव क्विंटलला १३ हजार रुपये होता. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तूरडाळीची लागवड केली. मात्र हे पीक येण्यापर्यंत तूरडाळीच्या आयातीचे परवाने देण्यात आले. व्यापाऱ्यांनी भरमसाठ तूर आयात केली. तीही १८ हजार रुपये क्व्ािंटल भावाने. मग प्रचंड पीक आले आणि मागणीपेक्षा पुरवठा खूप जास्त झाला. तेव्हा तुरीचे भाव साडेतीन हजारांपर्यंत कोसळले. शेतकऱ्यांचा दर एकरी खर्चही भागणार नाही, इतका कमी हा भाव होता. म्हणून तूर खरेदी करण्याची पाळी सरकारवर आली. पण सरकारकडे त्याची काही व्यवस्थाच नव्हती. ना गुदामे होती, ना बारदाने. शिवाय इतकी लाखो क्विंटल तूर खरेदी करण्यासाठी पैसा नाही, ती गोष्टच वेगळी. शेतीतील ही अशी अनिश्चितता आहे, तशी ती इतर उद्योगधंद्यात नाही. म्हणूनच पाश्चिमात्य विकसित देशांत शेतीला भरपूर अनुदान देतात. अमेरिका तर अब्जावधी डॉलर्सचे अनुदान शेतकऱ्यांना देते. शेतकऱ्याला किफायतशीर भाव आणि ग्राहकांना परवडणाऱ्या किमती हे समीकरण तेथे जमते, ते त्यामुळेच. तेथील शेतकऱ्याला दरवर्षी ठरावीक उत्पन्न मिळण्याची हमी असते. जर निसर्गाचा फटका बसला, तर सुनियोजित विमा योजनाही असतेच. आपल्याकडे हे काहीही नसताना ‘शेतीवर प्राप्तिकर’चा आग्रह धरणे म्हणजे पुस्तकी पढीत पंडितपणा आहे. डॉ. सुब्रमण्यम म्हणतात की, श्रीमंत शेतकऱ्यांवर कर लावा’. मात्र ते हे सांगत नाहीत की, एकीकडे ८० टक्के शेतकरी हे दोन एकरांच्या आतील आहेत आणि ज्यांच्याकडे २५ किंवा ५० एकरही शेती आहे, ती कोरडवाहू असल्यास तो शेतकरी ‘श्रीमंत’ ठरत नाही. मंत्रालयातील वरिष्ठ लिपिकापेक्षाही त्याला दर महिना कमी उत्पन्न मिळत असते. शिवाय ‘उद्योगधंदा करण्यासाठी सुयोग्य माहोल हवा’, अशी मागणी करणारे हे अर्थतज्ज्ञ ‘शेती करण्यासाठी योग्य तसा माहोल असायला हवा’, हा आग्रह धरताना कधी कोणी ऐकले आहे काय? ‘शेतीतील उत्पन्नावर कर’ ही मागणी केली जात असते, ती अशा पुस्तकी पढीत पंडितपणापायी.