शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

अधिवेशनात डाळ शिजेल?

By admin | Updated: March 8, 2017 02:41 IST

तुरीला प्रतिक्विंटल ५०५० रुपयांचा हमीभाव मिळेल, म्हणून प्रत्येक जिल्ह्यात नाफेडच्या खरेदी केंद्रांवर वाहनांच्या रांगा लागल्या. त्याचा खुल्या बाजारावरही परिणाम झाला.

- धर्मराज हल्लाळेतुरीला प्रतिक्विंटल ५०५० रुपयांचा हमीभाव मिळेल, म्हणून प्रत्येक जिल्ह्यात नाफेडच्या खरेदी केंद्रांवर वाहनांच्या रांगा लागल्या. त्याचा खुल्या बाजारावरही परिणाम झाला. भाव ३५०० ते ३७०० पर्यंत घसरला. शासनाने बारदाना, वेअरहाऊससारखी कारणे देत खरेदी बंद केली. आतातरी सर्वाधिक आत्महत्त्या झालेल्या मराठवाड्यातील आमदार अधिवेशनात आवाज उठवतील का? किचकट नियमांची कसरत पूर्ण करीत नाफेडच्या तूर खरेदी केंद्रांवर पोहोचलेल्या शेतकऱ्यांना भुर्दंडच सोसावा लागला. बारदान्याअभावी शेतमालाची खरेदी बंद करणे हे शासनासाठी मोठी नामुष्की आहे. दुष्काळात होरपळलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना वाहतुकीचा भुर्दंडही सोसणारा नाही.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांपूर्वी राज्य शासनाने मोठा गाजावाजा करीत राज्यभरात ५०५० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केंद्र उघडली होती. प्रारंभी किचकट नियमांमुळे शेतकऱ्यांचा खरेदी केंद्रांवर म्हणावा तितका प्रतिसाद नव्हता, परंतु खुल्या बाजारात ४१०० ते ४२०० इतका भाव अन् शासनाच्या केंद्रात मिळणारा पाच हजारांवरील भाव यामुळे खरेदी केंद्रावर गर्दी वाढली. नांदेड, परभणी जिल्ह्यात एकूण ३८ हजार क्विंटलपेक्षा अधिक तुरीची खरेदी करण्यात आली होती. हीच परिस्थिती संपूर्ण मराठवाड्यात राहील. कुठे बारदाना नाही, कुठे वजनकाट्याची कमतरता आहे, कुठे हमाल नाहीत. सर्वच तालुक्यांच्या ठिकाणी खरेदी केंद्र नसल्याने शेतकऱ्यांचा वाहनखर्चही वाढला; परंतु बारदाना, वेअरहाऊस यासारखी कारणे देऊन अनेक ठिकाणी खरेदीच बंद झाली. परिणामी खुल्या बाजारातही ४१०० ते ४२०० रुपयांवरून ३५०० ते ३७०० रुपयांवर प्रतिक्विंटल घसरण झाली.तीन वर्षांच्या दुष्काळानंतर यंदा सोयाबीननंतर तुरीची आवक वाढली. राज्यभर यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनचे उत्पन्नही वाढले होते. परिणामी भाव घसरले. त्यावर सरकारने अनुदानाचा पुळका दाखविला. प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेऊन थट्टाच केली. त्यातही नियमावली इतकी किचकट होती की, शेतकरी अनुदान लाभापासून चार हात दूर राहिले. नांदेड जिल्ह्यात केवळ अडीच हजार शेतकऱ्यांनी अनुदानासाठी अर्ज केले आहेत. अनुदान देताना सातबारावरील एकूण पेऱ्याचा निकष न लावता बाजार समितीअंतर्गत अडत्यांकडे सोयाबीनची विक्री करणारे शेतकरीच अनुदानपात्र ठरणार आहेत. शासनाने निर्धारित केलेल्या कालावधीत नांदेड जिल्ह्यात ३५ हजार २२९ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आली. त्यावर मिळणाऱ्या फुटकळ मदतीसाठी अव्वाच्या सव्वा कागदपत्रे मागितल्याने अनुदानाची घोषणा देखावा ठरला. प्रत्येक काढणी हंगामात शेतमाल एकाचवेळी बाजारात विक्रीला येतो. त्यामुळे भाव खाली येतात. आर्थिक विवंचनेमुळे शेतकरी मिळेल त्या दरात शेतमाल विकून मोकळा होतो. त्यामुळे शेतमाल साठवणूक करून काही कालावधीनंतर विक्री केल्यास वाढीव दराचा शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. त्यासाठी कृषी पणन मंडळामार्फत शेतमाल तारण योजना राबविली जाते. या योजनेसाठी पूर्वी पणन मंडळाकडून निधी उपलब्ध झाल्याने तारण कर्ज दिले जात असे. आता बाजार समित्यांमार्फत ही योजना राबविली जाते. शेतमालाच्या चालू भावानुसार ७० टक्के रक्कम तारण कर्ज म्हणून शेतकऱ्यांना मिळू शकते, परंतु आर्थिक गुंतागुंत एवढी आहे की, शेतकऱ्यांना माल तारण ठेवणेच परवडत नाही. परिणामी पदरी काही पडो न पडो शासन शून्य प्रतिसादाच्या अशा योजना राबवून घोषणांचा बाजार तेवढा भरविते. सोयाबीन अनुदानाच्या फसवणुकीनंतर तूर खरेदीचाही ठेंगा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना परवडणारा नाही. पिकलेले बेभाव विकले गेले तर महिनाभरात होणाऱ्या शेकडो आत्महत्या थांबणार कशा? हा प्रश्न आहे. त्याचवेळी हा प्रश्न उपस्थित करण्याची ज्यांची जबाबदारी आहे, ते आमदार अधिवेशनात प्रश्नांची डाळ कशी शिजवतात याकडे लक्ष आहे.