शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

कोटी कोटींची अमली ममता

By admin | Updated: June 24, 2016 01:00 IST

अडीच हजार कोटींचा आकडा, २३ टन एवढ्या प्रचंड प्रमाणात ड्रग्जचा साठा आणि त्यात एका जमान्यात अनेक सिनेमावेड्यांची लाडकी असलेली ममता कुलकर्णी हिचे चर्चेत आलेले नाव

अडीच हजार कोटींचा आकडा, २३ टन एवढ्या प्रचंड प्रमाणात ड्रग्जचा साठा आणि त्यात एका जमान्यात अनेक सिनेमावेड्यांची लाडकी असलेली ममता कुलकर्णी हिचे चर्चेत आलेले नाव, यामुळे सोलापूरकर चक्रावून गेले आहेत. सोलापूरच्या औद्योगिक वसाहतीत नक्की काय घडले आणि घडते आहे याविषयी कुणालाच कुणकुण कशी लागत नाही, याचीच चर्चा चालू आहे. साधी पानटपरी सुरू करायची तर हज्जार शासकीय अडथळे पार केल्यानंतर ती सुरू होते हा सर्वसामान्य अनुभव. पण इथे हजारो कोटींचे अवैध व्यवहार सुरू असताना कुठलाच अडथळा का आला नाही, हा प्रश्न सर्वांना सतावतो आहे. त्या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घ्यायचा प्रयत्न केला असता अनेक चिंताजनक मुद्दे पुढे आले. केमिकल कारखाने आणि त्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या शासकीय यंत्रणांच्या ढिसाळ कारभारावरच या निमित्ताने प्रकाश पडतो आहे. सोलापूर शहरालगत १५ किलोमीटर अंतरावरील चिंचोली औद्योगिक वसाहतीत गेल्या अनेक वर्षांपासून एव्हॉन लाईफ सायन्सेस लि. ही कंपनी औषध निर्मितीचे काम करते आहे. जवळजवळ दीडशे लोकांना रोजगार देण्याचे काम या कंपनीने केले. निर्मिती होते पण नक्की कशाची याचा पत्ता मात्र त्या दीडशे लोकांना आजही लागलेला नाही. याच कंपनीतून इफेड्रीन हे अमली पदार्थ मानले जाणारे ड्रग पोलिसांनी हस्तगत केले आणि सर्वांचे डोळे उघडले.नायजेरियाच्या माफियाला ताब्यात घेतलेल्या ठाणे पोलिसांनी अमली पदार्थाचे सोलापूर कनेक्शन शोधून काढले. ठाणे पोलीसच या प्रकरणाच्या मुळाशी पोहोचले. आंतरराष्ट्रीय पातळीवर इफेड्रीन आणि अमली पदार्थ माफियांचे जाळे कसे विणले गेले आहे, याची माहिती त्यांनी उजेडात आणली. ड्रग डॉन गोस्वामी आणि त्याची पत्नी अभिनेत्री ममता कुलकर्णी यांच्या सहभागापर्यंत पोलीस यंत्रणेचा तपास पोहोचला. देशात आणि विदेशात या प्रकरणाने खळबळ उडाली असताना सोलापुरात मात्र सामसूम असल्याचेच चित्र आजही दिसते. वास्तविक आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलेल्या अमली पदार्थासारख्या विषयाचे कनेक्शन सोलापूरशी आहे म्हटल्याबरोबर जिल्हा प्रशासन खडबडून जागे व्हायला हवे होते. तसे न घडता जिल्ह्यातील सर्वच शासकीय यंत्रणांनी बघ्याची भूमिका घेतली. कोणताही उद्योग सुरू होताना कंपनी कायद्यानुसार नोंदणीपासून ते अन्न व औषधी प्रशासनापर्यंतच्या असंख्य परवान्यांची गरज असते. उद्योग सुरू झाला तरी कामगार कायद्यापासून ते औषधी प्रशासनापर्यंतच्या अनेक तपासण्यांना दर महिन्याला उद्योगांना सामोरे जावे लागते. असा अनुभव एव्हॉन लाईफ सायन्सेस लि. या कंपनीच्या बाबतीत आलाच नसेल काय? जर तशा तपासण्या वेळोवेळी झाल्या असतील तर अन्न व औषधी विभागाला त्यात काहीच का सापडले नाही. असे अनेक प्रश्न उभे राहतात. एरव्ही उद्योगाशी संबंधित सर्वच स्थानिक शासकीय यंत्रणा त्रुटी राहिली की कायद्याचा बडगा उगारताना दिसतात. तोच न्याय एव्हॉन कंपनीला वेळोवेळी लावला असता तर अमली पदार्थाचे जाळे वेळीच उद्ध्वस्त करता आले असते. त्यात औषध निर्मिती आणि त्यावरील नियंत्रण पद्धती यातील तांत्रिक गौडबंगालही सामान्य माणसाच्या विचारापलीकडचे आहे. शासनमान्य औषधांच्या फॉर्म्युल्यात थोडाबहुत फरक केला तरी तो अमली पदार्थ म्हणून वापरात येऊ शकतो, असे सांगितले जाते. त्याचाच फायदा अमली पदार्थ निर्मितीत गुंतलेले तस्कर घेतात. २० महिन्यांपूर्वी कुर्डूवाडीत एका कारखान्यात अशीच अमली पदार्थ निर्मिती झाल्याचे उघडकीस आले होते. त्या प्रकरणात स्थानिक ढवळे व शहा ही मंडळी आजही तुरुंगात आहेत. त्या प्रकरणाची पाळेमुळे आणि सूत्रधार आजही शोधले गेलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर एव्हॉन कंपनी आणि आंतरराष्ट्रीय अमली पदार्थाचे रॅकेट सोलापूरच्या माध्यमातून कार्यरत असेल तर ती चिंतेची बाब आहे. जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन उद्योगांशी असलेल्या सर्वच विभागांचे मजबूत कुंपण कार्यरत करायला हवे तसे घडल्यास कोटी कोटींची अमली ममता रोखून सोलापूरही स्वच्छ राहील.- राजा माने