- दिलीप तिखिलेनागपूरच्या एका शासकीय कार्यालयातील प्रसंग...!बॉस : काय गोपाळराव आज उशीर झाला?गोपाळराव : सर, हिवाळी अधिवेशन सुरू आहे ना...!बॉस : (आश्चर्याने) अधिवेशनाचा आणि तुमच्या उशिरा येण्याचा संबंध काय?गोपाळराव : सर...! सर्व रस्ते जाम. स्कूटर, सायकल तर सोडाच, पायी चालणे सुद्धा कठीण झाले आहे. (बॉस चूप...! एकाच उत्तराने बॉस चूप होतो हे पाहिल्यावर मग इतर कर्मचाºयांनाही चेव आला आणि कार्यालयातच अधिवेशनावर गरमागरम चर्चा सुरू झाली.)एक बाबू : खरंच आहे... जाम वैतागलो बुवा या ‘जाम’ने. बरं आॅफिसला लेट होतो त्याचे काही नाही. ते तर आपले नेहमीचेच आहे. पण जाताना लवकर निघालो तरी घरी पोहोचायला वाजतात सात-आठ. सौ.चा संशयी चेहरा दारातच उभा ठाकलेला. उशीर का झाला, कुठे होता एवढा वेळ? प्रश्नांची नुसती सरबत्ती. जाम वैतागच.दुसरा कर्मचारी : बरं या अधिवेशनाने साधते काय?...दहा, बारा दिवस कामकाज चालवायचे. त्यातही काही दिवस गोंधळ. मुंबईहून आणलेल्या काही फायलींवर सह्या करायच्या आणि अंतिम आदेश काढण्यासाठी पुन्हा मुंबईलाच न्यायच्या. शेवटी मुंबईहूनच सूत्रे हलणार असतील तर ही सर्कस कशाला?तिसरा बाबू : याचे म्हणणही बरोबर आहे. पण, पण बिचारे मुंबईचे अधिकारी, राज्यातल्या इतर भागातले मंत्री, आमदारांना विदर्भाच्या गुलाबी थंडीत ताडोबा, पेंच, चिखलदराच्या सहली घडणार कशा?चौथा बाबू : अधिवेशन विदर्भातच घ्यायचे ना? मग दोन दिवस ताडोबा, दोन दिवस चिखलदरा, दोन दिवस पेंच...असे घेतलेतर...! काम तर काम नाही तर सहल.आयडिया चांगली आहे. कवीसारखा भासणारा चेहरा उत्तरला. बघाना...अधिवेशन येई घरा,लाखलाखांचे मोर्चे धडकले.तिकडे झाडूनि सारे व्हीआयपी,लवाजम्यासह अवतरले.शहर गुदमरले, रस्त्यांचे श्वासही कोंडले.गर्दीत हरवला माणूस...कवितेचे हे शेपूट लांबतच जाणार या भीतीने सर्व बाबू मग नाईलाजाने कामाला लागले.
अधिवेशन येई घरा...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 02:45 IST