शहरं
Join us  
Trending Stories
1
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
3
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
4
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
5
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
6
IND vs SA Women's World Cup 2025 Final Live Streaming: फायनलमध्ये 'ही' गोष्ट ठरेल भारतासाठी जमेची बाजू
7
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
8
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
9
IND vs AUS 3rd T20I Live Streaming : हा सामना जिंका नाहीतर मालिका विसरा! टीम इंडियाकडे शेवटची संधी
10
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
11
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
12
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
13
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
14
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
15
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
16
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
17
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
18
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
19
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
20
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले

मुलांना खरं सांगायची भीतीच वाटते!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 05:49 IST

पर्यावरणाबद्दल केवळ भान असणं पुरेसं नाही, सजग कृतीकडं सरकणं हा सर्वांत महत्त्वाचा टप्पा आहे!

- प्रियदर्शिनी कर्वे, पर्यावरणस्नेही तंत्रज्ञानाच्या पुरस्कर्त्याकोरोनाकाळानं जागतिक पर्यावरणाबद्दल माणसांचं भान अधिक ठळक केलं, असं वाटतं का? तुमचा स्वत:चा अनुभव काय?पर्यावरणाकडं लोक जरा जास्त रोखून बघायला लागले, हे खरं; पण सुरुवातीला  ‘पर्यावरणाचा ऱ्हास केलात ना? आता भोगा शिक्षा!’ अशा प्रतिक्रिया होत्या. घरामध्ये स्वस्थ बसून लोक या अशा सोशल मीडिया पोस्ट टाकत होते, तेव्हा शेकडो किलोमीटर्स पायपीट करून असंख्य माणसं हालअपेष्टा सोसत, उपाशीतापाशी  स्वत:च्या गावा-घराकडं निघाली होती. शिक्षा भोगण्याबद्दलच्या चर्चा करताना ही विसंगती मला खुपत होती. ‘पर्यावरण’ म्हटल्यावर त्यातली माणसं त्याचा भाग नाहीत का?  मानवी हस्तक्षेप घटल्यामुळं स्वच्छ झालेली तळी नि नद्या, अचानक दिसायला लागलेले पक्षी, यांच्याबद्दलचे उमाळे  सर्वसामान्य उच्च मध्यमवर्गीय माणूस असे काही काढतो, जसं पर्यावरणाचा ऱ्हास कोणी दुसऱ्यानं केला होता! जे हे लिहितात ते या ऱ्हासाला व उद्भवलेल्या समस्यांना जबाबदार नसतात का?  जानेवारीत २०२० मध्ये जेव्हा आम्ही काही लोकांनी जगभरातले आढावे घेऊन लोकांशी बोलायला, त्यांना सावध करायला सुरूवात केली तेव्हा लोक गांभीर्यानं घेत नव्हते. कोरोनाग्रस्तांची आकडेवारी वाढू लागली तशा चर्चा समोर येऊ लागल्या, की परदेशात साथीचं थैमान खूपच वाढलंय त्यामानानं आपल्याकडं कमी आहे. मुळात त्यावेळी चाचण्या करण्याचं प्रमाण अत्यंत कमी होतं. शिवाय कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत नाही तोपर्यंत पूर्ण चित्र समोर येत नाही, हा मुद्दा बऱ्याच ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न मी केला.  

पुढच्या लाटेत तीव्र संसर्गानं माणसं मरू लागली तेव्हा आकडे लपवणं सरकारला कठीण होऊन बसलं. पर्यावरण असा शब्द उच्चारला की, माणसासहित पर्यावरण मी मानत असल्यामुळं पर्यावरणाबद्दल भान असणं व सजग कृतीकडं सरकणं या गोष्टींमध्ये अंतर राहतंय. ते ठळक झालं.नैसर्गिक व कोविडसारख्या  आपत्तींचं वाढतं प्रमाण पाहता डिग्रोथ, मिनिमलिझम अशा संकल्पनांना बळ मिळेल असं वाटतंय?‘पर्यावरणस्नेही जीवनशैली’ नावाची एक कार्यशाळा आम्ही घेतो. त्यावेळी चर्चेचा एक मुद्दा असतो की, आपण संसाधनांचा वापर कमीत कमी करून पर्यावरणावरचा ताण कसा कमी करू शकतो, याचा विचार करायचा! पाणी वाचवणं, कचऱ्याचं वर्गीकरण करणं, हे विचार तिथं सुरू होतात तेव्हा अनेक जण दोन तऱ्हेचे प्रश्‍न विचारतात, ‘आम्ही घरी काम करण्यासाठी येणाऱ्या लोकांना हे कसं पटवून सांगू?’ व ‘ग्रामीण भागातील लोकांना हे कसं शिकवायचं?’शहरांमध्ये संसाधनांची उधळमाधळ अधिक होते, तेव्हा ग्रामीण भागात जाऊन समजावण्याची काहीच गरज नाही. घरात काम करायला येणारी बाई दहा घरी काम करत असेल, तर तिचा भर दहा मिनिटांत काम संपवून जाण्याकडं असणार. तुमचं पाणी तिनं वाचवावं म्हणून तिनं दहा मिनिटं वाढवून काम करावं, असं वाटत असेल, तर तिला तिच्या वेळेसाठी वाढवून मेहनताना द्यायला हवा. तिची प्राथमिकता काय आहे, हे समजून न घेता तुम्ही उपाययोजना करणार असाल, तर कठीण आहे. आपल्याला स्वत:च्या सवयी बदलायच्या नाहीत, म्हणून  दुसऱ्याचं नाव पुढं करून आपण सुटू पाहतोय. 
पर्यावरणीय प्रश्‍न निघाले की, बऱ्याचदा गाडी लोकसंख्या वाढीकडं घसरते. जन्मदर संपूर्ण जगभरात कमी होत चाललेला आहे, अशावेळी लोकसंख्या वाढत्या आयुर्मानामुळं फुगून दिसते आहे. मुळात आपल्या समस्येला कुणी अन्य लोक जबाबदार आहेत, हा नजरिया बदलायला हवा आहे. मिनिमलिझम म्हणजेच गरजेपेक्षा एकही गोष्ट जास्तीची न वापरता कमीत कमी संसाधनात निर्वाह करणं! ही गोष्टही कुणीतरी दुसऱ्यांनी करावी असं म्हणणारेच जास्त. कुठल्याही समस्यापूर्तीसाठी आपल्या देशातली मुख्य अडचण ही व्यवस्थापन व नियोजनाबाबतीत आहे. एकट्या माणसाच्या प्रयत्नातून उत्तर शोधता येणं कठीण. उदा. खाजगी गाड्यांचा वापर इतका प्रचंड आहे, त्यामुळं प्रदूषण वाढत आहे. - याचं मूळ आहे गबाळी व नियोजनशून्य सार्वजनिक वाहतूक व्यवस्था. ती सुधारण्याबाबतीत प्रश्‍न न विचारता खाजगी गाड्यांकडं बोट दाखवणं ही सोपी वाट. असं सगळ्याच प्रश्‍नांविषयी घडतं आपल्याकडं. ज्या गोष्टीत जनतेनं बदल करायला हवा, त्या बदलासाठी पूरक परिस्थिती निर्माण करणं हे शासनव्यवस्थेचं कर्तव्य व जबाबदारी आहे. त्यासाठी आवाज उठवणं हेही पर्यावरणासाठी काम करणं आहे. प्रत्येक माणसाला पर्यावरणपूरक व आत्मसन्मानानं जगण्याच्या यंत्रणा असत्या व तरीही माणसं उधळमाधळ करत असती, तर मिनिमलिझम वगैरे मुद्दे बोलू. ते आज युरोप अमेरिकेत घडतंय!
रस्त्यावर उतरून आपापल्या सरकारांना पर्यावरणप्रश्‍नी जाब विचारणारी, कोर्टात खेचणारी मुलं हे चित्र तुम्हाला आशादायी वाटतं का?आपण आपलं कर्तव्य करत नाही आहोत, म्हणून मुलांना जाब विचारण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागत आहे. हे चित्र आशादायी कसं म्हणू?  पर्यावरणीय प्रश्‍नांची तड लागली नाही, तर आयुष्य जगणं कठीण आहे, या भीती व नैराश्यातून जगभरातली मुलं रस्त्यावर उतरताहेत. ‘फ्रायडेज फॉर फ्युचर’ या प्लॅटफॉर्मवर ही मुलं  एकत्र येऊन आवाहन करत आहेत.  रस्त्यावर येणं ही त्यांच्यादृष्टीनं अस्तित्वाची लढाई आहे. त्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना जागतिक आयाम देणं, एका मोठ्या समस्येशी नाळ जोडून घेत समस्येच्या उपचारामध्ये आपलं स्थान नेमकं कुठं आहे, याची जाणीव करून देणं याचं उत्तरदायित्व नागरिकांनी व यंत्रणांनी स्वीकारणं गरजेचं आहे. तसं केलं नाही, तर येत्या दहा-वीस वर्षांत मोठ्या झालेल्या या मुलांनी श्‍वास कसा घ्यायचा?  वाढत्या वयातल्या मुलांना पर्यावरणीय व अस्तित्वाच्या प्रश्‍नांबद्दल माहिती असण्यातून शासकीय यंत्रणांवरचा दबाव वाढू शकतो; पण मुलांच्या चळवळीबद्दल प्रशंसोद्गार काढताना मला कचरायला होतं. या मुला-मुलींना गोळा करून त्यांना ‘तुमचं भविष्य अंधकारमय आहे.’ हे सांगणं मला भीतिदायकच वाटतं. मुलाखत : सोनाली नवांगुळ

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याenvironmentपर्यावरण