शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

लाइफस्टाईल बदला!

By admin | Updated: December 21, 2014 00:17 IST

सागरपातळीची वाढ, बर्फ वितळणे, समुद्रातील पाण्याची वाफ अशा अनेक घटनांमुळे पृथ्वीवरील अनेक भागांत गारांचा मारा आणि अतिवृष्टी होत आहे.

सागरपातळीची वाढ, बर्फ वितळणे, समुद्रातील पाण्याची वाफ अशा अनेक घटनांमुळे पृथ्वीवरील अनेक भागांत गारांचा मारा आणि अतिवृष्टी होत आहे. जागतिक स्तरावर हा प्रश्न चिघळला असून, महाराष्ट्रात गतवर्षी व यावर्षी झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीट हा त्याचाच परिणाम आहे. मुळात मनुष्यप्राणी निसर्गाला हानी पोचवित असून, वाढत जाणाऱ्या कार्बन उत्सर्जनामुळे दिवसेंदिवस भरच पडत आहे. यावर साधा, सोपा व सरळ उपाय म्हणजेच निसर्गाला हानी पोचविता कामा नये.रत उष्ण कटिबंधातला देश आहे. त्याच्यामुळे शून्य डिग्री सेल्सिअसची जी पातळी असते, ती जमिनीपासून उंचीवर असते. तेव्हा गारा क्वचित पडतात. गारांमुळे पिकांची, जमिनीची पिटाई होते, मोठे नुकसानही होते. म्हणून त्याला गारपीट म्हणतात. हवामान खात्याची आकडेवारी पाहिली किंवा नीट निरीक्षण केले तर असे लक्षात येते, की वर्षात कुठे तरी गारा पडण्याच्या घटना घडतात. हे प्रमाण तसे कमी आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गारपिटीची घटना क्वचित अथवा केव्हा तरी घडत असल्याने तिचे पूर्वानुमान करणे कठीण होऊन बसते, असे म्हटले जाते. मात्र ते तसे नाही. कारण पुढील २४ अथवा ४८ तासांचा अंदाज जर हवामान खाते वर्तवित असेल, तर त्या हवामान खात्याला गारपिटीचा अंदाज देखील वर्तविता आला पाहिजे. आपण आपले हवामान खाते आणखी अद्ययावत, आधुनिक केले पाहिजे. याचा अर्थ ते अद्ययावत अथवा अत्याधुनिक नाही, असा होत नाही. पण त्याने सतर्क राहत लोकांना देखील सतर्क केले पाहिजे.एक गोष्ट आवर्जून सांगण्यासारखी म्हणजे जागतिक तापमानवाढ आणि स्थानिक बदल यात फरक आहे. स्थानिक तापमानवाढ होते ती शहरीकरणामुळे. परंतु गेल्या काही वर्षांत यात वाढ झाली. अनेक वेळा होते असे, की महाराष्ट्रातील गारपीट असो वा केदारनाथला झालेली अतिवृष्टी असो, अशा घटनांनंतर आपण घाईघाईने काही तरी निष्कर्ष काढतो. मात्र पर्यावरणात जो मानवी हस्तक्षेप झाला आहे, त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला जातो. महाराष्ट्रात गेल्यावर्षी आणि यावर्षी झालेल्या गारपिटीने शेतकरीवर्गासह पर्यावरणाची देखील हानी झाली. जसे शेतीचे नुकसान झाले आहे तसे ते पशुपक्ष्यांचे देखील झाले आहे.गारपीट झाल्यानंतर नुकसानभरपाईसाठी राज्य सरकारने तत्परता दाखविली पाहिजे. गारपीट झालेल्या ठिकाणचे दौरे काढून काही होत नसते. कारण अशा घटनांनी शेतकरी आर्थिक आणि मानसिकरीत्या खचलेला असतो. म्हणून भरीव मदतीची आश्वासने देऊन काही होत नाही, तर तत्काळ त्याला मदतीच्या हाताची गरज असते. आणि दुसरे असे, की अशा घटनांकडे आपण शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहात नाही. या घटनांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार झाला पाहिजे. यासाठी वैज्ञानिक आणि मोसम विभागाने एकत्र काम केले पाहिजे.सर्वात शेवटचे आणि महत्त्वाचे ते असे, की आपण आपली लाइफस्टाईल बदलली तर सगळे काही ठीक होईल. कारण आपण आपल्या सुखासाठी, स्वार्थासाठी, आरामदायी जीवनासाठी धरतीमातेचा गळा घोटतो आहोत. विकासाचा हव्यास आपणाला विनाशाकडे घेऊन जातो आहे. विकासाची व्याख्या करताना आपण पर्यावरणाला जाणीवपूर्वक बगल दिली आणि अशा विकासाच्या हव्यासामुळे, मानवी हस्तक्षेपामुळे पृथ्वीवरील सृष्टी नष्ट होते आहे. म्हणून धरतीला ताप आला आहे. ती आजारी पडली आहे. तिचा ताप कमी करायचा असेल तर येथील हरियाली वाढवावी लागेल आणि हा कॉमन सेन्स आहे. कुणाला सांगून ही हरियाली वाढणार नाही. यासाठी तुमचा, माझा आणि प्रत्येकाचा हात पुढे आला पाहिजे.

- डॉ. राजेंद्र सिंह

(लेखक जलपुरुष आणि मॅगसेसे पुरस्कार विजेते आहेत.)(शब्दांकन - सचिन लुंगसे)अत्याधुनिक हवामान खाते काळाची गरजहवामान खात्याला गारपिटीचा अंदाज देखील वर्तविता आला पाहिजे. आपण आपले हवामान खाते अद्ययावत, आधुनिक केले पाहिजे. याचा अर्थ ते अद्ययावत अथवा अत्याधुनिक नाही, असा होत नाही. पण त्याने सतर्क राहत लोकांना देखील सतर्क केले पाहिजे.