शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
2
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
3
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
4
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
5
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
6
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
7
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
8
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
9
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
10
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
11
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
12
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
13
५ राजयोगात मार्गशीर्ष अमावास्या २०२५: ९ राशींवर लक्ष्मी कुबेर कृपा, कल्पनेपलीकडे यश-पैसा-लाभ!
14
Creta ला टक्कर देण्यासाठी येतेय Mahindra ची नवी 'मिड-साईज' SUV; असे असेल डिझाईन अन् खासियत
15
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: वर्षातली शेवटची आणि प्रभावशाली रात्र; आठवणीने करा 'हे' ५ उपाय!
16
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
17
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
19
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
20
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
Daily Top 2Weekly Top 5

संत काव्याचे व्यापकत्व

By admin | Updated: January 19, 2017 00:00 IST

संख्यात्मक भूमिकेतून मराठी साहित्यातील आणि काव्य विश्वातील त्यांचे व्यापकत्व अबाधित आहे.

मराठी साहित्यसृष्टीत विचारतत्व आणि प्रबोधनतत्वाने जसे संत साहित्य हे व्यापक आहे तसेच संख्यात्मक भूमिकेतून मराठी साहित्यातील आणि काव्य विश्वातील त्यांचे व्यापकत्व अबाधित आहे. प्राचीन संतकाव्याचे ज्येष्ठ संशोधक जगन्नाथ रघुनाथ आजगावकर यांनी प्राचीन मराठी संतकवी या ग्रंथाच्या प्रस्तावनेत म्हटले आहे की, एकंदर जुनी मराठी कविता किती आहे, असा जर प्रश्न मला कोणी विचारला तर त्याला मी एवढेच उत्तर देईन की, जगातील दुसऱ्या कोणत्याही भाषेत एवढी कविता नाही. कमीतकमी १५ लाखाहून अधिक जुनी मराठी कविता आज उपलब्ध आहे आणि त्यातील १० लाखाहून अधिक काव्यसंख्या ही केवळ संतकाव्याची किंवा संत कवितेची आहे. त्यात अभंग, गौळण, भारुड, ओवी, पदे, रुपके यांचा समावेश आहे. नुसत्या ज्ञानदेवांची ओवी आणि अभंगरचना १० हजाराहून अधिक आहे. संत एकनाथांनी साठ हजार, रामदासांची दहा हजार, रामी रामदासांची दहा हजार, तुकाराम महाराज साडेचार हजार, नामदेवरायांची तीस हजार, याशिवाय निळोबाराय चोखोबा, जनाबाई, रमावल्लभदास, कृष्णदयार्णव, मुक्तेश्वर, सावतोबा, कान्होपात्रा, दासतुका, नरहरीमहाराज, शेख महंमद, गोरा कुंभार, जगमित्र नागा, माणकोजी बोधला, सेनान्हावी, कान्होपाठक, चांगदेव, बहिरा पिसा या संतांच्या काव्याचा समावेश करावा लागेल. या साऱ्या संतांचा कालखंड हा बाराव्या शतकापासून सतराव्या शतकापर्यंतचा आहे. त्या कालखंडातील राजकीय, सामाजिक पार्श्वभूमी लक्षात घेता व छपाईची, प्रसाराची, लोकसंपर्काची माध्यमे नसतानाही त्यांचे काव्य मराठी मुलुखातील सामान्य माणसापर्यंत पोचले होते. काव्याची मुख्य तीन लक्षणे सांगितली जातात. १) प्रसाद २) माधुर्य आणि ३) ओज. मराठी संतांची कविता तिच्यातील भावपूर्ण भक्तिरसामुळे प्रासादिकतेने ओथंबलेली आणि शब्दसौंदर्यामुळे माधुर्याने नटलेली तर प्रबोधनाच्या भूमिकेतून ‘ओज’ तत्वाने भारलेली होती. ज्ञानोबांनी एक सुंदर रुपक मांडले आहे.अंगाचेनि सुंदरपणे। लेणिया अंगचि होय लेणे।तेथ अलंकारिले कवन कवणे। हे निर्वचेना।।एखाद्या सौंदर्यवतीने अंगावर दागिने घालावेत व ती आणखी सुंदर दिसावी. अशा वेळी तिला वाटते की, मी मुळचीच सुंदर आहे. म्हणून माझ्यामुळेच दागिने नटले आहेत व दागिन्यांना वाटते, ही आमच्यामुळे सुंदर दिसते आहे. इथे कुणी कुणाला सुंदर केले वा अलंकारिले हे समजत नाही. तसेच संत काव्यामध्ये भावसौंदर्याने शब्द नटले की, शब्द सौष्टवाने भावतरंग उमटले. हे समजत नाही. पण संत काव्याच्या शब्दसौष्टवाने मराठी भाषा मात्र नटली हे निश्चित.-डॉ. रामचंद्र देखणे