शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
4
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
5
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
6
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
7
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
8
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
9
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
10
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
11
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
12
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
13
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
14
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
15
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
16
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
17
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
18
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
19
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
20
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटिश संसदेत भारतीयांचे प्रतिनिधित्व वाढणार!

By admin | Updated: June 11, 2017 20:26 IST

ब्रिटनच्या मध्यावधी निवडणुकीत हाऊस आॅफ कॉमन्समध्ये निवडून आलेल्या भारतीय वंशाच्या १२ खासदारांचे मी अभिनंदन करतो. १८९२ मध्ये दादाभाई नौरोजी यांच्या

 -राजेंद्र दर्डा (लेखक लोकमतचे एडिटर इन चिफ आहेत)ब्रिटिश हाऊस आॅफ कॉमन्सकरिता (लोकसभा) पंतप्रधान थेरेसा मे यांनी खेळलेला मध्यावधी निवडणुकीचा जुगार फसला आहे. ६५० सदस्यांच्या हाऊस आॅफ कॉमन्समध्ये सत्तारुढ हुजूर पक्षाला ३१८ तर मजूर पक्षाला २६१ जागा मिळाल्या आहेत. इतर छोट्या पक्षांच्या मदतीने थेरेसा मे पंतप्रधानपदी कायम राहतील, अशी अपेक्षा आहे. मध्यावधी निवडणुकीत हाऊस आॅफ कॉमन्समध्ये निवडून आलेल्या भारतीय वंशाच्या १२ खासदारांचे मी अभिनंदन करतो. १८९२ मध्ये दादाभाई नौरोजी यांच्या रुपाने पहिल्यांदाच हाऊस आॅफ कॉमन्समध्ये भारतीय नागरिकाला संधी मिळाली होती. त्यानंतर एकोणिसाव्या शतकात आणखी दोन पारशी बांधव हाऊस आॅफ कॉमन्समध्ये निवडून गेले. १५० वर्षे भारतावर राज्य करणा-या ब्रिटिश सत्तेत भारतीय वंशजांना प्रवेश मिळणे सोपे नव्हते. विसाव्या शतकात भारतात स्वातंत्र्याची चळवळ सुरू होती. ब्रिटिश साम्राज्य भारतावरील पकड सैल करण्यास मुळीच तयार नव्हता. ब्रिटनमध्ये भारतीयांची संख्याही कमी होती. त्यामुळे नंतर दीर्घकाळ खासदार म्हणून भारतीय निवडून आला नाही. अनेक वर्षानंतर १९८७ मध्ये भारतीय किथ वाझ हाऊस कॉमन्समध्ये निवडून आले. या निवडणुकीत बाजी मारून ते आठव्यांदा हाऊस आॅफ कॉमन्समध्ये गेले आहेत.मला आठवते, १९७२ साली विद्यार्थी म्हणून लंडनमध्ये मी दीर्घकाळ वास्तव्यास असताना ब्रिटिशांचा भारतीयांकडे पाहण्याचा दृष्टीकोन फार चांगला नव्हता. त्याच काळात एक आगळीवेगळी घटना घडली.  युगांडाचा हुकूमशहा ईदी अमीन याने अचानक एकाच रात्रीतून युगांडामधील सर्व भारतीयांना चलो जावो चा आदेश दिला आणि १९७२ च्या आॅगस्टमध्ये युगांडामधून ३० हजार भारतीय शरणार्थी ब्रिटनमध्ये आले. यात गुजराती नागरिकांची संख्या मोठी होती. एक मात्र नक्की, त्यावेळी या सर्व भारतीयांची व्यवस्था तातडीने केली गेली. आज बघता बघता ब्रिटनमधील भारतीयांची संख्या १४ लाखांवर पोहोचली आहे. त्यामुळेच या मध्यावधी निवडणुकीत कॉन्झरवेटिव्ह (हुजूर) पक्षाने १७ आणि लेबर (मजूर) पक्षाने १४ भारतीय वंशाच्या नागरिकांना उमेदवारी दिली होती. येथील भारतीयांमध्ये पंजाबी व गुजराती बांधवांची संख्या मोठी आहे. हे सर्व सुशिक्षित आणि मेहनती आहेत. यातील बहुतांश मध्यमवर्गीय व उच्चमध्यम वर्गीय आहेत. या सर्वांबद्दल तेथे आदर आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लगेचच लंडनला गेलेल्या यवतमाळ अमरावतीच्या आजीबाई बनारसे या अशिक्षित महिलेने लंडनमध्ये निर्माण केलेली स्वत:ची ओळख सर्वांनाच स्फूर्ती देणारी आहे. आजीबाई बनारसे यांच्या गोल्डन्स ग्रीनमधील २५ हूपलेन हे त्यांचे घर आमच्या सगळ्यांसाठी नेहमीच उघडे असायचे.या निवडणुकीत प्रीतकौर गिल आणि तनमनजितसिंग धेसी हे शिख भारतीय विजयी झाले आहेत. यापैकी प्रीत कौर या पहिल्या शीख महिला खासदार ठरल्या आहेत, तर धेसी यांच्या रुपाने हाऊस आॅफ कॉमन्समध्ये पहिल्यांदाच शीख पगडी दिसणार आहे. प्रीती पटेल सारख्या तरुण गुजराती महिला तेथे सत्तेत आहेत. या सर्वांमुळे भविष्यात जास्तीत जास्त भारतीय वंशज तेथील सत्तेत येतील, याची मला खात्री आहे. या सर्व भारतीयांना माझ्या हार्दिक शुभेच्छा !