शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

भाजपाचा नवा राजधर्म

By admin | Updated: February 28, 2017 00:02 IST

एकीकडे जाणते राजे पुरोगामित्वाकडून जातीय अस्मितेकडे फरफटत जात असताना गडकरी-फडणवीस मात्र जातीतून बाहेर पडत आहेत.

एकीकडे जाणते राजे पुरोगामित्वाकडून जातीय अस्मितेकडे फरफटत जात असताना गडकरी-फडणवीस मात्र जातीतून बाहेर पडत आहेत. हा भाजपाचा नवा राजधर्म आहे, या निवडणुकीतून त्याचे सूतोवाचही झाले आहे. परवाच्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने विदर्भात संपादन केलेल्या घवघवीत यशाला वेगवेगळे आयाम आहेत. हा पक्ष आता शहरीकरणाकडून ग्रामीण भागाकडे वेगाने वाटचाल करीत आहे, उधार-उसनवारीवर इतर पक्षांकडून घेतलेले नेते-कार्यकर्ते या पक्षात एकरूप होत आहेत. हा पक्ष निवडणुकीपुरता का होईना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्चस्वातून बाहेर पडत आहे, असे हे विविध कंगोरे. भाजपाच्या या यशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासक नेतृत्व जेवढे कारणीभूत आहे, तेवढेच श्रेय नितीन गडकरींच्या विकासात्मक सर्वसमावेशक राजकारणालाही द्यावे लागेल. भाजपा हा राजकीय पक्ष संघटना म्हणूनही विविध समाज स्तरांत अधिक व्यापक होत असल्याचेही या निवडणुकीच्या निमित्ताने दिसून आले आहे. नोटाबंदीच्या अरिष्टानंतरही भाजपाला विदर्भात लखलखीत यश मिळते याचा अर्थ असा आहे की विरोधकांच्या आक्रमकतेपेक्षा फडणवीस सरकारची अडीच वर्षातील कामगिरी उजवी ठरली आहे. भाजपाच्या या विजयाचे ‘श्रेय’ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही देणे आवश्यक आहे. ज्या पक्षाचे कार्यकर्ते आपल्याच प्रदेशाध्यक्षांवर शाई फेकतात त्या पक्षाच्या पराभवाबद्दल स्वकीयांच्या मनातही शंका राहत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विदर्भातील अस्तित्व मोसमी आणि हंगामी आहे. प्रफुल्ल पटेलांच्या नागपुरातील सभेला मोजून शंभर माणसेही उपस्थित नव्हती. त्याच दिवशी या पक्षाचा निकाल लागला होता. मुंबईत भाजपासोबत युती तुटल्यानंतर शिवसेना नागपुरात आक्रमक होईल, असे वाटले होते. पण सेनेचा ‘तानाजी’ नागपुरात कधी आला आणि परत गेला, हे शिवसैनिकांनाही कळले नाही. नागपुरात चंद्रशेखर बावनकुळे - अनिल सोले, चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार-हंसराज अहिर, अमरावतीत प्रवीण पोटे-डॉ. सुनील देशमुख, अकोल्यात डॉ. रणजित पाटील-संजय धोत्रे, वर्धेत रामदास तडस-पंकज भोयर या भाजपा नेत्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि पक्षाच्या यशात मोलाचा वाटा उचलला. काँग्रेस नेत्यांची अवस्था अगदी उलट होती. अमरावती जिल्हा परिषदेत काँग्रेसने लक्षणीय यश संपादन केले. हा एक अपवाद सोडला तर उर्वरित ठिकाणी काँग्रेसचे नेते एकमेकांचे पाय ओढण्यातच मश्गुल राहिले. यवतमाळमध्ये शिवाजीराव मोघे-वसंत पुरके हे काँग्रेस नेते आपला लाल दिवा आता राहिलेला नाही, हे कटु वास्तव अजूनही स्वीकारायला तयार नाहीत. माणिकराव ठाकरेंचा बहुतांश वेळ स्वत:ला निरखण्यातच जात असल्याने पक्षासाठी त्यांना वेळ तरी कसा मिळणार? मुकुल वासनिक हे बुलडाणा जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्वमान्य नेते. पण, दिल्लीत बसूनच त्यांचे राजकारण सुरू असते, त्यामुळे आधी रामटेक आणि आता बुलडाणाही त्यांच्या हातून निसटले आहे. हर्षवर्धन सपकाळ हे बुलडाण्याचे आमदार प्रामाणिक आहेत. परंतु सावलीतच राहायची सवय असल्याने क्षमता असूनही त्यांचे नेतृत्व बहरू शकले नाही. चंद्रपुरात नरेश पुगलिया हा लोकनेता आपला स्वभाव आणि कार्यशैलीत बदल करायला तयार नाही आणि विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वातील अनिवासीपण जायला तयार नाही. दोन सख्ख्या भावांचे कितीही मतभेद असले तरी ते कुटुंबातील सुख-दु:खात मतभेद विसरून एकत्र येतात. तसा एकोपा हंसराज अहिर आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यात आहे. त्यामुळे भाजपाची तेथील घोडदौड वेगाने सुरू असते. या निवडणुकीतील अधोरेखित करणारी आणखी एक गोष्ट अशी की, दलित आणि मुस्लीम मतदार पारंपरिक राजकीय पक्षांच्या मक्तेदारीतून हळूहळू बाहेर पडत आहे. कुठलातरी बागुलबुवा उभा करून त्यांना आता घाबरवता येणार नाही, हे त्यांनी अप्रत्यक्षरीत्या दाखवूनही दिले आहे. भलेही नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशात मतांच्या धृवीकरणासाठी कब्रस्तान-स्मशानाचा आधार घेत असले तरीही गडकरी-फडणवीस या घाणेरड्या राजकारणात पडत नाहीत, संघाचे सल्ले गरजेपुरतेच मनावर घेत आहेत, हेच या निकालातून दिसून आले आहे. एकीकडे जाणते राजे पुरोगामित्वाकडून जातीय अस्मितेकडे फरफटत जात असताना गडकरी-फडणवीस मात्र जातीतून बाहेर पडत आहेत. हा भाजपचा नवा राजधर्म आहे आणि या निवडणुकीतून त्याचे सूतोवाचही झाले आहे. - गजानन जानभोर