शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
4
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
5
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
6
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
7
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
8
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
9
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
10
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
11
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
12
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
13
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
14
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
15
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
16
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
18
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
19
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
20
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख

प्रागतिक व्हा!

By admin | Updated: December 23, 2014 01:08 IST

रोजचं वर्तमानपत्र वाचणं अतिशय त्रासदायक झालं आहे. त्याच त्या मन विषण्ण करणाऱ्या बातम्या वाचून नैराश्याचं मळभ येतं.

डॉ. बाळ फोंडके , पत्रकार व विज्ञानलेखक - रोजचं वर्तमानपत्र वाचणं अतिशय त्रासदायक झालं आहे. त्याच त्या मन विषण्ण करणा-या बातम्या वाचून नैराश्याचं मळभ येतं. भविष्याचं काळंकुट्टं चित्रच समोर उभं राहतं. आपण सगळेच अशी तक्रार सतत करत असतो. त्यात तथ्यही आहे. पण, गेल्या काही दिवसांमध्ये किमान दोन आशादायक बातम्या वाचण्यात आल्या आहेत. पहिली आहे एड्स या एके काळी कर्दनकाळ वाटलेल्या रोगाबद्दलची आणि दुसरी अलीकडेच भयावह रूप धारण करू पाहणाऱ्या हिवताप म्हणजेच मलेरिया या रोगाविषयीची. अतिशय काळजीपूर्वक केलेल्या सर्वेक्षणांमधून एड्सचा विळखा सैल पडत चालल्याची चिन्हं दिसू लागली आहेत. या रोगाला बळी पडणाऱ्यांच्या संख्येत तर घट होतेच आहे. पण, त्याहून महत्त्वाचं म्हणजे या रोगाची लागण होण्याचं प्रमाणही घसरत चाललं आहे. या रोगाचा प्रादुर्भाव जिथं जास्त प्रमाणात होता, त्या आफ्रिका खंडात हे अधिक स्पष्ट झालं आहे. तीच बाब मलेरियाची. आपण ज्याचा नि:पात केला आहे, असं वाटलं होतं, त्या मलेरियानं परत जोमानं वर डोकं काढलं आहे आणि तेही अधिक शक्तिशाली स्वरूपात. कारण, हा आताचा रोग मल्टिड्रगरेझिस्टंट जातीचा आहे. म्हणजे एकाहून अधिक ताकदवान औषधांनाही तो दाद देत नाही. त्यामुळं त्याच्यावर काबू कसा मिळवावा, ही एक समस्या सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांना भेडसावत आहे. या परिस्थितीत ते करत असलेल्या प्रयत्नांना मर्यादित प्रमाणातही यश मिळत आहे, ही बातमी त्यांचं मनोबल वाढवणारीच आहे, यात शंका नाही. वास्तविक पोलिओसारख्या बालवयातच ग्रस्त करणाऱ्या रोगाचं आपण आपल्या देशातून समूळ उच्चाटन केलं आहे. या अनुभवाच्या पाठबळावर आपण एड्स आणि मलेरिया यांच्यावरही विजय मिळवू शकू, अशी मनोधारणा होण्यास प्रत्यवाय नसावा. म्हणूनच पोलिओला हद्दपार करताना जे धोरण आपण अवलंबलं होतं, त्याचाच पाठपुरावा करणं शहाणपणाचं ठरेल.पोलिओच्या विरुद्ध जी लढाई आपण लढलो होतो, त्यात आपण दोन शस्त्रांचा मुख्यत्वे वापर केला होता आणि त्यांच्या कात्रीत सापडलेल्या त्या रोगाला काढता पाय घेण्यावाचून गत्यंतरच उरलं नव्हतं. यातलं पहिलं प्रभावी शस्त्र होतं लोकशिक्षणाचं. या रोगाचं भयानक स्वरूप समजावून देणं तर त्यात अभिप्रेत होतंच; पण त्याचबरोबर हा रोग असाध्य नाही, हेही लोकांच्या गळी उतरवणं आवश्यक होतं. याचा प्रसार कशामुळं होतो, कशा प्रकारे होतो, हे स्पष्ट केल्यानंतर त्याला अटकाव करण्यासाठी देवावर किंवा दैवावर सारा भार न टाकता प्रत्येक जण स्वत:ही आपापल्या परीनं बरंच काही करू शकतो, हेही सांगणं महत्त्वाचं होतं. व्यक्तिगत स्तरावर ही उपाययोजना केल्यावर सार्वजनिक स्तरावर लसीकरणाचं अभियान चालवल्यानंही रोगाला प्रतिबंध करण्याचा अधिक प्रभावशाली मार्ग आपल्या हाती आहे, हे लोकांना पटवून देण्याचीही गरज होती. ते अभियान सातत्यानं चालवल्याचा परिणाम दिसून आला आहे. या अभियानात सरकारी स्तरावर जे उपाय योजले गेले, त्याला प्रसारमाध्यमांनी आणि वलयांकित व्यक्तींनीही मोठाच हातभार लावला, हेही योग्य झालं. ती त्यांच्या सामाजिक बांधिलकीची बोलकी निशाणी होती. अशाच प्रकारचं धोरण एड्स आणि मलेरिया यांच्या बाबतीतही आपण अंगीकारलं, तर या दोन रोगांनाही हद्दपार करण्यात आपण यशस्वी होऊ शकू. त्यासाठी लोकशिक्षणाची फार मोठ्या प्रमाणावर गरज आहे. यात पारंपरिक प्रसारमाध्यमंही सिंहाचा वाटा उचलू शकतात. पण, अलीकडच्या काळात अधिक लोकप्रिय आणि अधिक परिणामकारक ठरलेल्या सोशल मीडियालाही हे शिवधनुष्य उचलण्यात कळीची भूमिका वठवता येईल.एड्स हा सर्वसामान्यपणे साथीचा रोग नाही. म्हणजे त्याची लागण केवळ रोगग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळं किंवा त्याच्याशी हस्तांदोलन करण्यानं, एवढंच काय पण मिठी मारण्यानंही होत नाही, हे स्पष्टपणे मनावर बिंबवायला हवं. केवळ असुरक्षित संभोग केल्यानं किंवा दूषित रक्त शरीरात गेल्यानंच त्याची लागण होऊ शकते, हे पुराव्यानिशी सिद्ध झालं आहे. तेच परत परत सांगून लोकांच्या मनातली भीती आणि रोगग्रस्तांविषयीची अनास्था आपण टाळू शकतो. शिवाय, या रोगग्रस्तांनाही दिलासा देणारी काही शक्तिशाली औषधं आता आपल्या भात्यात आहेत. या दोन्ही बाबींचा एकसाथ मारा करून आपण एड्सवर मात करू शकतो. लैंगिक संबंधांमध्ये माणसाच्या काही मूलभूत विकारांचा प्रभाव असतो. त्यांच्यावर ताबा मिळवणं तसं सोपं नाही. म्हणूनच जर संबंध ठेवलाच, तर कंडोमसारखी साधनं वापरून सुरक्षित संभोग करणंच हिताचं ठरू शकतं, याची शिकवणही दिली पाहिजे. ब्रह्मचर्य पाळा, हे सांगणं सोपं आहे. त्याचं आचरण करणं भल्याभल्यांनाही जमत नाही. तेव्हा या बाबतीत सैद्धांतिक किंवा नैतिक दृष्टिकोनावर भर न देता प्रागतिक विचारांचीच कास धरायला हवी.