शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

दहशतवाद्यांना मोकाट सोडण्याचे फळ

By admin | Updated: December 25, 2014 23:44 IST

पाकिस्तान रक्तबंबाळ झाला आहे. हे रक्त त्यांच्या स्वकीयांनीच वाहवले आहे. पाकिस्तान बिनचेहऱ्याचा देश होण्याच्या मार्गावर आहे.

कुमार प्रशांत,ज्येष्ठ पत्रकार -पाकिस्तान रक्तबंबाळ झाला आहे. हे रक्त त्यांच्या स्वकीयांनीच वाहवले आहे. पाकिस्तान बिनचेहऱ्याचा देश होण्याच्या मार्गावर आहे. या घटनेसाठी पाकिस्तानातील सुशिक्षित लोकच जबाबदार आहेत. हा समाज आजवर सत्याला सत्य म्हणायची हिंमत करू शकला नाही, हे कटू वास्तव आहे. ज्या तत्त्वातून पाकिस्तानची निर्मिती करण्यात आली, ती तत्त्वे पाकिस्तानला संपविण्यासाठी सज्ज झाली आहेत.लहान मुले ही कोणत्या एका देशाची नसतात. ती साऱ्या मानवतेचे भविष्य असतात. अशा मुलांना शाळेत शिरून जेव्हा बंदुकीच्या गोळ्यांनी ठार करण्यात येते तेव्हा मनात विचार येतो, की एकविसाव्या शतकातील मनुष्य हा जनावरांपेक्षाही खालच्या पातळीवर पोहोचला आहे की काय? पाकिस्तानात ही घटना घडली त्यापूर्वी एकच दिवस आॅस्ट्रेलियातील सिडनी शहरातील ३० लोकांना अतिरेक्यांनी आपल्या ताब्यात घेतले होते. त्यांची मुक्तता करण्यासाठी याच तऱ्हेने रक्त सांडले होते. त्या घटनेच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानातील पेशावर शहरात आर्मी पब्लिक स्कूलवर दहशतवाद्यांनी हल्ला चढवून १४१ लोकांची हत्या केली, ज्यात १३२ बालके होती. पाकिस्तानात या तऱ्हेचे हत्याकांड हे प्रथमच होत आहे, अशी स्थिती नाही. यापूर्वीही या तऱ्हेचे हत्याकांड तेथे घडलेले आहे. हे हत्याकांड शेवटचे ठरेल, अशी शक्यता नाही. कारण या तऱ्हेच्या दहशतवादाचे पोषण पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनीच केले आहे. या घटनेने सर्व जग हादरून गेले असताना हे कृत्य घडविणाऱ्या तालिबानने ज्या दहशतवाद्यांनी हे कृत्य केले त्यांचे छायाचित्र मोठ्या दिमाखाने जगासमोर सादर केले. एकूणच तालिबान्यांना या घटनेबद्दल खेद न वाटता अभिमानच वाटतो आहे, असे दिसते.पेशावर येथे जी घटना घडली त्याच तऱ्हेची घटना २००४मध्ये रशियात घडली होती. तेथे चेचेन इस्लामी अतिरेक्यांनी एका विद्यालयात शिरून ७०० विद्यार्थ्यांना ओलीस ठेवले होते, त्यांची सुटका करण्यासाठी केलेल्या कारवाईत ४०० मुले मारली गेली होती. ती घटना जग विसरलेले नाही; पण या दहशतवाद्यांच्या विरुद्ध तेथील सरकारे कठोर कारवाई करीत नाहीत, त्यामुळे त्यांचे साहस वाढत चालले आहे.या घटनेबद्दल शोक व्यक्त करणे किंवा दोन मिनिटे मौन पाळून मृतांना श्रद्धांजली अर्पण करणे पुरेसे आहे का? त्यामुळे जी मुले मारण्यात आली त्याची भरपाई होणार आहे का? नक्कीच नाही. पण, प्रत्यक्षात आपण शोक व्यक्त करीतच राहतो आणि दुसरीकडे या तऱ्हेच्या घटना घडतच राहतात. खरी गरज या तऱ्हेची मानसिकता नष्ट करण्याची आहे. ६७ वर्षांपूर्वी धार्मिक आधारावर पाकिस्तानची निर्मिती होत असताना याच तऱ्हेचा रक्तपात घडला होता. त्यानंतर तरी हे सूडाचे सत्र थांबेल असे वाटले होते; पण उलट विस्तारवाद फोफावतच राहिला. स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची मागणी करणाऱ्या महंमद अली जीना यांना महात्मा गांधींनी सांगितले होते, की तुमच्या कृत्यामुळे तुम्ही विषाची फळे पेरता आहात त्यातून विषाचीच निर्मिती होणार आहे. महात्माजींचे ते म्हणणे आज खरे ठरले आहे. पाकिस्तान निर्मितीतून जे विषारोपण झाले आहे, त्यातून विषाचीच उपज होत असल्याचे जगाने बघितले आहे. ज्या हत्यांविषयी आज पाकिस्तानचे नागरिक शोक व्यक्त करीत आहेत, ती त्यांच्या कुकर्मांची फळे आहेत. जीना यांना मुस्लिम राष्ट्र हवे होते, तर तालिबानींना इस्लामी अंमल हवा आहे. जीनांची मानसिकता आणि तालिबानींची मानसिकता यांत तसे पाहता कोणताच फरक नाही.तालिबानी दहशतवाद्यांनी सैनिकी शाळेतील निष्पाप बालकांच्या रक्ताची होळी साजरी केली आहे, त्यापासून पाकिस्तानने योग्य तो बोध घ्यायला हवा. कारण भारताविरुद्ध जो भस्मासुर पाकिस्तानने उभा केला, तोच दहशतवादाचा भस्मासुर आज पाकिस्तानला नष्ट करण्यासाठी सज्ज झाला आहे. पाकिस्तानातून भारतात दहशतवादी कृत्ये करणाऱ्या दहशतवाद्यांविरुद्ध तेथील सरकार कारवाई करीत नाही. उलट, त्यांना भारतात हिंसक कृत्ये करण्यासाठी प्रोत्साहन देत असते. या दहशतवाद्यांना पाकिस्तानशीही घेणेदेणे नाही, हे पेशावरच्या घटनेने दाखवून दिले आहे. या तालिबान्यांना अफगाणिस्तानापासून पाकिस्तान पर्यंत स्वतंत्र तालिबान राष्ट्र निर्माण करायचे आहे. दहशतवाद्यांचा म्होरका हाफीज महंमद सईद हा या कृत्याबद्दल भारताला जबाबदार धरतो, जाहीर सभेत भारताविरुद्ध गरळ ओकतो, तरीही सरकार त्याच्या मुसक्या आवळत नाही. दहशतवाद्यांना मोकाट सोडण्याच्या कृतीची फळे पाकिस्तानला भोगावी लागत आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आपणही आपले वर्तन तपासायला हवे. सध्याचे सत्ताधारी हे कोण खरे भारतीय आणि कोण नकली भारतीय, असा विवाद निर्माण करून लोकांत फूट पाडीत आहेत. घर वापसी कार्यक्रमाच्या नावाखाली लोकांना हिंदू धर्मात आणण्याचा खेळ काही संघटना करीत आहे; हे प्रयत्न हाणून पाडणे आवश्यक आहे.