शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

कृषी विद्यापीठांना स्वायत्तता कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2017 01:04 IST

कर्जमुक्तीच्या विषयावर विधानसभेत हंगामा सुरू आहे. पण, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठीच्या कायमस्वरूपी उपाययोजना काय? याबाबत सत्ताधारी व विरोधक या दोन्ही आघाड्यांवर ठणठणगोपाळ आहे

कर्जमुक्तीच्या विषयावर विधानसभेत हंगामा सुरू आहे. पण, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठीच्या कायमस्वरूपी उपाययोजना काय? याबाबत सत्ताधारी व विरोधक या दोन्ही आघाड्यांवर ठणठणगोपाळ आहे. शेतकऱ्यांसाठी कृषी शिक्षण व संशोधनाचे काम करणाऱ्या राज्यातील चार कृषी विद्यापीठांची अवस्था सध्या काय आहे? इथपासून शेतीक्षेत्राचा विचार करण्याची आवश्यकता आहे. गत शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी राज्यातील कृषी विद्यापीठांना भारतीय कृषी अनुसंशोधन परिषदेने (आयसीएआर) अधिस्वीकृतीच नाकारली होती. स्वत:ला प्रगत मानणाऱ्या राज्यासाठी ही तशी मोठी नामुष्की आहे. पण, सरकारी पातळीवर याबाबत ना खंत ना खेद. राज्यात सध्या राहुरी, अकोला, परभणी व दापोली अशी चार कृषी विद्यापीठे आहेत. या विद्यापीठांना वेगवेगळ्या जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र विभागून देण्यात आले आहे. अकोला विद्यापीठांतर्गत एकूण ११, तर राहुरी विद्यापीठांतर्गत १० जिल्हे आहेत. परभणी आठ, तर दापोली विद्यापीठांतर्गत सहा जिल्हे येतात. कार्यक्षेत्र मोठे असताना विद्यापीठांकडे मनुष्यबळ मात्र नाही. याच कारणावरून ‘आयसीएआर’ने आक्षेप नोंदविला होता. त्यानंतर काही विद्यापीठांत भरतीची प्रक्रिया सुरू आहे. मात्र त्यातही अनेक अडथळे आहेत. सरकारी कृषी महाविद्यालयांत प्रवेशक्षमता कमी आहे म्हणून खासगी कृषी महाविद्यालयांना परवानगी दिली गेली. राज्यात आजमितीला अशी २०५ महाविद्यालये आहेत. महाविद्यालये वाढली पण विद्यापीठांचे मनुष्यबळ वाढले नाही. त्यामुळे या सर्व महाविद्यालयांची परीक्षा व इतर कामकाजाचा भार विद्यापीठांवर पडतो. खासगी महाविद्यालयांचे पर्यवेक्षणच विद्यापीठांना करता येत नाही, अशी परिस्थिती आहे. जी नवीन सरकारी महाविद्यालये मंजूर केली गेली. त्यांनाही मनुष्यबळ नसल्याने ही महाविद्यालये चालविण्याची जबाबदारीही विद्यापीठांवर आली आहे. उदाहरणार्थ गतवर्षीच्या राज्याच्या अर्थसंकल्पात नगर जिल्ह्यात जामखेड तालुक्यात हळगाव येथे महाविद्यालय मंजूर झाले. मात्र हळगावला काहीच सुविधा नसल्याने हे महाविद्यालय सध्या राहुरी विद्यापीठातच चालते. कृषी विद्यापीठांना अधिकार काय, हाही प्रश्न अनेक वर्षांपासून तसाच ऐरणीवर पडून आहे. विद्यापीठांमध्ये प्रभावी समन्वय व सुसूत्रता ठेवण्यासाठी महाराष्ट्र कृषी विद्यापीठ कायदा १९८३ नुसार राज्यात कृषी, शिक्षण व संशोधन परिषदेची (एमसीएईआर) स्थापना करण्यात आली. परंतु, ही परिषद विद्यापीठांची मालक होऊन बसली आहे. विद्यापीठाच्या कुलगुरुंना जेमतेम तीन लाख रुपयांपर्यंतच्या खर्चाचे अधिकार आहेत. त्याहून अधिक खर्चाचे सर्व प्रस्ताव विद्यापीठांना या परिषदेकडे पाठवावे लागतात. कुलगुरुंचे आर्थिक अधिकार वाढविण्याबाबतचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला आहे. मात्र, तो मंजुरीसाठी पडून आहे. विद्यापीठांतील प्राध्यापक नेमण्याचे अधिकारदेखील परिषदेकडे आहेत. प्राध्यापक हे पूर्णत: शैक्षणिक व संशोधनाशी संबंधित पद आहे. बिगर कृषी विद्यापीठांत या नियुक्तीचे अधिकार कुलगुरुंना आहेत. मात्र, कृषी विद्यापीठे त्याला अपवाद आहेत. कृषी विद्यापीठांना कुलसचिव नेमायचेदेखील अधिकार नाहीत. शासनातीलच अधिकारी प्रतिनियुक्तीवर कुलसचिव म्हणून येतात. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांकडून विविध कामांच्या मंजुरीचे शेकडो प्रस्ताव पुण्याच्या परिषदेकडे येतात. कृषिमंत्री या परिषदेचे अध्यक्ष आहेत. कृषिमंत्र्यांना एवढे सगळे प्रस्ताव अभ्यासायला वेळ असतो का? हाही तांत्रिक मुद्दा आहे. प्रस्ताव वेळेत मंजूर न झाल्यास विद्यापीठांना येणारे अनुदान अखर्चित राहते. माध्यमिक शाळांत ‘कृषी शिक्षण’ हा विषय सुरू करण्याचा प्रस्ताव या परिषदेने शासनाला दिला. डॉ. बुधाजीराव मुळीक यांसारखे तज्ज्ञ त्यासाठी पाठपुरावा करताहेत. पण हा प्रस्ताव पडून आहे.- सुधीर लंके