शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

पुरोगामी राज्यात अघोरीराज !

By admin | Updated: January 3, 2015 22:31 IST

सुखप्राप्तीसाठी मुलाने आपल्या आई आणि मावशीचा बळी देण्याच्या नाशिक जिल्ह्यातील घोटी परिसरातील धक्कादायक घटनेने साऱ्यांनाच सुन्न केले.

सुखप्राप्तीसाठी मुलाने आपल्या आई आणि मावशीचा बळी देण्याच्या नाशिक जिल्ह्यातील घोटी परिसरातील धक्कादायक घटनेने साऱ्यांनाच सुन्न केले. अंधश्रद्धेपासून दूर राहा, ही महाराष्ट्राच्या मातीतील संतांची शिकवण. मात्र भौतिक सुखापोटी अंधश्रद्धेतून बळी देण्याचा हा अघोरी प्रकार याच पुरोगामी परंपरा सांगणाऱ्या महाराष्ट्रात घडावा, हे अघोरीराजच म्हणावे लागेल. या निमित्ताने अंधश्रद्धा निर्मूलनाचा हा वेध...

 

महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमाला तब्बल ३०० वर्षांची परंपरा आहे. अनेक संतांनी, त्यानंतर महात्मा फुले, संत गाडगेबाबा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी व गेल्या २५ वर्षांत तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने संघटितपणे यासाठी प्रयत्न केले आहेत. तरीही अंधश्रद्धा कमी न होता वाढतच चालली आहे. गेल्या वर्षभरात म्हणजे जादूटोणा विरोधी कायदा झाल्यापासून महाराष्ट्रात सुमारे १२ प्रकार केवळ नरबळीचे झाले आहेत. याचा अर्थ हे प्रमाण दर महिन्याला एक असे आहे व ही अत्यंत गंभीर बाब आहे.असे होण्याची कारणे आपल्याकडच्या सामाजिक परिस्थितीत आहेत, असे गेल्या अनेक वर्षांच्या अनुभवावरून लक्षात आले आहे. आपल्याभोवताली सुखोपभोगाची अनेक साधने निर्माण झाली आहेत. त्याचा लाभ घेतानाही अनेक जण दिसतात. मात्र ही संख्या मर्यादित आहे. असा लाभ घेणाऱ्या लोकांना पाहणारे अनेक आहेत़ त्यांनाही वाटते आपण असे करावे, मात्र ती साधने त्यांना सहज उपलब्ध होत नाहीत. त्यातून त्यांच्यातील असमाधान वाढीला लागते. एक प्रकारची अगतिकता त्यांच्यात निर्माण होते. त्यांच्याकडे आहे, आपल्याकडे का नाही, कसे मिळवता येईल, अशी ही भावना आहे. अशी वर्गीय दरी आपल्याकडे फार झपाट्याने वाढत आहे. प्रत्येकाला कोणतीही गोष्ट लगेच, तत्काळ हवी आहे़ ती मिळेपर्यंत वाट पाहण्याची, थांबण्याची त्यांची तयारी नसते. ती लवकर मिळावी, यासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी असते. त्यातूनच मग नको तो मार्ग निवडला जातो.सुशिक्षित तरुण पिढीही यात मागे नाही. प्रयोगशाळेत प्रयोग करणारी मुले त्या वेळी कार्यकारणभाव विचारात घेऊनच प्रयोग करीत असतात. आपल्या जगण्यात हा विचार आणणे मात्र त्यांना जमत नाही. नरबळीसारखा प्रकार घडल्यावरच आपल्याला अंधश्रद्धेमधील दाहकता लक्षात येते. प्रत्यक्षात रोजच्या जगण्यातही आपण अनेकदा अविवेकाने वागत असतो. नवस केल्यावर, हात जोडल्यावर काही होईल ही भावना याचेच प्रतीक आहे. कोणत्याही परिस्थितीत कार्यकारणभाव म्हणजे विवेकाची कसोटी लावणे अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र अगतिक स्थितीत हा विवेकच हरवला जातो व त्यातून असे लहानसहान व नंतर मग गंभीर प्रकार घडतात.मांत्रिक व तत्सम प्रकारच्या व्यक्ती खतपाणी घालतात. त्यातून विवेकासमोर अंधार पसरतो व अविवेक जागृत होतो. त्याला आळा घालायचा असेल तर त्यासाठी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीबरोबरच सामाजिक प्रबोधनदेखील होण्याची गरज आहे, जे आपल्याकडे होताना दिसत नाही. जादूटोणाविरोधी कायदा होण्यापूर्वी नरबळी देण्यासाठी तयारी करणे, हा गुन्हा समजला जात नव्हता. आता मात्र या कायद्यामुळे तो गुन्हा समजला जातो व सिद्ध झाल्यावर त्यासाठी शिक्षादेखील आहे. असे बदल करून तो कायदा अधिक टोकदार करण्याची गरज आहे. कायद्याची अंमलबजावणी होत नाही, ही सुद्धा खंत वाटावी अशीच गोष्ट आहे. अचानक झालेले मृत्यू शोधून त्यामागील कारणांचा पोलिसांनी शोध घेतला, तर त्यातून अनेक गंभीर प्रकार सापडू शकतील. असा शोध सुरू आहे, अशी माहिती प्रसिद्ध झाली तरीही नरबळीसारखे अनेक प्रकार टळू शकतील. याशिवाय शाळा, महाविद्यालये, ग्रामसभा यातून प्रबोधन होण्याची गरज आहे. समितीच्या माध्यमातून असे उपक्रम होतच असतात. मात्र थेट समाजातून यासाठी गावोगाव युवक उभे राहिले पाहिजेत. सुरुवातीला विरोध होईल, मात्र एकदा भूमिका लक्षात आली तर त्याचे निदान महाराष्ट्रात तरी स्वागतच होईल, अशी मला खात्री आहे. ही सुरुवात मात्र लवकर झाली पाहिजे; कारण शेजारच्या मुलीला, नात्यातील एका महिलेला असे करता करता आता प्रकरण थेट मुलाने आईला बळी देण्यापर्यंत येऊन ठेपले आहे. समाजाचा विवेक जागा व्हावा, यासाठी आता समाजानेच प्रयत्न करण्याची गरज आज निर्माण झाली आहे. (शब्दांकन : राजू इनामदार)

- मुक्ता दाभोलकरअंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ज्येष्ठ पदाधिकारी.