शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Exam Result 2025 : कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
2
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
3
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
4
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
5
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
6
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
7
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
8
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
9
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
10
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
11
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
12
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
13
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
14
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
15
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
16
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
17
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
18
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
19
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
20
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...

सन २०१५, मोदींच्या कसोटीचे वर्ष!

By admin | Updated: January 8, 2015 23:30 IST

ज्योतिष हे शास्त्र नाही, असे माझे ठाम मत असले तरी, ज्योतिषावर विश्वास ठेवणाऱ्यांच्या दृष्टीने विचार केला तर सन २०१४ हे सरते वर्ष लक्षणीय मानले गेले.

ज्योतिष हे शास्त्र नाही, असे माझे ठाम मत असले तरी, ज्योतिषावर विश्वास ठेवणाऱ्यांच्या दृष्टीने विचार केला तर सन २०१४ हे सरते वर्ष लक्षणीय मानले गेले. या वर्षात शनी ग्रहाने वृश्चिक राशीतून धनु राशीत प्रवेश केला. पुढील अडीच वर्षे शनीचा मुक्काम तेथेच राहील. ज्योतिषावर विश्वास ठेवणारे असे मानतात की शनीच्या धनु राशीतील वास्तव्य काळात धनु, वृश्चिक व मकर या जन्मराशी असणाऱ्यांना ‘साडेसाती’ सुरू होणार आहे. ज्योतिष असेही मानते की, ज्याच्या त्याच्या कुंडलीतील ग्रहस्थानांनुसार, शनीची साडेसाती काहींसाठी कष्टदायक तर काहींसाठी लाभदायीही ठरू शकते.आता ज्योतिषाच्या या जगातून बाहेर पडू या, पण त्यातील ‘साडेसाती’चे रूपक कायम ठेवून, आता सुरू झालेले सन २०१५ हे वर्ष भारताच्या दृष्टीने सुलक्षणी ठरेल की अवलक्षणी याचा विचार करू या. केंद्रात सत्तेत आलेली केवळ भारतीय जनता पार्टीच नव्हे तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीही पूर्णपणे एकाच व्यक्तीभोवती केंद्रित झाल्याने या नव्या वर्षात देशाचे जे काही भले-बुरे व्हायचे असेल ते बव्हंशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाच्या क्षमतेवरच अवलंबून असणार आहे. असे म्हणण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे लाट ओसरत असली तरी मोदी एकापाठोपाठ एक निवडणुका जिंकत चालले आहेत. ‘धर्मनिरपेक्ष’ शक्ती त्यांचा मुकाबला करण्यासाठी जिवाचे रान करीत आहेत, पण खरे तर त्या अधिकाधिक नामोहरम होत चालल्या आहेत. लोकसभेत विरोधक केवळ निष्प्रभ अशा अल्पमतात आहेत, एवढेच नव्हे तर त्यांच्यातील सैद्धान्तिक विरोधाभासही बायबलमधील नोहाच्या नौकेतील प्रवाशांप्रमाणे कमालीचा टोकाचा आहे. अशा परिस्थितीत जेथे मोदी ब्रिगेड अल्पमतात आहे, त्या राज्यसभेत आपण त्यांना जोरदार प्रतिठोसा हाणू असा विरोधकांनी विचार केला. पण राज्यसभेत विरोधकांनी अडकवून ठेवलेल्या विधेयकांचे कायदे राष्ट्रपतींकरवी वटहुकूम काढून तत्काळ लागू करण्याचा धडाका मोदींनी लावला आणि या लढाईतही मोदी ‘गलिव्हर’ आणि विरोधक खुजे ‘लिलिपुतियन’ ठरले. ब्रिटिशांच्या काळापासून लागू असलेल्या जुनाट भूसंपादन कायद्यावरून २००६ मध्ये सिंगूरमध्ये रणकंदन माजवून ममता बॅनर्जींनी बंगालच्या सत्तेपर्यंतची मजल मारली होती. ममतांच्या चमकदार कल्पनांचा आधार घेऊन काँग्रेसने ‘संपुआ’ सरकारच्या अगदी शेवटच्या टप्प्यात हा कायदा मोठ्या प्रमाणावर बदलून टाकला होता. पण मोदींच्या वटहुकुमी दणक्याने तो भूसंपादन कायदा पुन्हा बव्हंशी मूळ स्वरूपात आला आहे. विमा उद्योगातील थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा वाढविणे आणि सरकारची मक्तेदारी संपुष्टात आणून कोळसा खाण उद्योग देशी व विदेशी खासगी उद्योजकांसाठी लिलावाच्या मार्गाने खुला करणे यासह एकूण नऊ वटहुकूम मोदींनी विरोधकांच्या नाकावर टिच्चून काढले आहेत. राज्यसभेच्या आगामी अधिवेशनातही विरोधकांनी या वटहुकमांची विधेयके रोखून धरली तर संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन भरवून ती पुढे दामटण्याचा पर्यायही मोदींना खुला आहे. यासोबतच संपूर्ण भारताला एका सामायिक बाजारपेठेचे स्वरूप देण्याची क्षमता असलेल्या ‘वस्तू आणि सेवा कर’ (जीएसटी) विधेयकासही मंत्रिमंडळाची संमती मिळवून मोदींनी आणखी एक मोठे पाऊल टाकले आहे. आणि या सर्वाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील तेलाच्या किमतीच्या न भूतो अशा घसरणीची जोड मिळाल्याने जणू ती गुलाबी कागदात आकर्षकपणे गुंडाळलेली नववर्षाची भेटच ठरली आहे.हे फलदायी ‘साडेसाती’चे लक्षण आहे. वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या म्हणण्यानुसार ही वाटचाल अशीच सुरू राहिली तर या वर्षात भारताचा विकासदर चीनशी बरोबरी करेल. कोणी सांगावे, नशिबाने साथ दिली तर १९९१ नंतरच्या आर्थिक सुधारणांचे जनक असे बिरूद जसे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मिरविले तसे अर्थव्यवस्थेतील या स्थित्यंतराचे श्रेयही मोदी घेऊन जातील. रोजगार निर्मितीच्या बाबतीत बोलायचे तर मोदींनी ‘मेक इन इंडिया’चा फक्त नारा दिला आहे, पण त्या जोमाने कृती दिसत नाही. खरे तर कारखानदारी, उद्योग, सेवाक्षेत्र आणि अगदी शेतीमध्येही मानवी श्रमाचा वाटा घटत चालला आहे. वर्ष २००५ ते २०१२ या काळात भारतात फक्त दीड कोटी नवे रोजगार निर्माण झाले. कदाचित आधीच्या ‘संपुआ’ सरकारची धोरणे त्यास कारणीभूत असतील. पण आता रोजगारनिर्मितीचा वेग त्याहूनही अधिक खुंटला आहे. त्यामुळे सध्याच्या ‘साडेसाती’ने सामान्य भारतीय नागरिकाचे जीवन फारसे सुधारेल, असे दिसत नाही. अजूनही अनेक भारतीयांच्या दृष्टीने मोदी खलनिर्दालक व शोषितोद्धारक आहेत. पण आपण वर पाहिले की, साडेसातीने लाभ होणारच असेल तर तो त्यांच्यामुळे नव्हे तर त्यांच्याशिवायही होणार आहे.मोदींचे ‘मेक इन इंडिया’ व ‘स्वच्छ भारत’ हे वाढलेल्या अपेक्षांचे मोठे ओझे आहे. मोदी त्यांच्या नावाच्या इंग्रजी अद्याक्षरांवरून ‘नमो’ म्हणून ओळखले जातात. पण काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ‘नमो’ची ‘नो अ‍ॅक्शन, मेसेज ओन्ली’ अशी नवी फोड केली आहे. २०१५ मध्ये मोदींकडून मनासारखे काम झाले नाही तर रमेश यांच्या या कोटीला लोकही दाद देऊ लागतील.संघ परिवाराला आपल्या बाजूने ठेवणे हे मोदींपुढे वर्ष २०१५मधील आणखी एक आव्हान असेल. संघाच्या ‘घर वापसी’ मोहिमेवर गप्प बसल्याने मोदींची प्रतिमा काही प्रमाणात धूसर झाली. अर्थात मोदींच्या गप्प बसण्याने ‘घर वापसी’मधून राजेश्वर सिंग यांची उचलबांगडी झाली ही गोष्ट अलाहिदा. विश्व हिंदू परिषदेचे ‘आंतरराष्ट्रीय’ अध्यक्ष म्हणून अडगळीत टाकलेले प्रवीण तोगडिया बऱ्याच वर्षांनी पुन्हा विहिंपचे कार्याध्यक्ष म्हणून परतले आहेत. संघ परिवारातील संघटना आणि खुद्द सरकारमधील मोदीविरोधी गट यापुढेही शरसंधान करीतच राहतील. त्यामुळे वर्र्ष २०१५ हे मोदींचे खरे कसोटीचे वर्षे असणार आहे.हरिष गुप्ता‘लोकमत’ समूहाचे नॅशनल एडिटर