शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

कुसुंब्यात पेटवून घेत तरुणाची आत्महत्या

By admin | Updated: February 23, 2017 00:28 IST

धुळे : तालुक्यातील कुसुंबा शिवारात एका तरुणाने अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली़

धुळे : तालुक्यातील कुसुंबा शिवारात एका तरुणाने अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली़ तेथून जाणाºया एका युवकाला तो तरुण जळालेल्या अवस्थेत ओरडताना दिसून आला़ याबाबत तालुका पोलिसात नोंद करण्यात आली आहे़ संदीप भगवान जाधव (वय २२ रा़ कुसुंबा ता़ धुळे) असे मृत तरुणाचे नाव आहे़ त्याने २१ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकरा ते बारा वाजेच्या सुमारास गावातील पांझरा नदी किनारी असलेल्या हनुमान मंदिराजवळ स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेतले़, यात त्याचा मृत्यू झाला़ त्या वेळी योगेश कारभारी मोरे (वय १८ रा़ इंदिरानगर, कुसुंबा) हा पायी नदी किनारी जात असताना त्याला बाभळाच्या झाडाखाली संदीप हा जळालेल्या अवस्थेत ओरडताना दिसून आला़ त्याच्या बाजूला तीन प्लॅस्टिक बाटल्या पडलेल्या होत्या़ त्यात एक बाटली पेट्रोलने भरलेली होती़ दुसरी अर्धी व तिसरी रिकामी होती़ याबाबत योगेश मोरे याने धुळे तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ तपास पो़हेक़ॉ ए़ जी़ जाधव करत आहेत़ दरम्यान, तरुणाने आत्महत्या केल्याचे कारण समजू शकलेले नाही़ शेतात महिलेची गळफासाने आत्महत्याशिरपूर तालुक्यातील कामखेडा येथे राहणाºया रिताबाई विलास पावरा (वय ३४) या महिलेने स्वत:च्या शेतात झाडाला दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली़ २१ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली़ त्यांना पती व वडिलांनी शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले़ तेथे डॉ़ हिरेन पवार यांनी तपासणी करून महिलेला मृत घोषित केले़ याबाबत वॉर्ड बॉय प्रवीण पाटील यांच्या माहितीवरून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ तपास पो़हेक़ॉ पानपाटील करत आहेत़विहिरीत पडून वृद्धाचा मृत्यूशेतातील विहिरीत पडून वृद्धाचा मृत्यू झाला आहे़ आणु काण्या सोनवणे (वय ६० रा़ छडवेल ता़ साक्री ) असे मृत वृद्धाचे नाव आहे़ त्यांचा २१ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास गावातील चंद्रकांत देवमन बेडसे यांच्या शेतातील विहिरीत पडून  बुडून मृत्यू झाला़ याबाबत चंद्रकांत बेडसे यांनी निजामपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ तपास पो़हेक़ॉ आऱ एऩ कोकणी करत आहेत़