धुळे - योगाद्वारे केवळ शरीरच निरोगी राहत नसून मनही आनंदीत व प्रफुल्लित राहते. आजच्या धकाधकीच्या जीवनात योग ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन योगशिक्षक मनीषा चौधरी यांनी केले. विद्यावर्धिनी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व योगविद्या धाम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित योग प्रशिक्षण शिबिरात त्या बोलत होत्या. या शिबिरात योगशिक्षक चौधरी व नरेंद्र गांगुर्डे यांनी प्रात्यक्षिकांसह योगासनांच्या फायद्याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. देवेंद्र विसपुते, डॉ. विजय भुजांडे, डॉ. के. जी. बोरसे उपस्थित होते. शिबिराचे संयोजन रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रशांत लंगडे यांनी केले. यशस्वीतेसाठी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. संतोष खत्री व महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. मंजू तरडेजा यांनी परिश्रम घेतले.
योगासनांमुळे मन प्रफुल्लित राहते - योगशिक्षक मनीषा चौधरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:42 IST