पढावद येथील कृषिभूषण ॲड. प्रकाश पाटील यांच्या खान्देश कृषी विचार मंचच्या गट शेती सबलीकरण योजनेंतर्गत झालेल्या कामांची पाहणी व शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या माध्यमातून निर्यातक्षम केळी, पपई लागवड, सामूदायिक शेततळे, उपसा सिंचन योजना, स्वयंचलित ठिबक संच पद्धतीच्या युनिटची पाहणी आयुक्त धीरजकुमार यांनी केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागीय कृषी सहसंचालक संजीव पडवळ उपस्थित होते.
विकेल ते पिकेल, संकल्पनेवर आधारित तापी पट्ट्यातील रब्बी ज्वारीचा ५०० एकरचा प्रकल्प व त्याचे विक्री व्यवस्थापन याबाबत अनंत ठाकरे यांनी माहिती दिली. बेटावद येथील दिनेश माळी यांनी सेलम जातीची हळद लागवड करून उत्पादन व विक्रीची माहिती दिली, तर वारूड येथील शेतकरी गटाने निर्यातक्षम भेंडी उत्पादन व विक्रीची माहिती देत लंडन येथे निर्यात झाल्याची माहिती दत्तात्रय दोरीक यांनी दिली.
यावेळी ॲड. प्रकाश पाटील यांनी महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून मूलभूत बियाण्यांसाठी २५ हजार रुपये फी व दोन टक्के रॉयल्टी आकारतात. त्यामुळे शेतकऱ्यांना बियाणे महाग देऊन त्याचा उत्पादन खर्च वाढतो. त्यामुळे फी व रॉयल्टी रद्द करण्याबाबत निवेदन दिले. तसेच शासकीय कोणत्याही कृषी विषयक समित्या असतील तेथे शेतकरी प्रतिनिधी म्हणून राज्यातील कृषी पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांना प्रतिनिधीत्व द्यावे, अशी मागणी राज्याचे शासकीय कृषी पुरस्कारप्राप्त शेतकरी संघाचे अध्यक्ष या नात्याने दिले. यावेळी कृषिभूषण शेतकरी दिलीप पाटील, शरद पवार, डॉ. प्रशांत पाटील, मंगेश पवार, वीरेंद्र पवार, तुकाराम पवार, देवीदास पवार, मुख्याध्यापक राजेंद्र पवार, ज्ञानेश्वर पवार, योगराज पवार, अरूण बापू उपस्थित होते. तसेच कृषी विकास अधिकारी शांताराम मालपुरे, तालुका कृषी अधिकारी विनय बोरसे मंडल कृषी अधिकारी नवनाथ साबळे, कृषी पर्यवेक्षक पी. बी. पाटील, ए. बी. पायील, शिवाजी मुळे हजर होते.