कोरोनाच्या काळात रिक्षा तर बंदच होत्या. कारण प्रवासीदेखील तुरळक होते. आता जनजीवन पूर्वपदावर येत असताना रिक्षादेखील रस्त्यावर धावू लागल्या आहेत. धुळे शहरात तर कोणत्या मार्गाला किती पैसे आकारायला हवे याचे पैसे ठरले असले तरी तर आता पेट्रोल, डिझेलचे देखील भाव वाढले आहेत. परिणामी, रिक्षा भाडेदेखील वाढले आहेत. असे असले तरी भाडेआकारणी ही प्रमाणापेक्षा अधिकच आहे. रात्रीच्या वेळी प्रवासी वर्गाला तर काही रिक्षाचालक काहीही भाडे मागत असल्याने नाइजास्तव लोकांना ते द्यावे लागत आहे.
या घटनांना जबाबदार कोण?
विद्यार्थिंनीची छेड - रिक्षा चालवीत असताना काही रिक्षा चालकांकडून महिलांसह तरुणीच्या छेडछाडीचे प्रकार काही वेळेस घडताना नकळतपणे समोर येतात. रिक्षा भरधाव असताना काही तरी शब्द बोलून लक्ष वेधून घेण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न होत असतो.
वाहन चालकांना मारहाण
रिक्षा चालवत असताना अन्य वाहनांकडून रिक्षाला धक्का लागला अथवा कोणते दुसरे वाहन रिक्षाच्या मध्ये आल्यास त्यांच्यावर शिव्यांचा वर्षाव लगेच केला जातो. यातही काही रिक्षा चालक हे आघाडीवर आहेत. तर दुसरीकडे किती अडचणी आल्या तरी समजून घेणारे रिक्षा चालकदेखील आहेत.
विनापरवाना रिक्षाचालक एक डोकेदुखी
- शहरात सध्याच्या परिस्थितीत परवानाधारक रिक्षा चालक सुमारे २ हजार २०० आहेत. तर परवाना नसलेल्या रिक्षा चालकांची संख्यादेखील १ हजार २०० पर्यंत जाऊन पोहोचली आहे.
- दिवसेंदिवस विनापरवाना रिक्षा चालक आणि त्यांची संख्या वाढताना दिसून येत आहे. याचे प्रमाण रोखण्यासाठी सध्या तरी कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना दिसून येत नाही.
- परवानाधारक आणि विनापरवानाधारक याप्रमाणे रिक्षा चालकांचा शोध घेऊन सर्वांना परवाना कसा मिळेल, याकडे संबंधित विभागाने तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
शहरातील नागरिकांना सेवा देत असणाऱ्या रिक्षा चालकांनी आपल्याकडील कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी. ज्या त्रुटी असतील त्या वेळीच दूर करून घ्याव्यात. प्रवासी नागरिकांशी सौजन्याने बोलावे. योग्य तेच भाडे आकारणी करावी. कोणाचीही छेडछाड करू नये. ज्या ठिकाणी रिक्षांना थांबा देण्यात आलेला आहे, तिथेच रिक्षा या उभ्या कराव्यात. कुठेही रिक्षा उभ्या करून नये. वाहतुकीला अडथळा ठरेल अशा जागेवर रिक्षा लावू नये.
- धीरज महाजन,
पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा.