धुळे : राजधानी दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांचे धुळे शहरात रविवारी स्वागत करण्यात आले. शेतकऱ्यांचे जथ`थ्याचे नेतृत्व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचे किशोर ढमाले आणि शेतकरी, कामगारांचे नेते सुभाष काकुस्ते, करणसिंग कोकणी करीत आहेत.या रॅलीत साक्री तालुक्यासह नंदुरबार,नवापूर, सटाणा, कळवण तालुक्यातील शेकडाे शेतकरी सहभागी झाले हाेते. तसेच पुढे जाणाऱ्या रॅलीतही नवापूर, नंदुरबार, विसरवाडी, शिरपूर, पिंपळनेर येथील शेतकरी सहभागी हाेणार आहेत. पंजाब, राजस्थान सीमेपर्यंत शेतकऱ्यांची रॅली जाणार आहे. दहा ते वीस चार चाकी वाहनातून हे शेतकरी दिल्लीला रवाना झाले आहेत.या रॅलीचे महामार्गावरील सुरतबायपास जवळ शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष एम.जी. धिवरे, काॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, माजी आमदार शरद पाटील, जमाअते उलेमा हिंदचे गुफरान पाेपटवाले, राष्ट्रवादीचे रणजित भाेसले, अंनिसचे ठाकरे, वंचित बहूजन आघाडीचे अॅड. चक्षुपाल बाेरसे, नितीन वाघ, संविधान संरक्षण समितीचे हरिश्चंद्र लाेंढे, काॅग्रेस इंटकचे अध्यक्ष प्रमाेद सिसाेदे, काॅग्रेसचे उपाध्यक्ष मुकुंद काेळवले, एल. आर. राव, पाेपटराव चाैधरी, वसंत पाटील, यशवंत मालचे, महेंद्र शिरसाठ, सिध्दार्थ जगदेव, काॅग्रेसचे मुजफ्फर शेख, दीपकुमार साळवे, भिमराव पवार, आपचे जिल्हाध्यक्ष ईश्वर पाटील, रमेश दाणे यांच्यासह इतरांकडून स्वागत केले. त्यानंतर शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली बर्वे कन्या छायात्रालयात पाेहाेचली. याठिकाणी छोटेखानी सभा झाली. रॅलीतील शेतकरी रात्रभर मुक्कामी हाेते. त्यांची भाेजनाचीही व्यवस्था स्थानिकांनी केली होती.
शेतकऱ्यांच्या जथ्थ्याचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 21:57 IST