शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा योजनांची वीज कापणार!

By admin | Updated: February 6, 2017 00:03 IST

महावितरण : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका:यांना पत्र, तब्बल 51 कोटी रुपये थकले

धुळे :  वाढत्या थकबाकीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या वीज महावितरण कंपनीने राज्यभरात वसुलीची धडक मोहीम सुरू केली आह़े त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावरील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांपोटी 51 कोटी रुपयांचे वीज बिल थकल्याने महावितरणने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका:यांना पत्र देऊन थकबाकी भरण्याचे आदेश ग्रामपंचायतींना द्यावे, अन्यथा वीजपुरवठा खंडित केला जाईल, असा इशारा दिला आह़ेवीज देयक थकीत असलेल्या सर्व प्रकारच्या ग्राहकांची वीज जोडणी खंडित करण्याचे आदेश महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी दिले आहेत़ त्या पाश्र्वभूमीवर मोठय़ा प्रमाणात थकबाकी असलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आह़े दरम्यान, सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांपोटी थकीत असलेले वीज देयक सर्वाधिक असल्याने आता पाणीपुरवठा योजना महावितरणच्या ‘रडार’वर आहेत़  शहर व जिल्ह्यात सार्वजनिक पाणीपुरवठा करण्यासाठी कार्यान्वित असलेल्या योजना ग्रामपंचायती व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अखत्यारित येतात़ या योजनांसाठी महावितरणकडून वीजपुरवठा केला जातो़ पाणीपुरवठा अत्यावश्यक सेवांमध्ये मोडत असल्याने थकबाकी वाढली तरी त्यांचा वीजपुरवठा खंडित करणे महावितरणला सहज शक्य होत नाही़ मात्र त्यामुळे दिवसेंदिवस थकबाकीचा डोंगर वाढतच असल्याने महावितरणला थकबाकीसाठी पावले उचलावी लागणार होती़ त्यामुळे महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकांनी राज्यातील चारही प्रादेशिक संचालक व 16 परिमंडळांच्या मुख्य अभियंत्यांना थकबाकी वसुलीवर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश दिले आहेत़ तसेच या कामात कुचराई करणा:यांवर कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. त्यामुळे राज्यभरात वीज देयक थकीत असलेल्यांवर कारवाई केली जात आह़े  जिल्ह्यात सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांसाठी घेण्यात आलेल्या वीज कनेक्शनची संख्या 1 हजार 99 इतकी आह़े जिल्ह्यात चार तालुक्यांमध्ये एकूण 11 उपविभाग असून त्यापैकी शिरपूर 2 या उपविभागात सर्वाधिक 9 कोटी 64 लाख रुपयांची थकबाकी पाणीपुरवठा योजनांपोटी आह़े दरम्यान, महावितरणने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांना पत्र दिले आह़े या पत्रानुसार, जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींकडे 51 कोटी 57 लाख रुपयांचे वीज देयक थकले आहेत़ वारंवार पाठपुरावा करूनही ग्रामपंचायतींकडून वीज देयके भरण्यात आलेली नाही़ महावितरण कंपनीची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने संबंधित ग्रामपंचायतींना सार्वजनिक पाणीपुरवठय़ाची थकीत वीज देयके भरण्यास सूचित कराव़े  ग्रामपंचायतींना वेळोवेळी नोटिसा दिल्यानंतरही प्रतिसाद मिळत नसून थकबाकी न भरल्यास वीजपुरवठा खंडित केला जाईल, याबाबत ग्रामपंचायतींना सूचित करण्यात आले आह़े  त्यामुळे  आता या पत्रावर जिल्हा परिषद प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आह़े प्रत्यक्षात ग्रामपंचायतींकडून जिल्हा परिषद प्रशासनाला माहिती दिली जात नसल्याने जिल्हा परिषद प्रशासन अनेक बाबतीत अनभिज्ञ असल्याचे दिसून येत़ेमहावितरणने तोडले 465 वीज कनेक्शऩ़़ महावितरण कंपनीकडून थकबाकीदार घरगुती, वाणिज्य व कृषी ग्राहकांवरदेखील कारवाई केली जात आह़े त्यानुसार आतार्पयत 465 कनेक्शनचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आह़े 54 लाख 60 हजार रुपयांच्या वसुलीसाठी ही कारवाई करण्यात आली आह़े थकबाकीदारांनी तत्काळ वीज देयके भरावीत, असे आवाहन करण्यात आले आह़े