शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

पाणी आले; पण थकीत बिलामुळे वीज गेली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2017 22:42 IST

एकीकडे पाणी आले, तर दुसरीकडे वीज गुल झाली, असा प्रकार बुधवारी मनपात घडला.

धुळे : मनपाने  ४३ लाखांचा धनादेश दिल्यानंतर अखेर बुधवारी सायंकाळी पाणीपट्टी न भरल्याने पाटबंधारे विभागाने खंडित केलेला नकाणे तलावाचा पाणीपुरवठा  सुरळीत झाला़ पण दुसरीकडे थकीत बिलापोटी मनपाच्या चार सार्वजनिक शौचालयांचा वीजपुरवठा महावितरण कंपनीने खंडित केला. एकीकडे पाणी आले, तर दुसरीकडे वीज गुल झाली, असा प्रकार बुधवारी मनपात घडला.अखेर पाणीपुरवठा सुरळीतमनपात सकाळपासून पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत प्रयत्न सुरू होते़ आयुक्त मनपात उपस्थित नसल्याने सभागृह नेते कमलेश देवरे यांनी अन्य अधिकाºयांशी चर्चा करून पाटबंधारे विभागात जाऊन अधिकाºयांशी चर्चा केली़ पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता के़टी़सूर्यवंशी यांच्या आदेशाने कारवाई झालेली असून ते रजेवर असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क होत नव्हता, त्यामुळे पाटबंधारे विभाग पाणीपुरवठा पूर्ववत करण्यास तयार नव्हता़ मात्र सूर्यवंशी यांच्याशी संपर्क झाल्यानंतर अखेर पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश त्यांनी दिले़ त्यानंतर सायंकाळी नकाणे तलावाचे गेट उघडून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला़ या वेळी सहायक कार्यकारी अभियंता नागेश वट्टे, उपअभियंता बेहेरे, मनपा उपायुक्त रवींद्र जाधव, शहर अभियंता कैलास शिंदे, चंद्रकांत उगले उपस्थित होते़ एकूण ३ कोटी ७ लाखांच्या पाणीपट्टीपैकी ७५ लाख ७३ हजार चालू पाणीपट्टी आकारणी होती़ त्यापैकी ४३ लाख ४ हजार ८६ रुपयांचा धनादेश पाटबंधारे विभागाला देण्यात आल्याची माहिती मनपा पाणीपुरवठा विभागाने दिली़ महापौर कल्पना महाले यांनीदेखील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले़ शहरातील ४० टक्के भागाला नकाणे तलावातून पाणीपुरवठा होतो़ मात्र पाटबंधारे विभागाने केलेल्या कारवाईमुळे नकाणे तलावातून पाणीपुरवठा होणाºया भागाला बुधवारी पाणीपुरवठा होऊ शकला नाही़ याबाबत ‘लोकमत’ने संबंधित भागातील नागरिकांच्या भावना जाणून घेतल्या असता नागरिकांनी मनपाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली़ वीजपुरवठा झाला खंडितमनपा सार्वजनिक शौचालयांची अवस्था बिकट असतानाच चार सार्वजनिक शौचालयांचे वीज बिल थकल्याने महावितरण कंपनीकडून चारही सार्वजनिक शौचालयांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला़ वडजाई रोडवरील २, मोगलाई परिसरातील १ व हमाल-मापाडी परिसरातील १ अशा चार सार्वजनिक शौचालयांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला़ वीज बिलापोटी जवळपास ४० ते ५० हजार रुपयांचे चालू वीज बिल थकल्याची माहिती महावितरणच्या अधिकाºयांनी दिली़ त्यामुळे आता वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील़ शौचालयांच्या देखभाल दुरुस्तीचा ठेका दिलेल्या ठेकेदारांची बिले मनपाने अदा केलेली नाही़